Budget 2023 : नागपूर-गोवा शक्तीपीठ एक्सप्रेसवेसाठी 86,300 कोटी, शिक्षकांच्या पगारातही वाढ, पहा खातेनिहाय कोणत्या विभागला किती रक्कम?
महाराष्ट्राचे दैवत म्हणून श्रद्धेची महत्त्वाची केंद्रे म्हणजे माहूर, तुळजापूर, अंबेजोगाई या तिन्ही शक्तिपीठांना महामार्गाने जोडली जाणार आहेत. यासोबतच औंढा नागनाथ आणि परळी वैजनाथ या दोन ज्योतिर्लिंगांशिवाय नांदेड गुरुद्वारा, पंढरपूर, कारंजा लाड, अक्कलकोट, गंगापूर, नरसोबाची वाडी, औदुंबर तीर्थ ही ठिकाणेही शक्तीपीठ महामार्ग जोडली जाणार आहे.
वर्धा जिल्ह्यातील पवनार ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रादेवीपर्यंत महाराष्ट्रातील हा शक्तीपीठ महामार्ग नागपूर – गोवा दरम्यान 760 किलोमीटर पसरला जाणार आहे. अर्थमंत्री फडणवीस यांनी पाच ज्योतिर्लिंगांच्या विकासासाठी 500 कोटींचा निधी जाहीर केला आहे. शक्तीपीठ महामार्ग तयार झाल्यावर महाराष्ट्राच्या विशेषत: मराठवाड्याच्या प्रगतीचा नवा मार्ग खुला होणार आहे.
शक्तीपीठ महामार्गामुळे हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, वर्धा, यवतमाळ, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा झपाट्याने विकास होणार आहे. यासाठी शिंदे – फडणवीस सरकारने अर्थसंकल्पात 86,300 कोटींची तरतूद केली आहे.
21 तासांचा प्रवास फक्त 8 तासांत..
महाराष्ट्र आणि गोवा यांच्यातील कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी राज्य सरकारने नागपूर आणि गोवा दरम्यान एक्स्प्रप्रेस – वेची घोषणा केली होती. 760 किलोमीटर लांबीचा हा महामार्ग महाराष्ट्रातील 11 जिल्हे जोडणार असून त्यामुळे वेळेचीही मोठी बचत होणार आहे. आता नागपूरहून गोव्याला जाण्यासाठी 21 तासांचा अवधी लागतो, मात्र एक्स्प्रेस वे तयार झाल्यानंतर हे अंतर तुम्हाला अवघ्या 8 तासांत पार करता येणार आहे. नागपूर ते गोवा दरम्यान बांधण्यात येणाऱ्या या एक्स्प्रेस वेला शक्तीपीठ एक्सप्रेस – वे असे नाव देण्यात आले आहे. वास्तविक, ते महालक्ष्मी, तुळजाभवानी आणि पत्रादेवी या तीन शक्तीपीठांना जोडला जाणार आहे.
शिर्डी विमानतळावरही वाढवण्यात येणार सुविधा..
साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना यात कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी शिर्डी विमानतळावरील सुविधांमध्ये वाढ करण्याची घोषणाही अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. काही दिवसांपूर्वीच शिर्डी विमानतळावरून रात्रीच्या विमानाचे टेक – ऑफ आणि लँडिंगची सुविधा सुरू करण्यात आली आहे, जेणेकरून भाविकांना पहाटे काकड आरती करता येईल.
शिक्षकांच्या पगारातही वाढ..
अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिक्षकांच्या पगारात 10 हजार रुपयांपर्यंत भरघोस वाढ करण्याची घोषणा केली आहे. अंगणवाडी सेविकांच्या वेतनातही मोठी वाढ झाली आहे. इयत्ता आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शासन शाळेचा ड्रेस देणार आहे. आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना 7,500 रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.
महाराष्ट्रात 14 नवीन वैद्यकीय महाविद्यालये, 75 हजार नवीन सरकारी नोकऱ्या मिळणार..
देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात 14 नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्याची घोषणा केली. नामांकित शाळांना विशेष अनुदानही जाहीर करण्यात आलं आहे . तसेच लवकरच 75,000 नवीन सरकारी नोकऱ्यांची नियुक्ती करण्याची घोषणा केली.
बीएमसी निवडणुकीकडे लक्ष..
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्र्यांनी मुंबईसह एमएमआर क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा केल्या आहेत. विरार – अलिबाग कॉरिडॉरसाठी 40 हजार कोटींचा अर्थसंकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. याशिवाय मुंबई, ठाणे, पुण्यासह एमएमआर प्रदेशात मेट्रोचे जाळे पसरवण्याची योजना आणण्यात आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय
अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर करताना शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित संग्रहालय उभारण्याची घोषणा केली. 17व्या शतकातील शासकाने बांधलेल्या किल्ल्याच्या संवर्धनासाठी 300 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ला हे शिवाजी महाराजांचे जन्मस्थान आहे. पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील आंबेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज थीम पार्क उभारण्यासाठी 50 कोटी रुपये देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बाळासाहेब ठाकरे स्मारकासाठी 351 कोटी
शेतीसाठी 29,163 कोटी
शेतकऱ्यांसाठी 6,900 कोटी
ऑटो – रिक्षा चालकांसाठी कल्याण महामंडळ
राज्य परिवहन बसमध्ये महिलांसाठी अर्धे तिकीट
महिला आणि बालकल्याणासाठी 43,000 कोटी
विरार – अलिबाग कॉरिडॉरसाठी 40,000 कोटी
5 ज्योतिर्लिंगांच्या विकासासाठी 500 कोटी
पर्यटनासाठी 13,437 कोटी
आरोग्य विभागासाठी 3,520 कोटी
700 नवीन आपला दवाखाने सुरू करणार
उद्योग विकासासाठी 934 कोटी
क्रीडा विभागासाठी 491 कोटी
शिर्डी विमानतळावर नवीन सुविधा विकसित करणार
सावित्रीबाई फुले स्मारकासाठी 50 कोटी
नवी मुंबईत जेम्स अँड ज्वेलर्स पार्क सुरू करणार
250 आदिवासी शाळांना आदर्श शाळा बनवणार
50 हायटेक रोप गार्डन बनवणार
कोणत्या विभागाला किती रक्कम मिळाली ?
पर्यावरणपूरक विकासासाठी 13437 कोटी रुपये.
वाहतूक आणि बंदर विकासासाठी 3746 कोटी रुपये
3539 कोटी रुपयांचे रेल्वे प्रकल्प
शालेय शिक्षण 2707 कोटी रुपये
वैद्यकीय शिक्षण विभागासाठी 2355 कोटी रुपये
गृह विभागासाठी 2187 कोटी रुपये
सामान्य प्रशासन विभागासाठी 1310 कोटी रुपये
सांस्कृतिक कार्य विभागासाठी – रु. 1085 कोटी रुपये
कौशल्य, उद्योजकता आणि रोजगार यासाठी 738 कोटी रुपये