Take a fresh look at your lifestyle.

Damini App : शेतकऱ्यांनो, आता फक्त 15 मिनिटांत ओळखता येणार वीज कुठे पडणार? पहा कसा कराल ॲपचा USE..

सध्या राज्यात शेतकऱ्यांची खरीप हंगामाची लगबग सुरू झाली आहे. बियाण्यांची खरेदी हा शेतकऱ्यांसाठी जितका महत्त्वाचा विषय तितकाच विजेमुळे होणारी हानी हा देखील चिंतेचा विषय आहे. जून – जुलै महिन्यात वीज पडून जीवितहानी घडण्याचे प्रकार संपूर्ण देशभरात घडतात. त्यामुळे विजेपासून बचाव करण्याच्या उद्देशान भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने ‘दामिनी’ ॲप तयार केले आहे.

तुम्ही ज्या भागात राहता त्या भागात पुढच्या 15 मिनिटांत वीज पडणार की नाही, ते या ॲपच्या माध्यमातून समजते, वीज पडून मृत्यू झाल्याच्या घटना दरवर्षी हातात, परंतु या ॲपमुळे या घटना कमी होण्याची शक्यता आहे.

दरवर्षी अनेक शेतकरी आणि जनावरे यांना वीज पडल्यामुळे आपला जीव गमवावा लागतो. झाडे, इमारती याचेही नुकसान होते. त्यामुळे वीज अंगावर पडू नये, यासाठी आपण वैयक्तिक स्तरावर काळजी घेणे गरजेचे असते.

उपयुक्त अशा या ॲपच्या माध्यमातून शेतकरी नागरिकांचा जीव वाचण्यास मदत होणार आहे. जून – जुलै महिना लक्षात घेत महाराष्ट्रातील जिल्हा प्रशासनाने दामिनी ॲप वापरण्याचे आवाहन केले आहे. जगभरात दरवर्षी 28 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय बीज सुरक्षा दिवस म्हणून साजरा केला जाता. पुण्यातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टॉपिकल मेंटरोलॉजी, ही भारत सरकारच्या पृथ्या विज्ञान,मंत्रालयाअंतर्गत येणारी स्वायत संशोधन संस्था आहे. या संस्थन 2020 मध्ये ‘दामिनी लाइटनिंग’ ॲप विकसित केले आहे. संस्थेने वीज प्रवण क्षेत्र अचूकरित्या शोधण्यासाठी देशभरात 83 ठिकाणी लाइटनिंग लोकेशन नेटवर्क उभारले आहेत .

बाकीच्या जीपीएस लोकेशेनद्वारे तो राहत असलेल्या ठिकाणापासून 20 ते 40 किलोमीटर अंतरावर वीज पडणार का नाही, याची पूर्वसूचना हे ॲप देते.

वीज पडल्यानंतर …

एखाद्या व्यक्तीवर वीज पडल्यास तुम्ही त्याच्यावर प्रथमोपचार करू शकता.

वीज पडून जखमी झालेल्या व्यक्तीला तुम्ही स्पर्श करू शकता.

जर व्यक्तीचा श्वासोच्छवास थांबला असेल, तर त्याला कृत्रिम श्वासोच्छ्वास द्या.

हृदयाचे ठोके थांबले असल्यास कार्डिआक कॉम्प्रेशनचा वापर करा.

अंगावर भाजल्याच्या खुणा, हाडाच्या इजा किंवा इतर काही जखमा आहेत का ते तपासून पाह.

गरज पडल्यास संबंधिताला दवाखान्यात घेऊन जा..

काय करावे, काय करू नये..

उंचीच्या जागाखाली आश्रय घेणे टाळा.

दारे, खिडक्या बंद करा.

गाडीत असाल तर काचा बंद करा.

धातूच्या वस्तू जसे छत्री, चाकू, भांडे यापासून दूर राहा.

धरण, तलाव अशा पाण्याच्या ठिकाणांपासून लांब राहा.

टेलिफोन किंवा विजेच्या खांबाखाली थांबू नका.

विजा चमकत असताना मोबाइल फोनचा वापर कधीच करू नका.

सायकल, मोटारसायकल, उघडा ट्रॅक्टर किंवा घोडा यांच्यावरील प्रवास थांबवा, वाहत्या पाण्याशी संबंध येईल अशी कोणतीही गोष्ट करू नका.

दामिनी ॲपचा वापर कसा कराल ?

दामिनी ॲप गुगल प्ले (Google Play Store स्टोअरवरून डाउनलोड करा.

लिंक – Damini : Lightning Alert

ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला जीपीएस लोकेशन (GPS Location) चालू करण्याची परवानगी द्यावी द्या.

ॲप नंतर तुमचे लोकेशन शोधेल, त्यानंतर तुमच्या स्थानापासून 40 किलोमीटर अंतरापर्यंत एक वर्तुळ काढेल. त्यानंतर पुढील 15 मिनिटांत तुमच्या भागात वीज पडण्याची शक्यता आहे की नाही हे ते तुम्हाला सांगेल. या प्रक्रियेला थोडा वेळ लागेल.

विजा न पडल्यास, विजेचा इशारा नाही असे चिन्ह असेल. परंतु जर विजा पडणार असेल आणि त्या वर्तुळात लाल रंग दिसत असेल तर याचा अर्थ पुढील 5 मिनिटांत तुमच्या परिसरात वीज पडण्याची शक्यता आहे.

Screenshot image 3

जर वर्तुळ पिवळा रंग दर्शवित असेल तर 5 ते 10 मिनिटांत विजा पडण्याची शक्यता आहे आणि जर ते निळे असेल तर 10 ते 15 मिनिटांत विजा पडण्याची शक्यता आहे.

खबरदारीची सूचना या ॲपवरील सूचना पर्यायामध्ये तुम्ही लाइटनिंग स्ट्राइक एरियामध्ये असाल तर कोणती खबरदारी घ्यावी याच्या सूचना आहेत. या ॲपवरील रजिस्टर पर्यायावर क्लिक करून तुम्ही येथे नोंदणी करू शकता.

नाव, मोबाईल नंबर, पत्ता, पिनकोड, व्यवसाय अशी माहिती भरून तुम्ही या ॲपवर नोंदणी करू शकता.

त्यानंतर तुम्हाला तुमच्या क्षेत्रातील वीज खंडित होण्याबाबत आगाऊ सूचना दिली जाते. जून-जुलै महिना लक्षात घेता महाराष्ट्रातील जिल्हा प्रशासनाने दामिनी ॲपचा वापर करण्याचे आवाहन सामान्य जनतेने केले आहे.