Take a fresh look at your lifestyle.

नवनिर्वाचित सरपंच – सदस्यांना मोठा दिलासा! ग्रामपंचायत निवडणुकांचा खर्च सादर करण्याबाबत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय.

ग्रामपंचायत निवडणुकांतील सर्व उमेदवार टू व्होटर ॲपबरोबरच आता पारंपरिक पद्धतीनेदेखील (ऑफलाइन) निवडणूक खर्चाचा हिशेब सादर करू शकतात, असे राज्य निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे.

विविध जिल्ह्यांमधील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व पोटनिवडणुकांसाठी 5 नोव्हेंबर 2023 रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकांचा निकाल 6 नोव्हेंबर 2023 रोजी जाहीर करण्यात आला. त्यामुळे बिनविरोध विजयी झालेल्यांसह निवडणूक लढवलेल्या सर्व उमेदवारांनी 6 डिसेंबर 2023 पर्यंत निवडणूक खर्चाचा हिशेब सादर करणे आवश्यक आहे.

नक्षलग्रस्त दुर्गम भागात मात्र 7 नोव्हेंबर 2023 रोजी निकाल जाहीर करण्यात आला त्यामुळे तेथील बिनविरोध विजयी झालेल्यांसह निवडणूक लढवलेल्या सर्व उमेदवारांनी 7 डिसेंबर 2023 पर्यंत निवडणूक खर्च सादर करणे आवश्यक आहे.

पारंपरिक पद्धतीने खर्च सादर करण्याचा :- PDF फॉर्म

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, 1958 नुसार निवडणूक लढविणाऱ्या सर्व उमेदवारांना निवडणुकीच्या निकालानंतर 30 दिवसांच्या आत एकूण खर्चाचा हिशेब सादर करणे बंधनकारक आहे अन्यथा त्यांनाअपात्र अपात्र घोषित करण्यात येते.

सर्व उमेदवारांना टू व्होटर ॲपद्वारे निवडणूक खर्च सादर करणे बंधनकारक करण्यात आले होते; परंतु त्यात तांत्रिक अडचणी येत असल्याचे अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडून प्राप्त झाले होते. त्यामुळे आता ज्यांना टू व्होटर ॲपद्वारे निवडणूक दाखल करणे शक्य नाही, त्यांना पारंपरिक (ऑफलाइन) पद्धतीनेदेखील निवडणूक खर्चाचा हिशेब सादर करता येईल, असेही राज्य निवडणूक आयोगाच्या प्रसिद्धीपत्रकात केले आहे.