Take a fresh look at your lifestyle.

ब्रेकिंग : Police Bharti 2022 : गृह विभागाकडून 7231 जागांसाठी परीक्षेचं स्वरूप जाहीर ; ‘या’ तारखेपासून भरती प्रक्रियेला होणार सुरुवात…

शेतीशिवार टीम, 29 जून 2022 : महाराष्ट्र पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक अतिशय महत्वाची बातमी आहे. सध्या राज्यासह भारतभर नगरविकास मंत्री शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे सरकार अल्पमतात आलं आहे. तर दुसरीकडे भाजपमध्ये सरकार पडणासाठी जोरदार हालचाली सुरु केला आहे.अशातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकाकारने निर्णयांचा सपाटा लावून काल 2 मोठ्या घोषणा केल्या 1 म्हणजे औरंगाबाद जिल्ह्याचं नामकरण तर तुसरी घोषणा म्हणजे 7 हजार 231 पदांची मेगा भरती…

पोलीस भरतीबाबत गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले, ठाकरे सरकारने दोन टप्प्यात पोलिस भरती करण्याचे ठरविले होते. त्यात 5 हजार पोलिसांची भरती झाली आहे. लवकरच 7 हजार 231 पोलिसांची भरतीसाठी नियमांच्या बदलण्याची आवश्यकता होती. त्यानूसार आज बैठक त्याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्याच्या गृह विभागाकडे तब्बल सद्यस्थितीत 49 हजार 851 पदे रिक्त असून जून महिन्यात 2020 मध्ये 7 हजार 231 पदांची मेगा भरतीबाबत घोषणा झाले होती, परंतु कोरोनामुळे ही भरती प्रक्रिया लांबली होती. त्यानंतर महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राज्यात येत्या काही दिवसातच 7231 पदांची पोलीस भरती सुरु होणार असल्याची माहिती विधानसभेत विधानसभेत दिली होती.

आता याच पार्श्वभूमीवर जून महिन्याच्या 2020 मध्ये जाहीर झालेल्या 7 हजार 231 पदांचीच भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असून याबाबतचं सर्व नियोजन गृहविभागाकडून करण्यात आलं आहे. परंतु ही भरती कधी सुरु होणार ? पहिल्यांदा लेखी परीक्षा की मैदानी ? याबाबत स्पष्टता झालेली नसल्याने उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

परंतु आता हा संभ्रम दूर झाला असून गृह विभागातर्फे ही भरती प्रक्रिया जुलै ते ऑगस्ट महिन्यात राबवण्यात येणार असून यामध्ये 7 हजार 231 पदे भरली जाणार आहे. याबाबत सर्वात महत्वाचं अपडेट म्हणजे ही भरती प्रक्रियेत उमेदवारांची पहिल्यांदा मैदानी चाचणी होणार असल्याची माहिती राज्याचे गृह मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. ग्रामीण भागातील अधिक – धिक बेरोजगार तरुणांना पोलिस सेवेत संधी मिळावी, या हेतूने हा निर्णय घेण्यात आला आहे.

ग्रामीण भागातील तरुणांसाठी मोठी सुवर्णसंधी :-

पोलीस भरती प्रक्रियेत ग्रामीण भागातील तरुणांना पोलिस भरतीत अधिक – धिक संधी मिळावी म्हणून पोलीस भरतीत बदल करून तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी पहिल्यांदा लेखीऐवजी मैदानी चाचणी घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे ग्रामीण भागातील तरुणांना याचा अधिक लाभ झाला होता.

परंतु 2014 नंतर भाजप सरकार आल्याने या प्रक्रियेत बदल करून आधी लेखी परीक्षा घेण्यात आली, त्यानंतर 2019 च्या पोलीस भरती प्रक्रियेत महाविकास आघाडी सरकारने भरती पध्दतीत बदल करून सर्वप्रथम मैदानी चाचणी घेण्याचा निर्णय घेतला. जेणेकरून ग्रामीण तरूणांना पोलिस भरतीत सर्वाधिक संधी मिळेल हा हेतू होता. पण, त्याची अंमलबजावणी आता आगामी भरतीवेळी केली जाणार आहे.

पात्रता :-

12 पास
महिला उंची :- 155 सेंमी
पुरुष उंची :- 165 सेंमी

उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्ष व जास्तीत जास्त 25 वर्ष (मागासवर्गीय उमेदवारांना पाच वर्ष शिथिल)

मैदानी परीक्षेचं कसं असणार स्वरूप :-

मैदानी चाचणीमध्ये पहिल्यांदा धावणे, गोळाफेक, त्याचबरोबर 100 मीटर धावणे, असं या मैदानी चाचणीचे स्वरूप असणार आहे.

पुरुष उमेदवारांसाठी मैदानी चाचणी :-

शारीरिक चाचणी (50 गुण) :-

जे उमेदवार शारीरिक व शैक्षणिक अर्हता पूर्ण करतात अशा उमेदवारांनी शारीरिक योग्यता चाचणीसाठी उपस्थित राहणे
आवश्यक असेल.

(1) पुरुष उमेदवार गुण

(i) 1600 मीटर धावणे :- 20 गुण
(ii) 100 मीटर धावणे :- 15 गुण
(iii) गोळाफेक :- 15 गुण

एकूण :- 50 गुण

महिला उमेदवारांसाठी मैदानी चाचणी :-

(i) 800 मीटर धावणे :- 20 गुण
(ii) 100 मीटर धावणे :- 15 गुण
(iii) गोळाफेक :- 15 गुण

एकूण :- 50 गुण

लेखी चाचणी (100 गुण) :-

() शारीरिक योग्यता चाचणी मध्येकिमान 50 टक्के गुण मिळविणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गांमधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या 1 : 10 या प्रमाणात 100 गुणांच्या लेखी चाचणीसाठी उपस्थित राहण्याकरिता बोलावण्यास पात्र असतील.

लेखी चाचणीमध्ये खालील विषय असणार समाविष्ट :-

(1) अंकगणित ;
(2) सामान्य ज्ञान व चालूघडामोडी
(3) बुध्दीमत्ता चाचणी ;
(4) मराठी व्याकरण.

लेखी चाचणीमध्येविचारण्यात येणारे प्रश्न बहुपर्यायी प्रकारचे असतील व ती मराठी भाषेत घेण्यात येईल.
लेखी चाचणीचा कालावधी 90 मिनिटे इतका असेल.

उमेदवारांना लेखी परीक्षेमध्येकिमान 40% गुण मिळवणे अनिवार्य आहे. लेखी परीक्षेमध्ये 40%
पेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील.

संपूर्ण नवीन GR वाचनासाठी – येथे क्लिक करा