Take a fresh look at your lifestyle.

DA वाढण्यापूर्वी कर्मचार्‍यांसाठी आणखी एक Good News, 7व्या वेतन आयोगांतर्गत प्रमोशनचे नियम बदलले, पहा कॅटेगरीनुसार यादी..

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. त्याच्या महागाई भत्त्यात वाढ होण्यापूर्वीच प्रमोशनबाबत एक चांगली बातमी मिळाली आहे. सातव्या वेतन आयोगांतर्गत पगार घेणाऱ्या आणि संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीतील कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

केंद्र सरकारने पदोन्नतीशी संबंधित नियमांमध्ये काही बदल केले आहेत. या बदलांनंतर किमान सेवेचे नियम (Minimum service rules) सुधारण्यात आले आहेत. यामध्ये संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण नागरी कर्मचाऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. केंद्रीय कर्मचारी दुसऱ्या सहामाहीसाठी महागाई भत्त्याची प्रतीक्षा करत असतानाच हा निर्णय घेण्यात आला आहे.

कोणत्या कर्मचाऱ्यांसाठी बदलले पदोन्नतीचे नियम ?

केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत संरक्षण नागरी कर्मचाऱ्यांसाठी सुधारित निकष निश्चित करण्यात आले आहेत. 7व्या वेतन आयोगाच्या पे – मॅट्रिक्स आणि पे – बँड अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना हे लागू होणार आहे. तसेच अशा कर्मचार्‍यांचे पगार संरक्षण सेवा अंदाजपत्रकातून केले जात आहेत. यासंदर्भात संरक्षण मंत्रालयाकडून नोटिफिकेशनही जारी करण्यात आलं आहे..

नोटिफिकेशनमध्ये नमूद केलेली पात्रता.. 

संरक्षण मंत्रालयाच्या अधिसूचनेत पदोन्नतीसाठी पात्रतेसंबंधी डिटेल्स शेयर केली गेले आहेत. यामध्ये प्रत्येक स्तरानुसार पदोन्नती पात्रतेचे निकष निश्चित करण्यात आले आहेत. त्याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे. याशिवाय, कॅटेगरीनुसार यादी देखील सामायिक केली गेली आहे. खाली संपूर्ण यादी पहा..

कोणाला कॅटेगरीत कोणाला मिळणार प्रमोशन ?

यादीनुसार, पदोन्नतीसाठी पात्रता सर्व्हिस फॉर सेवेच्या यादीतील लेव्हल 1 ते 2 साठी, 3 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.

तर लेव्हल 2 ते 4 साठी ३ ते ८ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.

त्याचप्रमाणे लेव्हल 17 पर्यंतच्या कर्मचाऱ्यांना 1 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे आणि लेव्हल 6 ते 11 साठी त्यांना 12 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. या आधारावरच पदोन्नतीची तरतूद आहे..

कर्मचाऱ्यांचा महागाई भत्यात होणार मोठी वाढ..

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी वर्षाच्या उत्तरार्धात महागाई भत्ता लवकरच जाहीर होणार आहे. यामध्ये एकूण 1 कोटीहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा समावेश आहे. असा अंदाज आहे की, सप्टेंबरच्या अखेरीस दुसऱ्या सहामाहीसाठी महागाई भत्ता वाढवला जाऊ शकतो. यावेळीही महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ होऊ शकते.

परंतु, काही रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, महागाई भत्ता (DA) 3 टक्क्यांनी वाढेल. वाढीव महागाई भत्ता 1 जुलै 2023 पासून लागू होईल. या प्रकरणी केंद्र सरकारकडून सध्या कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. सध्या, मंत्रिमंडळाकडून सरकारच्या मंजुरीची तारीख देखील समाविष्ट नाही..