Take a fresh look at your lifestyle.

GST on house rent : आता 10 लाखांच्या लग्नावर तब्बल 1.50 लाख रु., तर घरभाड्यावरही 18% GST ; पहा केटरिंग व मंडपाचे कसे आहे GST कॅल्क्युलेशन…

शेतीशिवार टीम : 13 ऑगस्ट 2022 :- देशात दुध, दही, पनीर, आटा, डाळींसाहित जवळपास प्रत्येक खाण्या – पिण्याच्या पदार्थावर जीएसटी (GST) लागू करण्यात आला आहे. या GST मुळे सर्वसामान्य जनता महागाईने होरपळली आहे तर सरकार मालामाल झाले आहे. विरोधकांकडून जोरदार विरोध होत असून याला गब्बर सिंग टॅक्सम्हटलं आहे. आता भाड्याचे घरही या कराच्या कक्षेत आलं आहे. खरं तर, 18 जुलै रोजी GST कौन्सिलने केलेल्या बदलांमध्ये घरभाड्याशी संबंधित नियमांचाही समावेश करण्यात आला आहे.

या भाडेकरूंना भरावा लागणार GST :-

या नियमांनुसार आता काही विशेष परिस्थितीत घराच्या भाड्यावर GST भरावा लागणार आहे. यामध्ये, व्यवसाय किंवा कंपनीला घर भाड्याने दिल्यास, GST भरावा लागेल. नियमांनुसार, GST अंतर्गत नोंदणीकृत व्यवसाय किंवा व्यक्तीने भाड्याने घर घेतलं असेल, तर त्याला GST भरावा लागेल. भाड्यावर GSTचा हा नियम आतापर्यंत फक्त व्यावसायिक मालमत्तांवर लागू होता.

GST च्या या नियमात भाडेकरूला भरलेल्या करावर इनपुट टॅक्स क्रेडिटचा दावा करण्याची मुभा असणार आहे. परंतु, घर वैयक्तिक वापरासाठी भाड्याने दिले असले तरीही GST लागू होणार नाही. तसेच, व्यवसाय, कंपनी किंवा घर भाड्याने देणारी व्यक्ती GST अंतर्गत नोंदणीकृत नसली तरीही हा कर लागू होणार नाही…

घर भाड्यावर GST चे नियम :-

जर एखादी व्यक्ती जरीही GST मध्ये नोंदणीकृत नाहीये परंतु GST नोंदणीकृत व्यक्ती किंवा कंपनीला आपले घर भाड्याने दिलं, तर भाडेकरूला 18% GST भरावा लागणार आहे. जर भाडेकरू GST अंतर्गत नोंदणीकृत नसेल, तर कोणताही कर भरावा लागणार नाही, फक्त भाडेकरूला 18% जीएसटी भरावा लागणार आहे.

घरमालक GST मध्ये नोंदणीकृत नसला तरीही हा कर भरावा लागणार आहे. परंतु, जर घरमालक आणि भाडेकरू दोघेही GST मध्ये नोंदणीकृत नसतील, तर भाड्यावर GST चा हा नियम लागू होणार नाही. यासोबतच पूर्वीप्रमाणे वैयक्तिक वापरासाठी घर किंवा फ्लॅट भाड्याने घेणाऱ्यांना GST भरावा लागणार नाही.

10 लाखांच्या लग्नावर 1.50 लाखांपेक्षा जास्त GST :-

दिवाळीनंतर भारतात लग्नाचा हंगाम सुरू होईल. यासाठी लोकांनी आधीच मॅरेज हॉल, तंबू, केटरर्स, वॅगन आदींचे बुकिंग सुरू केलं आहे. त्यासाठी आगाऊ रक्कम आता भरावी लागेल आणि उरलेली रक्कम लग्न जवळ आल्यावर किंवा झाल्यानंतर द्यावी लागेल. मात्र या सर्व व्यवस्थेसाठी जी काही रक्कम दिली जाईल, त्यावर GST चा वेगळाच भार पडणार आहे.

हा भार एवढा मोठा आहे की, लग्नात वेगवेगळ्या सेवांसाठी 10 लाख रुपये खर्च होत असतील, तर या सेवांसाठी 1.5 लाखांहून अधिक GST भरावा लागेल. सर्वात जास्त 18% GST लग्नाच्या बागेवर (Marriage Garden) आकारला जातो म्हणजेच 2 लाखांच्या लग्नाच्या घरावर 36 हजार GST आकारला जातो.

1 लाखाच्या तंबू (Tent) वर 18 हजारांचा GST भरावा लागेल तर 1.5 लाखांच्या कॅटरिंगवर 27 हजार रु. GST आकारला जाईल…

कपडे आणि पादत्राणांवर GST :-

याशिवाय डेकोरेशन, बँड बाजा, फोटो-व्हिडिओ, लग्नपत्रिका, घोड्यांची मिरवणूक काढणे, ब्युटी पार्लर आणि लाइटिंगवरही 18% GST आकारला जातो. लग्नाच्या खरेदीसाठी वापरल्या जाणार्‍या उर्वरित वस्तूंवर GST चा दर पाहिला तर कपडे आणि पादत्राणांवर 5 ते 12% जीएसटी आकारला जातो.

तर सोन्याच्या दागिन्यांवर 3% GST आहे. म्हणजेच 3 लाख रुपयांचे दागिने खरेदी केल्यास 6 हजार रुपये GST भरावे लागतील. त्याचप्रमाणे बस-टॅक्सी सेवेवरही 5% GST आकारला जातो.

ऑनलाइन गेमिंग आणि हॉर्स रेसिंगवर GST :-

या महिन्याच्या अखेरीस किंवा सप्टेंबरच्या सुरुवातीला होणाऱ्या GST कौन्सिलच्या बैठकीत कॅसिनो, ऑनलाइन गेमिंग आणि हॉर्स रेसिंगवरील GST वर चर्चा केली जाईल. कर आकारणीसाठी गठित राज्यांच्या अर्थमंत्र्यांचा गट 1-2 दिवसांत आपला अहवाल अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना सादर करू शकतो. याबाबत मंत्रिगटाच्या अहवालावर बैठकीत चर्चा होणार आहे.

मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या मंत्र्यांच्या गटाने मागील अहवालात घोडदौड, ऑनलाइन गेमिंग आणि कॅसिनोच्या एकूण पेमेंटवर 28% GST लागू करण्याची शिफारस GST परिषदेला केली होती.