Take a fresh look at your lifestyle.

DA Arrears : दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांना मिळणार मोठं गिफ्ट ! खात्यात जमा होणार 30,864 रुपयांची थकबाकी, पहा Calculation..

केंद्र सरकारने सणासुदीच्या काळात केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याचं गिफ्ट दिलं आहे. त्यांचा महागाई भत्ता (DA) 46 टक्के करण्यात आला आहे. त्यात 4 टक्क्यांनी वाढ झाली. ऑक्टोबरच्या पगारासोबत 4 टक्के अतिरिक्त महागाई भत्ताही देण्यात आला आहे.

नवीन महागाई भत्ता वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीसाठी लागू करण्यात आला आहे. 1 जुलै 2023 पासून तो दिला जाणार आहे. या कालावधीत 3 महिन्यांची थकबाकीही देण्यात आली. पण, हा एरियर किती असेल ? चला संपूर्ण कॅल्क्युलेशन जाणून घेऊया..

कसा मिळणार थकबाकीचा फायदा..

केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) 4 टक्क्यांनी वाढला असून तो अदा करण्यात आला आहे. 1 जुलै 2023 पासून त्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे. त्यामुळे जुलै ते सप्टेंबरपर्यंतचा महागाई भत्ता थकबाकी म्हणून देण्यात आला. सर्व केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 3 महिन्यांच्या थकबाकीचा लाभ मिळाला आहे. नवीन वेतनश्रेणीमध्ये, वेतन बँडनुसार महागाई भत्ता मोजला जातो. लेव्हल – 1 मधील कर्मचाऱ्यांचा ग्रेड – पे 1800 रुपये आहे. यामध्ये मूळ वेतन 18000 रुपये आहे. याशिवाय प्रवास भत्ता (TA) देखील त्यात जोडला जातो. त्यानंतरच आर्थिक थकबाकी निश्चित केली जाते..

याप्रमाणे समजून घ्या कॅल्क्युलेशन ..

लेव्हल -1 मधील बेसिक सॅलरीचे कॅल्क्युलेशन रु. 18,000

लेव्हल -1 ग्रेड पे – 1800 मधील केंद्रीय कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन 18,000 रुपये आहे. या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ झाल्यामुळे एकूण भत्त्यात 774 रुपयांचे अंतर आलं आहे. याप्रमाणे थकबाकीचे कॅल्क्युलेशन समजून घ्या..

ग्रेड पे – 1800 रुपये

लेव्हल लेव्हल 1

किमान मूळ वेतन ₹18000

TA (शहरानुसार) Higher TPTA cities

महिना DA +TA 46% DA +TA 42% DA +TA = थकबाकी

जुलै 2023 ₹10251 ₹9477 ₹774

ऑगस्ट 2023 ₹10251 ₹9477 ₹774

सप्टेंबर 2023 ₹10251 ₹9477 ₹774

एकूण थकबाकी ₹ 2322

लेव्हल -1 मध्ये कमाल मूळ पगाराची गणना रु. 56900

लेव्हल – 1 ग्रेड पे -1800 मधील केंद्रीय कर्मचाऱ्यांचे कमाल मूळ वेतन 56,900 रुपये आहे. या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ झाल्यामुळे एकूण महागाई भत्त्यात 2420 रुपयांचे अंतर आलं आहे. याप्रमाणे थकबाकीचे कल्क्यलेशन समजून घ्या..

ग्रेड पे – 1800

लेव्हल 1

कमाल मूळ वेतन ₹56900

TA (शहरानुसार) Higher TPTA cities

महिना DA +TA 46% DA +TA 42% DA +TA= थकबाकी

जुलै 2023 ₹31430 ₹29010 ₹2420

ऑगस्ट 2023 ₹31430 ₹29010 ₹2420

सप्टेंबर 2023 ₹31430 ₹29010 ₹2420

एकूण थकबाकी ₹7260

लेव्हल 10 मध्ये किमान पगाराची गणना रु. 56,100

लेव्हल -10 मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांचा ग्रेड पे 5400 रुपये आहे. या केंद्रीय कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन 56,100 रुपये आहे. या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ झाल्यामुळे एकूण भत्त्यात 2532 रुपयांचे अंतर आले आहे. याप्रमाणे थकबाकीचे कॅल्क्युलेशन समजून घ्या..

ग्रेड – पे – 5400

लेव्हल 10

किमान मूळ वेतन ₹56100

TA (शहरानुसार) Higher TPTA cities

महिना DA + TA 46% DA + TA 42% DA + TA Due

जुलै 2023 ₹36318 ₹33786 ₹2532

ऑगस्ट 2023 ₹36318 ₹33786 ₹2532

सप्टेंबर 2023 ₹36318 ₹33786 ₹2532

एकूण थकबाकी ₹7596

कॅबिनेट सचिव स्तरावर किती थकबाकी आहे ?

18 व्या स्तरावर ग्रेड पे नाही. इथे पगार ठरलेला असतो. वास्तविक, कॅबिनेट सचिवांचा पगार याच स्तरावर असतो. यामध्ये पगार 250,000 रुपये आहे. महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ झाल्यामुळे एकूण 10288 रुपयांचा फरक आहे. खाली संपूर्ण कॅल्क्युलेशन पहा..

ग्रेड पे, फिक्स पगार नाही

लेव्हल 18

मूळ वेतन ₹ 250000

Your TA City Higher TPTA cities

युअर TA सिटी हायर TPTA सिटीज..

महिना DA+TA 46% DA+TA 42% DA+TA= थकबाकी

जुलै 2023 ₹125512 ₹115224 ₹10288

ऑगस्ट 2023 ₹125512 ₹115224 ₹10288

सप्टेंबर 2023 ₹125512 ₹115224 ₹10288

एकूण थकबाकी ₹30864

केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पे – बँड समजून

घ्या..

7व्या वेतन आयोगांतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांचे वेतन स्तर 1 ते स्तर 18 पर्यंत वेगवेगळ्या ग्रेड पेमध्ये विभागले गेले आहे. यामध्ये ग्रेड – पे आणि प्रवास भत्त्याच्या आधारे महागाई भत्ता मोजला जातो. लेव्हल 1 मध्ये, किमान पगार 18,000 रुपयांपासून सुरू होतो आणि कमाल पगार 56,900 रुपये आहे. त्याचप्रमाणे स्तर 2 ते 14 पर्यंतच्या ग्रेड पेनुसार पगार बदलतो. परंतु, स्तर -15, 17, 18 मध्ये ग्रेड – पे नाही. इथे पगार ठरलेला असतो. लेव्हल -15 मध्ये, किमान मूळ वेतन 182,200 रुपये आहे, तर कमाल वेतन 2,24,100 रुपये आहे. लेव्हल -17 मध्ये मूळ वेतन 2,25,000 रुपये निश्चित केले आहे. तसेच, लेव्हल -18 मध्ये देखील मूळ वेतन 2,50,000 रुपये निश्चित केले गेले आहे.