Take a fresh look at your lifestyle.

CIBIL Score : आता पॅन नंबरद्वारे CIBIL स्कोअर फ्रीमध्ये करा चेक ! PDF फाइलही करा डाउनलोड, पहा प्रोसेस..

सध्याच्या गरजा पूर्ण करण्याबरोबरच लोकं त्यांच्या भविष्यासाठीही बचत करतात. परंतु अनेक वेळा लोकांना अशा गरजांचा सामना करावा लागतो, ज्यासाठी त्यांना खूप पैसे लागतात. त्याचबरोबर आजच्या काळात कोणीही सहजासहजी कर्ज देण्यास तयार नसतं. त्यामुळे लोक बँकांकडून कर्ज घेतात. परंतु तुम्ही जेव्हा कर्ज घेण्यासाठी किंवा क्रेडिट कार्डसाठी अर्ज करण्यासाठी बँकेत जाता, तेव्हा बँक तुम्हाला तुमचा CIBIL स्कोअर विचारते आणि CIBIL स्कोर रिपोर्टची प्रत देखील मागते.

परंतु तुम्हाला कदाचित माहित नसेल की तुम्ही तुमचा सिबिल स्कोअर घरी बसून तपासूही शकता आणि PDF डाऊनलोडही करू शकता. तर तुम्ही हे कसे तपासू शकता ते जाणून घेउया..

CIBIL स्कोअर कसा तपासायचा ?

तुम्ही तुमचा CIBIL स्कोअर ऑनलाइन तपासण्याचा कधी प्रयत्न केला असेल, तर त्यासाठी पैसे कोठून द्यायचे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. परंतु तुम्ही या पद्धतीने तुम्ही तुमचा CIBIL स्कोअर अगदी मोफत तपासू शकाल !

सिबिल स्कोअर पॅन नंबरद्वारे विनामूल्य ऑनलाइन तपासू शकता, यासाठी तुम्हाला फक्त तुमचा पॅन कार्ड नंबर आणि तुमचा मोबाईल नंबर लागेल..

स्टेप 1 : प्रथम cibil.com वेबसाइटवर जा.

तुमचा सिबिल स्कोअर ऑनलाइन मोफत तपासण्यासाठी, सर्वप्रथम तुमच्या मोबाईल/कॉम्प्युटरमध्ये https://www.cibil.com/ ही वेबसाइट उघडा. आणि Get Free Cibil Score Report वर क्लिक करा.

स्टेप 2 : स्वतःच अकाउंट तयार करा.

आता Create your account हा ऑप्शन येईल ज्यामध्ये तुम्हाला तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन एंटर करावी लागेल जसे की –
ई – मेल आयडी
लॉगिन करण्यासाठी पासवर्ड तयार करावा लागेल
पहिले नाव
आडनाव
आयडी प्रकार > पॅन कार्ड
पॅन क्रमांक
जन्मतारीख
पिन कोड
मोबाईल नंबर
सर्व डिटेल्स प्रविष्ट केल्यानंतर, Accept & Continue बटणावर क्लिक करा.

स्टेप 3 : आता OTP सह व्हेरिफिकेशन करा.

यानंतर, आपण व्हेरिफिकेशनसाठी प्रविष्ट केलेल्या ईमेल आयडीवर एक OTP येईल, आपल्याला तो प्रविष्ट करावा लागेल. आणि Continue बटणावर क्लिक करा. (लक्ष द्या ! OTP मॅसेज CIBIL REPORTS नावाच्या Promotions टॅबमध्ये आढळेल)

स्टेप 4 : खाली नमूद केलेले इतर डिटेल्स भरा.

यानंतर तुम्हाला विचारले जाईल की तुम्ही पब्लिक wifi वापरत आहात की तुमचा स्वतःचा मोबाईल डेटा. जर येथे मोबाईल डेटा वापरत असेल तर मी येसच्या पर्यायावर क्लिक करा आणि जर Public वायफाय वापरत असेल तर No वर क्लिक करा.

स्टेप 5 : Go To Dashboard वर क्लिक करा.

यानंतर You have successfully enrolled असे लिहिलेलं येईल. म्हणजे तुमचे account तयार झाले आहे. आता तुम्हाला Go To Dashboard वर क्लिक करावे लागेल.

स्टेप 6 : CIBIL स्कोर रिपोर्ट प्रिंट करा.

आता क्रेडिट रिपोर्ट पेज उघडेल ज्यामध्ये तुमचा CIBIL SCORE वर लिहिलेला असेल. यासोबतच तुम्ही प्रिंट रिपोर्ट बटणावर क्लिक करून रिपोर्ट डाउनलोड करू शकता..

याशिवाय, तुम्ही तुमच्या कर्जाशी संबंधित संपूर्ण डिटेल्स देखील मिळवू शकता. जेणेकरुन तुम्हाला कळू शकेल की, तुमच्या पॅन नंबरसह कोणते कर्ज सक्रिय आहे आणि तुम्हाला त्याचे हप्ते किती काळ भरावे लागतील. तुम्हाला इथून आणखी अनेक गोष्टी कळू शकतात. यासाठी तुम्हाला हे पर्याय मिळतील –

Personal Information
Contact Information
Employment Information
Account Information
Enquiry Information