Take a fresh look at your lifestyle.

Men’s Rights : पत्नीविरोधात दाद मागण्यासंबंधी पतीलाही आहे हे 5 महत्वाचे अधिकार ! कोणता आहे कायदा ? पहा डिटेल्स..

कोणत्याही वैवाहिक नात्यामध्ये काही वाद झाल्यास असे आढळून येते की, त्या कुटुंबातील स्त्री कायद्याचा आधार घेत आपला जीवनसाथी अथवा त्याच्यासह त्या घरातील अन्य सदस्यांविरोधात न्यायालयात दाद मागते. मात्र, एखाद्या विवाहित पुरुषाची पत्नी त्याला त्रास देत असेल तर अशा पुरुषालाही न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार आहे.

जेव्हा एखादा मुलगा आणि मुलगी लग्न करतात तेव्हा त्यांच्यासाठी आणि दोन्ही कुटुंबांसाठी हा खूप आनंदाचा क्षण असतो. त्याचवेळी बहुतेक जोडपी त्यांचे नाते चांगले सांभाळतात. परंतु अनेक जोडप्यांमध्ये मारामारी, वाद अशा परिस्थितीत पतीच्या छळानंतर पत्नी कायद्याचा आधार घेत असल्याचे चित्र आहे. (Hindu Marriage Act, 1955 Men’s Rights  )

वास्तविक महिलांना राज्यघटनेत असे अनेक अधिकार दिलेले आहेत. ज्याद्वारे त्या न्यायालयात जाऊन न्याय मिळवू शकतात. पण अशा स्थितीत प्रश्न पडतो की नवऱ्यांचे काय ? त्यांना असे काही कायदेशीर अधिकार आहेत का ? तर याचे उत्तर होय असे आहे.

पुरुषांनादेखील अनेक कायदेशीर अधिकार आहेत. यामध्ये पती आपल्या पत्नीबद्दल तक्रार करू शकता आणि कोर्टात सर्वकाही बरोबर आढळल्यास त्याला न्यायही दिला जाऊ शकतो.

जर एखाद्या पतीने आपल्या पत्नीविरुद्ध कायदेशीर मदत मागितली तर तो हिंदू विवाह कायद्यांतर्गत पत्नीकडून भरणपोषणदेखील घेऊ शकता. तथापि, हे तेव्हाच शक्य आहे, जेव्हा पत्नी काम करते. याशिवाय पत्नीप्रमाणेच पतीही घटस्फोटासाठी न्यायालयात याचिका दाखल करू शकतो. तसेच स्वतः निर्माण केलेल्या मालमत्तेवर पतीचा अधिकार आहे.

विवाहित पुरुष कायदेशीर अधिकार..

पत्नीकडून मानसिक छळाची तक्रार..

पत्नीने केलेल्या हिंसाचार आणि छळाच्या विरोधात तक्रार

खोट्या हुंडा प्रकरणाची तक्रार गैरवर्तन आणि धमक्यांची तक्रार

उठसूठ माहेरच्या घरी राहण्याची तक्रार

पत्नीकडून मारहाणीची तक्रार

विवाहबाह्य संबंध अथवा अन्यत्र अफेअर असल्याची तक्रार

कोणता आहे कायदा ?

हिंदू विवाह कायदा -1955 अंतर्गत पत्नीकडून भरणपोषणाचा दावा करण्याच्या पतीच्या अधिकाराची तरतूद करण्यात आली आहे. हिंदू विवाह कायद्याच्या कलम 24 मध्ये मुलाबाळांच्या देखभालीची आणि पतीला होणाऱ्या कायदेशीर कारवाईच्या खर्चाची तरतूद आहे.

स्वतःच्या कमावलेल्या मालमत्तेवर हक्क :

कमावलेल्या मालमत्तेवर पुरुषाचा हक्क आहे. त्याच्या पत्नी किंवा मुलांचा यावर कोणताही अधिकार नाही. तो त्याला पाहिजे असलेल्या कोणालाही देऊ शकतो किंवा कोणालाही न देऊन ट्रस्टमध्ये रूपांतरित करू शकतो. या मालमत्तेवर कोणीही आपला हक्क सांगू शकत नाही. संबंधित पुरुषाने या मालमत्तेचे मृत्युपत्र तयार करून ते कुणाला सुपूर्द केले तर ती वेगळी बाब आहे. पण हे सर्व त्याच्या इच्छेवर अवलंबून असेल..

घटस्फोटासाठी याचिका दाखल करण्याचा अधिकार :

मित्रांनो, ज्याप्रमाणे महिला घटस्फोटासाठी याचिका दाखल करू शकतात, त्याचप्रमाणे पुरुषांनाही घटस्फोटासाठी याचिका दाखल करण्याचा अधिकार आहे. विशेष म्हणजे हा अधिकार वापरण्यासाठी पुरुषाला त्याच्या जोडीदाराच्या संमतीचीही गरज नसते. दडपशाही, जीवाची भीती, जोडीदाराने त्यांना सोडून जाणे किंवा मानसिक स्थिरता यासारख्या कारणांसाठी ते ही याचिका दाखल करू शकतात..

मानसिक छळाविरुद्ध पोलीस / कोर्टात तक्रार करण्याचा अधिकार : –

केवळ महिलाच नाही तर सध्या पुरुषांचाही मानसिक छळ होत आहे. एवढेच नाही तर अशा घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. मानसिक छळामध्ये कुटुंबीयांना भेटू न देणे, मित्र आणि नातेवाईकांना भेटू न देणे, त्यांना नपुंसक म्हणणे, त्यांना घराबाहेर काढणे, जास्त व्यत्यय आणणे, शारीरिक हिंसा करणे, वेदना किंवा इजा पोहोचवणे, अपमान करणे, वारंवार आत्महत्येची धमकी देणे, शाब्दिक किंवा भावनिक यांचा समावेश होतो. हिंसाचार इत्यादींचा समावेश आहे.

जर एखाद्या पुरुषाचा यापैकी कोणत्याही प्रकारे छळ होत असेल तर तो त्याच्या जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार करू शकतो. जर या प्रकरणाची तेथे सुनावणी झाली नाही, तर त्याला थेट मुख्य न्यायदंडाधिकारी म्हणजेच सीजेएम किंवा महानगर दंडाधिकारी यांच्याकडे तक्रार करण्याचा अधिकार आहे.

एकतर्फी घटस्फोटात मुलाचा ताबा घेण्याचा अधिकार :-

एकतर्फी घटस्फोट किंवा परस्पर संमतीशिवाय घटस्फोट झाल्यास, मुलाच्या ताब्यावर पुरुषाचाही समान अधिकार मानला जातो. मुलाचे भविष्य लक्षात घेऊन न्यायालय मुख्यतः मुलाचा ताबा आर्थिकदृष्ट्या सक्षम पालकांकडे सोपवते. जरी मूल अगदी लहान असेल आणि त्याला वाढवण्यास आई सक्षम आहे असा न्यायालयाचा विश्वास असेल तर न्यायालय त्याचा ताबा आईकडे देऊ शकते..