Take a fresh look at your lifestyle.

आता फक्त 2 चं दिवसात मिळतंय Caste Validity Certificate, पहा कागदपत्रे अन् स्टेप बाय स्टेप ऑनलाईन अर्ज प्रोसेस..

भारतीय राज्यघटनेत सर्व जाती-धर्माच्या आधारे लोकांना समान हक्क मिळावेत यासाठी आरक्षणाची सुविधा देण्यात आली आहे. यासाठी केंद्र शासन व राज्य शासनाकडून मागासवर्गीय व इतर मागासवर्गीयांना जातीच्या प्रमाणपत्राद्वारे आरक्षणाचा लाभ दिला जातो. आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी नागरिकाकडे जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. ज्याद्वारे त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ सहज मिळू शकतो.

10 वी 12 विच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घ्यायचं म्हटलं तर जात प्रमाणपत्र हे अनिवार्य केलं आहे. उच्चमाध्यमिक प्रवेशांसाठी विविध आरक्षण आणि सवलती मिळवण्याच्या हेतूने विद्यार्थी व पालकांना कागदपत्रांची जुळवाजुळव करावी लागते. परंतु जात प्रमाणत्र काढण्याची प्रोसेस खूपच अवघड असते हे आधीच त्यांच्या डोक्यात बसलेलं असल्याने ते जात प्रमाणपत्र काढण्यास टाळाटाळ करतात. परंतु आता शासनाने जात प्रमाणपत्रे काढण्याची प्रोसेस ऑनलाईन आणि अंत्यंत सोपी केल्याने फक्त 8 ते 10 दिवसांतच ते काढू शकता. एखाद्या विद्यार्थ्याला जर अर्जंट दाखला हवा असेल तर तो एका दिवसातही मंजूर की जात आहे.

SC, ST किंवा VJNT- OBC हे जात प्रमाणपत्राचे सदस्य आहे, ज्याद्वारे तुम्ही कोणत्याही महाविद्यालयात किंवा संस्थेत कुठेही प्रवेश, शाळेत प्रवेश, पेन्शन सुविधांचा लाभ, शासकीय योजनांचा लाभ मिळवू शकता. आज आपण या लेखाद्वारे जात प्रमाणपत्र (Caste Validity Certificate) संबंधित माहिती देणार आहोत. जेणेकरून तुम्ही घरी बसल्या आवश्यक कागदपत्रासह जातिप्रमाण पत्रासाठी सहज अर्ज करू शकता..

जात प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज करणाऱ्या कोणत्याही अर्जदाराला आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती जतन कराव्या लागतील. जेणेकरून अर्जाच्या वेळी कागदपत्रे अपलोड करता येतील. तसेच, जे अर्जदार ऑफलाइन पद्धतीने जात प्रमाणपत्रासाठी अर्ज करत आहेत त्यांना सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून अर्ज करावा लागेल. आता आपण आवश्यक कागदपत्रे आणि ऑनलाईन अर्जासंबंधी जाणून घेउयात..

जात प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे :-

1. संबंधित कॉलेजचे पत्र व चालू शैक्षणिक वर्षाचे बोनाफाईड – (बोनाफाईडवर अर्जदाराचा फोटो व अर्जावर प्राचार्याचा सही – शिक्का असणे आवश्यक)

2 अर्जदाराचा शाळा सोडल्याचा दाखला

3. पहिलीचा प्रवेश निर्गमन उतारा – PDF

4. जातीच्या दाखल्याची झेरॉक्स प्रत

5. अर्जदाराच्या वडिलांचा शाळेचा दाखला, पहिलीचा प्रवेश निर्गमन उतारा व जातीचा दाखला.

6. अर्जदाराची आत्या व काका यांचा शाळा सोडल्याचा दाखला,

7. अर्जदाराच्या आजोबा किंवा चुलत आजोबांचा शाळा सोडल्याचा दाखला

8. गाव कर पावती, खरेदीखत, फेरफार उतारा, गहाण खत आणि मालमत्ता पत्रक इत्यादी महसुली पुरावे.

9. वंशावळ नमुना नंबर तीन कोऱ्या कागदावर शपथपत्र व यासाठी आवश्यक फॉर्म नंबर 17 (शपथपत्र)

महत्वाचे आवश्यक पुरावे..

SC कॅटॅगरीतील असाल तर 10 ऑगस्ट 1950 पूर्वीचा पुरावा..

VJNT कॅटॅगरीतील असाल तर 21 नोव्हेंबर 1961 पूर्वीचा पुरावा..

OBC व SBC कॅटॅगरीतील असाल तर 13 ऑगस्ट 1967 पूर्वीचा पुरावा..

जात प्रमाणपत्रासाठी अर्ज कसा कराल ?

ऑनलाइन जात प्रमाणपत्रासाठी वेबसाइट : https://castevalidity.mahaonline.gov.in/Login/Login

‘नवीन वापरकर्ता?’ वर क्लिक करा? तुम्ही नवीन वापरकर्ता असाल तर येथे नोंदणी करा’
आवश्यक तपशील भरा

तुमचे खाते तयार करा.

तुम्ही विद्यमान वापरकर्ता असल्यास, ‘लॉग इन’ निवडा

तुम्हाला एका नवीन पृष्ठावर पुनर्निर्देशित केले जाईल

आवश्यक माहिती भरा

सर्व कागदपत्रे अपलोड करा

वेबपेजच्या तळाशी ‘पूर्ण’ वर क्लिक करा

तुम्ही दिलेल्या ईमेल पत्त्यावर तुम्हाला अर्ज क्रमांक प्राप्त होईल

त्यानंतरच्या पृष्ठांवर सर्व तपशील भरा आणि तुमची प्रगती जतन करण्यासाठी ‘सेव्ह’ वर क्लिक करा

एकदा तुम्ही संपूर्ण अर्ज पूर्ण केल्यानंतर, ‘Confirm Print Application’ निवडा.

दिलेला चेकबॉक्स निवडा आणि ‘पूर्ण’ क्लिक करा

तुमच्या अर्जावर यशस्वीपणे प्रक्रिया केल्यावर तुम्हाला एक सूचना प्राप्त होईल.