Take a fresh look at your lifestyle.

Land Record : प्रॉपर्टीच्या कागदपत्रांत काही चूका आहे का, कशी कराल दुरुस्ती; काय असतंय कन्फर्मेशन डीड ? घ्या जाणून सर्वकाही..

प्रॉपर्टीसबंधी व्यवहारात करताना दस्तऐवज म्हणजे कागदपत्रे सगळ्यात महत्वाची भूमिका बजावत असतात. जर त्यात काही चुका असतील तर त्या लवकरात लवकर दुरुस्त करणे अंत्यंत गरजेचे असते. परंतु कायदेशीर कामे खूपच वेळखाऊ असल्याने लोकं टाळाटाळ करतात. परंतु कागदपत्रे तयार करताना कोणती ना कोणती चूक राहून जाती अन् ती दुरुस्ती करणे आवश्यक आहे त्यामुळे घाबरून न जात ती दुरुस्ती करणेचं हिताचे ठरेल..

मालमत्तेच्या व्यवहारात अंतिम रूप देण्यासाठी कागदपत्रे तयार केली जातात. त्यातही काही चुका, उणिवा राहू शकतात. कायद्याशी निगडित कागदपत्रे असल्याने किरकोळ चुका वेळीच दुरुस्त करणेदेखील महत्त्वाचे आहे. कायदेशीर कागदपत्रात काटछाट करता येत नाही. त्यात आणखी एक डीड तयार करावे लागते. त्यास करेशन डीड, कन्फर्मेशन किंवा रेटिफिकेशन डीड असेही म्हटले जाते.

करेशन, कन्फर्मेशन किंवा रेटिफिकेशन डीड जाणून घ्या..

मालमत्तेसंबंधी कोणताही व्यवहार असो जसे की सेल, मार्गेज, लीज आदींना अंतिम रूप देताना कायदेशीर कागदपत्रे तयार केली जातात. ही कागदपत्रे भरपूर असतात. त्यामुळे त्यात नावाचे स्पेलिंग, मालमत्तेचे क्षेत्रफळ आदी माहितीवरून किरकोळ चुका होऊ शकतात. टायपिंगची चूक किंवा मोजमापात चुका होऊ शकते. त्यांना दुरुस्त करण्यासाठी करेशन डीड करावे लागते. अर्थात या चुकांत तथ्य असायला हवे.

कायद्यासंबंधी झालेली चूक सुधारणा करताना पुन्हा नव्याने प्रक्रिया करावी लागते रेटिफिकेशन डीडच्या माध्यमातून अशा प्रकारची चूक दुरुस्त करता येते . वास्तविक रेटिफिकेशन डीडला न्यायालयातून परवानगी घ्यावी लागते.

नोंदणी करा..

द इंडियन रजिस्ट्रेशन ऍक्ट अंतंर्गत या डीडला नोंदणी करावी लागते. त्यानुसार कोणत्याही अचल मालमत्तेच्या व्यवहारात व्यक्तीच्या हितासाठी कागदपत्रे नोंदणीकृत असणे अत्यावश्यक आहे. मूळ कागदपत्रे नोंदणीकृत असले तरी करेशन डीडला पुन्हा रजिस्टर करणे गरजेचे आहे. यावर मुद्रांक शुल्क भरावे लागते.

स्टॅम्प ड्युटीदेखील लक्षात घ्या..

स्टॅम्प ड्युटीचा दर हा चुकीच्या आधारावर असतो. स्पेलिंगच्या चुकीसाठी वेगळे, नाव, रकमेच्या चुकीसाठी वेगळे शुल्क आकारले जाते. करेशन डीडचे मूळ कागदपत्रे ही सर्व पक्षाच्या परस्पर संमतीनेच पूर्ण केले जातात आणि नोंदणीकृत होतात. जर एखादा पक्ष करेशन डीडवर सहमत नसेल तर अन्य पक्ष स्पेसिफिक रिलिफ ॲक्ट 1963 नुसार खटला दाखल करू शकतो.

कन्फर्मेशन डीडला समजून घ्या..

जर एखाद्या पक्षाने कागदावर सही करताना एखादी चूक केली असेल आणि त्याने वेळेवर नोंदणी केली नसेल किंवा एखाद्या कारणाने उपनिबंधनाने नोंदणी करून घेण्यास नकार दिला असेल किंवा मालमत्तेचे कागदपत्रे एझियूट झाले नसतील किंवा सही झाल्यानंतर 4 महिन्यांच्या आत नोंदणीसाठी सादर केले नसेल तर संबंधित पक्षाला कन्फरमेशन डीड करावे लागते..

यात मूळ डीडच्या एझियूशनची खातरजमा केली जाते. तसेच जुने कागदपत्रे अचूक आहेत, हे सिद्ध केले जाते. मूळ कागदपत्राची एक प्रत कन्फरमेशन डीडबरोबर जोडावी लागते. या ठिकाणी कागदपत्राच्या एझियूशनचा अर्थ हा सहीशी जोडला जातो. डीडचा थोडक्यात अर्थ असा की, विकलेल्या मालमत्तेचे सर्व अधिकार आता खरेदीदाराकडे आल्याचे आणि पहिल्या पक्षाचा या मालमत्तेवर कोणताही अधिकार राहिला नाही. थोडक्यात काय तर मालमत्ता खरेदी करताना कागदपत्रांची तपासणी तज्ज्ञ मंडळींकडून किंवा वकिलाकडून करून घ्यावी. भविष्यात मालमत्तेविषयी कटकटी निर्माण होणार नाहीत..