New Wage Code : कर्मचारी 60 व्या वर्षीचं होणार 1,08,94,586 कोटींचे मालक ; पण कसे व्हाल करोडपती ? पहा, कॅल्क्युलेशन
New Wage Code 2022 : न्यू वेतन संहितेतील कॉस्ट टू कंपनी (CTC) बद्दल बरीच चर्चा आहे. सूत्रांवर विश्वास ठेवला तर, नवीन वेतन संहिता लवकरच लागू केली जाईल. त्याची तयारी कामगार मंत्रालयात पूर्ण झाली आहे. या मसुद्यांना बहुतांश राज्यांची मंजुरी मिळाली आहे. ही संहिता (Code) लागू झाल्यानंतर त्याचा सर्वाधिक फटका खासगी नोकरी करणाऱ्यांना बसणार आहे.
यामुळे टेक होम सॅलरी, पीएफ आणि ग्रॅच्युइटी पूर्णपणे बदलून जाणार आहे. या कोड मध्ये खाजगी कामगाराच्या हातात येणारा पगार कमी केला जाऊ शकतो. मात्र, सरकार वृद्धापकाळासाठी चांगली व्यवस्था करत आहे. तज्ञांच्या मते, मासिक इन – हँड पगार निःसंशयपणे कमी होईल, परंतु मूलभूत वाढीमुळे, सेवानिवृत्ती निधीमध्ये (Retirement Fund) अधिक पैसे जमा केले जाणार आहे. यातून निवृत्तीवेतनासाठी मोठा निधी निर्माण होईल. याशिवाय ग्रॅच्युइटीमध्येही फायदा होणार आहे…
खाली पहा, कॅल्क्युलेशन :-
जर एखाद्या कर्मचाऱ्याचे वय 30 वर्षे आहे अन् त्याचे मासिक वेतन 50 हजार रुपये असेल आणि मूळ वेतन (Basic Salary) 15 हजार रुपये असेल. त्यामुळे सेवानिवृत्तीच्या वयापर्यंत म्हणजेच 60 व्या वर्षापर्यंत दरवर्षी 5% पगारात सरासरी मूल्यमापन केलं, तर सध्याच्या 8.1% व्याजदरानुसार, नियमित गुंतवणुकीतून पीएफ (PF) खात्यातील एकूण रक्कम 65,36,758 रुपये होईल.
आता कर्मचाऱ्याचे मूळ वेतन दरमहा 25 हजार रुपये असेल. मग सेवानिवृत्तीवर पीएफची (PF) रक्कम 1,08,94,586 रुपये होईल. येथे 5% वार्षिक वेतनवाढ घेण्यात आली आहे, ज्यामुळे पीएफ निधी आणखी वाढेल…
काय आहे कॉस्ट टू कम्पनी (Cost to Company) जाणून घ्या…
नवीन वेतन संहितेचे फायदे : CTC म्हणजे कंपनीने आपल्या कर्मचार्यांवर केलेला खर्च. हे कर्मचाऱ्यांचे संपूर्ण वेतन पॅकेज आहे. CTC मध्ये मासिक मूळ वेतन, भत्ते, रीइम्बर्समेंट समाविष्ट आहे. तसेच, ग्रॅच्युइटी, अँन्युएल व्हेरिएबल पे, अँन्युएल बोनस यासारख्या प्रॉडक्टचा समावेश आहे. CTC ची रक्कम कर्मचार्यांच्या टेक होम पगाराच्या बरोबरीची नसते. CTC मध्ये अनेक कंपोनंट्स आहेत, त्यामुळे ते वेगळे आहे. CTC = ग्रॉस सॅलरी + PF + ग्रॅच्युइटी
बेसिक सॅलरी कशाला म्हणतात ?
बेसिक सॅलरी ही कर्मचाऱ्याची बेस इनकम असते. हे सर्व कर्मचार्यांच्या लेव्हल आधारावर निश्चित केली जाते. ही कर्मचार्यांच्या श्रेणीनुसार आणि तो ज्या उद्योगात काम करत आहे त्यानुसार ते बदलते.
ग्रॉस सॅलरी म्हणजे काय ?
विना टॅक्स कटिंग जो बेसिक पगार आणि भत्त्यांना जोडून जी सॅलरी बनते तिला ग्रॉस सॅलरी म्हणतात. यामध्ये बोनस,ओव्हर टाइम पे, हॉलिडे पे आणि अन्य वस्तुनिष्ठ भत्ते सामील असतात.
Gross Salary = बेसिक सॅलरी+HRA+ इतर भत्ते
नेट सॅलरी काय असते ?
नेट सेलरीला टेक होम सेलरी देखील म्हणतात. टॅक्स कट झाल्यानंतर जी सॅलरी बनते तिला नेट इनकम किंवा सॅलरी म्हणतात.
नेट सॅलरी = बेसिक सॅलरी + HRA + भत्ते – इनकम टॅक्स – EPF – प्रोफेशनल टॅक्स
कोण – कोणत्या भात्यांचा असणार समावेश :-
कंपनी कर्मचाऱ्यांना नोकरीच्या बदल्यात भत्ते देते. हे प्रत्येक कंपनीमध्ये वेग -वेगळं असतं.
> HRA : हाऊस रेंट अलाउंस कर्मचार्यांना रेंटवर घर दिले जाते.
> LTA : एलटीए कर्मचार्यांच्या घरच्या प्रवासासाठी दिला जाणारा खर्च असतो. यामध्ये जेवण , हॉटेल रेंटचा समावेश नसतो.
> TA : ट्रॅव्हल्स अलाउंस कर्मचार्यांना घर ते कंपनीपर्यंत येण्याजाण्याचा खर्च दिला जातो.
> DA महागाई भत्ता : DA हा राहणीमानावर अवलंबून असलेला भत्ता आहे. हा महागाईनुसार दिला जातो. यामध्ये सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्स पात्र असतात.
> इतर भत्यांमध्ये स्पेशल अलाउंस, मेडिकल अलाउंस व प्रोत्साहन किंवा इंसेटिव असतं.
किती होणार रिइंबर्समेंट :-
एक्सपर्ट्स नुसार, कंपन्यांमध्ये कर्मचारी उपचार, फोन खर्च, न्यूजपेपर बिल ठेवण्याची तरतूद आहे. ही रक्कम सॅलरी मधून वेगळी मिळते. आयकर कायद्यानुसार प्रत्येक रीइम्बर्समेंटमध्ये एक सीमा ही कर सवलत आहे…