Take a fresh look at your lifestyle.

OPS : केंद्र सरकारचं मोठं गिफ्ट..! ‘या’ कर्मचाऱ्यांना मिळणार जुन्या पेन्शन योजनेचा लाभ; 20 लाखांच्या ग्रॅच्युइटीसह मिळणार जबरदस्त फायदे..

केंद्र सरकारने दीर्घ प्रतीक्षेनंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांना एक गुड न्यूज दिली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनेचा लाभ मिळणार आहे. यानंतर आता केंद्रीय कर्मचाऱ्यांची चांदी होणार आहे. मात्र, सर्व कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळणार नाही. कारण सरकारने जारी केलेल्या नवीन अपडेटनुसार, फक्त काही निवडक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना (OPS) निवडण्याची संधी दिली जात आहे.

अशा स्थितीत केंद्रीय कर्मचार्‍यांना प्रश्न पडला आहे की ते जुन्या पेन्शन अंतर्गत लाभासाठी पात्र आहेत की नाही ? तुम्ही केंद्र सरकारचे कर्मचारी असाल आणि तुम्ही जुन्या पेन्शन योजनेच्या लाभार्थ्यांपैकी आहात की नाही ? हे जाणून घ्यायचं असेल तर ही बातमी नक्की वाचा..

जुन्या पेन्शन योजनेचा (OPS) कोणत्या कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ ?

जुन्या पेन्शनबाबतच्या नवीन अपडेटनुसार, नॅशनल पेन्शन सिस्टिमच्या अधिसूचनेच्या तारखेपूर्वी जाहिरात केलेल्या किंवा अधिसूचित पदांखालील केंद्र सरकारच्या सेवेत सामील होणारे कर्मचारी अर्थात NPS 22 डिसेंबर 2003 रोजी केंद्राच्या नागरी सेवा (पेन्शन) नियम, 1972 (आता 2021) अंतर्गत जुन्या पेन्शन योजनेत सामील होण्यास पात्र आहेत.

सोप्या शब्दात समजून घ्या.. जर एखादा कर्मचारी 22 डिसेंबर 2003 पूर्वी झालेल्या भरतीतून सरकारी नोकरीत रुजू झाला असेल, तर त्याला जुन्या पेन्शनचा लाभ मिळेल. तर, 22 डिसेंबर 2003 नंतर जाहीर झालेल्या भरतीद्वारे नोकऱ्या मिळालेल्या कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनचा लाभ मिळणार नाही. त्यांना राष्ट्रीय पेन्शन योजनेअंतर्गत पेन्शन कवच दिलं जाणार आहे.

जुनी पेन्शन योजना निवडण्याची शेवटची तारीख जाणून घ्या..

जुन्या पेन्शन योजनेची निवड करण्यास पात्र असलेले सरकारी कर्मचारी 31 ऑगस्ट 2023 पर्यंत हा पर्याय वापरू शकतात. यासोबतच सरकारने हेही सांगितलं आहे की, जर पात्र कर्मचाऱ्यांनी 31 ऑगस्ट 2023 पर्यंत जुनी पेन्शन स्कीम (OPS) निवडली नाही तर त्यांना नवीन पेन्शन स्कीम (NPS) अंतर्गत पेन्शन दिली जाणार आहे.

दुसरीकडे, जर एखाद्या कर्मचाऱ्याने नवीन पेन्शन योजनेतून जुन्या पेन्शन योजनेत (NPS ते OPS) जाण्याचा पर्याय निवडला तर तो शेवटचा पर्याय मानला जाईल. याचा अर्थ तो पुन्हा नव्या पेन्शन योजनेत जाऊ शकणार नाही..

काय आहे, जुनी पेन्शन योजना (OPS)

आता आपण जाणून घेउया की, जुनी पेन्शन योजनेअंतर्गत (OPS) 2004 पूर्वी सरकार कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर निश्चित पेन्शन देत असे. ही पेन्शन कर्मचाऱ्याच्या निवृत्तीच्या वेळेच्या पगारावर आधारित होती. या योजनेत सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांनाही पेन्शनचा लाभ दिला जात होता. मात्र, केंद्र सरकारने 1 एप्रिल 2004 रोजी जुनी पेन्शन योजना बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर 2004 मध्ये जुन्या पेन्शन योजनेच्या जागी राष्ट्रीय पेन्शन प्रणाली सुरू करण्यात आली.

केंद्रीय कर्मचारी जुनी पेन्शन लागू करण्याची मागणी करत होते. जुन्या पेन्शन योजनेच्या तुलनेत नवीन पेन्शन योजना कमी सुविधा आणि फायदे देते असे त्यांचे मत आहे. यासोबतच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना नवीन पेन्शन स्कीम (NPS) मध्येही काही समस्या येत आहे.

जुन्या पेन्शन योजनेचे नेमके काय आहेत फायदे..

या योजनेंतर्गत कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या वेळी निम्मा पगार पेन्शन म्हणून दिला जातो.

जुन्या पेन्शन योजनेत निवृत्तीनंतर कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना पेन्शनची रक्कम दिली जाते.

या योजनेत पेन्शन देण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या पगारातून कोणत्याही प्रकारची कपात केली जात नाही.

जुन्या पेन्शन योजनेत निवृत्तीच्या वेळी कर्मचाऱ्यांच्या शेवटच्या मूळ वेतनाच्या 50 टक्के म्हणजेच निम्मी रक्कम पेन्शन म्हणून दिली जाते.

या योजनेद्वारे सेवानिवृत्तीनंतर वैद्यकीय भत्ता आणि वैद्यकीय बिलांची परतफेड करण्याची सुविधाही दिली जाते.

या योजनेत सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला 20 लाख रुपयांपर्यंतची ग्रॅच्युइटी रक्कम दिली जाते.