Take a fresh look at your lifestyle.

पुणे जिल्ह्यातील ‘या’ 5 तालुक्यांतील शेतकऱ्यांचा दसरा, दिवाळीही होणार गोड ; 250 कोटींचा निधी होणार वितरित ; पहा, गावांची नावे…

शेतीशिवार टीम : 22 सप्टेंबर 2022 :- पुणे जिल्ह्यातील जमीनदार, शेतकऱ्यांचा दसरा दिवाळीही गोड होणार आहे. पुण्याच्या रिंगरोडच्या (Pune Ring Road Project) कामांनी गती घेतली असून, रिंगरोडमध्ये क्षेत्र जाणाऱ्या शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला मिळणार आहे. जिल्हा प्रशासनाने रिंगरोडची खरेदीखते सुरू केली असून, आतापर्यंत 7 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले असून उर्वरित रक्कम खरेदीखताप्रमाणे जमा करण्यात येणार आहे.

जिल्हा प्रशासनाने रिंगरोडचे काम गतीने सुरू केले असून एमएसआरडीसी (MSRDC) आणि जिल्हा प्रशासन यांच्याकडून संयुक्तपणे हे काम सुरू केलं आहे.

तसेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (PMRDA) पश्चिम भागातील रिंगरोडच्या मार्गाला केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने हिरवा कंदील दिल्यामुळे या रस्त्याच्या मार्गातील सर्व अडथळे दूर झाले आहेत. त्यानुसार या प्रकल्पाचे काम सुरू करण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल पुढे टाकण्यात आले आहे.

त्यामुळे 80% भूसंपादन झाल्यानंतर रस्त्यांच्या कामाच्या निविदा काढण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (MSRDC) अधिकाऱ्यांनी सांगितले.

पहिल्या टप्प्यातील भूसंपादन तातडीने सुरू करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिलेल्या आहेत रिंगरोड प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी 250 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

या प्रकल्पाचा खर्च अंदाजे 17 हजार कोटींच्या घरात जाणार असून त्यासाठी पुणे शहराच्या चहुबाजुच्या खेड, मावळ, हवेली, पुरंदर आणि भोर या पाच तालुक्‍यांतून जाणार हा रस्ता तालुक्यातील 83 गावांमध्ये भूसंपादन करण्यात येणार आहे. या 5 तालुक्यातील अंदाजे 836 हेक्टर जमिन अधिगृहित करावी लागणार आहे. लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण होणार आहे. चोवीस महिन्यांत हे काम पूर्ण होणार आहे.170 किमी लांबीचा पुणे रिंगरोड हा आठ लेनचा असणार आहे. त्याचा वेग ताशी वेग 120 किमी असणार आहे.

या गावांतून जाणार रिंगरोड प्रोजेक्ट, पहा तालुकानिहाय गावांची नावे…

खेड :- खालुंब्रे, निघोजे, कुरळी, चिंबळी, केळगाव, आळंदी, मोई, चन्होली खुर्द, धानोरे, सोळू, मरकळ, गोळेगाव.

मावळ तालुका :- परंदवाडी, उसे, तळेगाव, वडगाव, कातवी, आंबी, वराळ, आकुर्डी, नाणोली तर्फे चाकण, इंदुरी, सुदवडी, सुदुंबरे.

भोर तालुका :- कांबरे, नायगाव, केळवडे

हवेली तालुका :- तुळापूर, भावडी, लोणीकंद, पेरणे, बकोरी, डोंगरगाव, वाडे बोल्हाई, गावडेवाडी, मुरकुटेनगर, बिवरी, पेठ, कोरेगाव मुळ, शिंदवणे, वळती, तरडे, आळंदी म्हातोबाची.

पुरंदर तालुका : दिवे, सोनोरी, चांबळी, हिवरे, कोडीत खुर्द, गराडे काळेवाडी

कसा असणार मार्ग हा मार्ग :-

1) पुण्याचा रिंगरोड प्रकल्प हा 6 पदरी असून एकूण 7 बोगदे, 7 अंडरपास, दोन नदीवरील आणि दोन रेल्वे मार्गावरील ओलांडणी पूल असणार आहे. यासाठी 860 हेक्टर जागा संपादन होणार आहे. या प्रकल्पाच्या भूसंपादनाचा एकूण खर्च अंदाजे 1434 कोटी असून महामार्ग बांधणीचा खर्च सुमारे 17 हजार 713 कोटी खर्च अपेक्षित आहे.

जिल्हा प्रशासनाने रिंगरोडची खरेदीखते सुरू केलेली आहेत. लवकरात लवकर पैसे वाटप करण्याचे धोरण स्वीकारले आहे. शेतकऱ्यांकडून देखील याला चांगला प्रतिसाद मिळत आहे .

– डॉ. राजेश देशमुख , जिल्हाधिकारी