Take a fresh look at your lifestyle.

पशुपालकांसाठी खुशखबर ! कडबा कुट्टीसाठी आता थेट 1 लाखांचे अनुदान, पहा कागदपत्रे अन् ऑनलाईन अर्ज A टू Z प्रोसेस..

शासनाकडून देशभरात शेतीशी संबंधित प्रत्येक क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जातात. परंतु माहितीच्या अभावामुळे शेतकरी वर्गातील मोठा वर्ग त्यांचा लाभ घेण्यापासून वंचित राहतो. अशीच एक योजना पशुपालक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. जी आज आपण या लेखात जाणून घेणार आहोत..

या आर्थिक वर्षात, महाराष्ट्र शासनाकडून पशुपालक शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी ट्रॅक्टर, पॉवर टिलर, हार्वेस्टर, कडबा कुट्टी मशीनसह प्रत्येक कृषी यंत्राच्या अनुदानात वाढ केली आहे. यामुळे चाऱ्याची कटिंग करणे, शेतात नांगरणी केल्यानंतर बेड तयार करणे यासारखी कृषी उपकरणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहे, त्याची स्टेप बाय स्टेप माहिती आपण खाली पाहणार आहोत..

किती मिळणार अनुदान..

कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वेगवेगळे अनुदान दिले जाणार आहे. आपण कडबा कुट्टीसाठी किती अनुदान मिळतं ते पाहूया..
आपल्याकडे सामान्यतः 3 प्रकारच्या कडबा कुट्टी चालवल्या जातात. 3 HP किंवा त्यापेक्षा कमी अधिक, अन् दुसरी म्हणजे ट्रॅक्टर चलित कडबा कुट्टी यंत्र. आता यामध्ये जर कडबा कुट्टी मशीनची किंमत 20 हजार रुपयांपेक्षा जास्त असेल तर त्यावर 10 हजार रुपये अनुदान म्हणून देण्यात तर ट्रॅक्टर चलित कडबा कुट्टीसाठी 1 लखनपर्यंत अनुदान देण्यात येतं. त्यामध्ये ओपन कॅटेगरीसाठी 50% तर SC / OBC / VJ / NT / SBC / ST साठी 75% इतकं अनुदान दिलं जातं..

कडबा कुट्टी मशीनसाठी आवश्यक कागदपत्रे..

आधारकार्ड
जमिनीचा 7/12 व 8 अ उतारा
तुमच्या घराचे वीज बिल
जातीचा दाखला (आरक्षण असल्यास)
बँक पासबुक पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत (आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक)
GST बिल, कोटेशन, हमीपत्र, करारनामा (लॉटरी लागल्यानंतर)

कडबा कुट्टी मशीनसाठी अर्ज कसा कराल ?

अर्ज करण्यासाठी ‘एक शेतकरी एक योजना’ म्हणजे नवं पोर्टल – https://mahadbt.maharashtra.gov.in/ या पोर्टलवर तुम्हाला अर्जज करायचा आहे. त्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करा त्यामध्ये स्टेप बाय स्टेप माहिती दिली आहे.

कडबा कुट्टी मशीनसाठी अर्ज करण्यासाठी..

इथे क्लिक करा

बेड मेकर किंवा बेड प्लांटरवरही 50,250 रु. अनुदान..

अनुदानात वाढ केल्यानंतर शेतकऱ्यांना बेड मेकर किंवा बेड प्लांटरवर हलक्या वजनावर 50 टक्के किंवा 35,500 रुपये अनुदान देण्यात येत आहे. याशिवाय अल्पभूधारक, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिला शेतकऱ्यांना 50,250 रु. रुपये अनुदान देण्यात येत आहे..