Take a fresh look at your lifestyle.

EPF Interest Calculation : 8.15% व्याजदराने किती मिळणार पैसा? तुमच्या खात्यातील ठेवींवर ‘हे’ सूत्र वापरून असे करा कॅल्क्युलेशन..

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) गेल्या आर्थिक वर्ष 2022-23 साठी व्याजदर 0.05 टक्क्यांनी वाढवून 8.15 टक्के केला होता. याला जुलैमध्ये अर्थ मंत्रालयाकडून मंजुरीही मिळाली आहे. EPFO च्या म्हणण्यानुसार, ऑगस्टच्या अखेरीस भविष्य निर्वाह निधी खात्यांमध्ये व्याज क्रेडिट सुरू होईल. हा पैसा देशातील 6.5 कोटी ईपीएफ ग्राहकांच्या खात्यात पोहोचण्यास सुरुवात होईल. परंतु, तुमच्या खात्यात किती व्याज जमा होईल हे जाणून घ्यायचे असेल, तर पद्धत अगदी सोपी आहे. एका छोट्या फॉर्म्युलावरून तुम्ही जाणून घेऊ शकता.. (EPF Interest Calculation)

EPF वर जास्त व्याजाचा लाभ..

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) च्या बोर्ड CBT ने 2022 – 23 या आर्थिक वर्षासाठी मार्च 2023 मध्ये EPF खात्यावर 8.15% व्याज निश्चित केले होते. यानंतर जुलै 2023 मध्ये अर्थ मंत्रालयाने याला मंजुरी दिली. भविष्य निर्वाह निधीवरील व्याज पूर्वीच्या तुलनेत वाढले आहे. 2021-22 या आर्थिक वर्षासाठी EPF खात्यावर 8.10 टक्के व्याज मिळत होते.

तुमच्या पगारातून EPF कसा कापला जातो ?

जर तुम्ही EPFO ​​कायदा पाहिला तर, कोणत्याही कर्मचाऱ्याच्या मूळ वेतन आणि DA चा 12% हिस्सा PF खात्यात जमा केला जातो. कंपनीच्या बाजूने कर्मचाऱ्याच्या PF खात्यात 12% योगदान देखील जमा केले जाते. कंपनीचे 3.67 टक्के योगदान ईपीएफ खात्यात जमा केले जाते. त्याच वेळी, पेन्शन योजनेत 8.33 टक्के पैसे जमा केले जातात..

आता समजून घ्या जास्त व्याजाचा तुम्हाला किती फायदा ?

आता EPF व्याजाच्या कॅल्क्युलेशन बद्दल एका उदाहरणाने समजून घेऊया..

समजा तुमच्या खात्यात एकूण 10 लाख रुपये आहेत, तर गेल्या आर्थिक वर्षात तुम्हाला 8.10% व्याजानुसार 81,000 रुपये मिळायचे. दुसरीकडे, EPF व्याजदर 8.15% पर्यंत वाढवून, या 10 लाख रुपयांवर 81,500 रुपये व्याज उपलब्ध होईल. व्याजात 0.05% वाढ करून, तुम्हाला रु.500 व्याजाचा लाभ मिळेल. जर 5 लाख रुपये जमा केले तर यावर्षी 40,750 रुपये व्याज मिळेल. येथे 250 रुपये फायदा झाला..

तुमची ईपीएफ शिल्लक आणि व्याज मिळाले की नाही हे कसे तपासायचे?

EPF शिल्लक घरबसल्या तपासता येते. यामध्ये अनेक ऑप्शन देण्यात आले आहेत. उमंग अँप, EPFO पोर्टल किंवा मोबाईल फोनवरून एसएमएसद्वारे ट्रेस करू शकतो..

EPFO पोर्टलवर जा (www.epfindia.gov.in).

ई-पासबुक ऑप्शनवर क्लिक करा.

नवीन पेजवर UAN, पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाकून लॉग इन करा.

लॉग इन केल्यानंतर, पासबुकसाठी मेंबर आईडी ऑप्शन निवडा.

पासबुक PDF फॉरमॅटमध्ये उपलब्ध असेल, जे डाउनलोड केले जाऊ शकते.

https://passbook.epfindia.gov.in/ या लिंकवरून तुम्ही थेट पासबुकवर प्रवेश करू शकता..