Take a fresh look at your lifestyle.

आता दिल्ली – मुंबईहून – ते थेट बँकॉक अन् तेही बाय रोड ! पहा असा आहे इंडिया – म्यानमार -थायलंडचा त्रिपक्षीय Road Map..

देशात रस्ते आणि महामार्गांचे जाळे विणले जात आहे. प्रत्येक मोठ्या शहरादरम्यान उत्कृष्ट एक्सप्रेस – वे बांधल्यामुळे, प्रवासाचा वेळही झपाट्याने कमी होत आहे. ही देशामधील गोष्ट आहे, पण आता तुम्ही रस्त्याने परदेशात फिरायला जाऊ शकता. होय, नक्कीच,जे तुम्ही वाचताय ते खरं आहे, भारत त्याच्या सर्वात मोठ्या रस्ते प्रकल्पावर काम करत आहे, जो 3 देशांना एकत्र जोडला जाणार असून त्या एक्सप्रेस वेचे काम अंतिम टप्पात आलं आहे.

या रस्त्याने भारतातून थेट म्यानमार आणि थायलंडला जाता येणार असून या महामार्गाला भारत – म्यानमार – थायलंड त्रिपक्षीय महामार्ग (IMT Highway) म्हटलं आहे. हा 1,360 किलोमीटर लांबीचा महामार्ग 4 लेनचा करण्यात येणार आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला 2-2 लेन असणार आहे. भारताने लुक ईस्‍ट पॉलिसी अंतर्गत या महामार्गाचे बांधकाम सुरू केले आहे. हा महामार्ग भारतातील मोरेह (आसाम) येथून निघून म्यानमार मार्गे थायलंडमधील माई सोत इथपर्यंत आहे.

काय होणार फायदा..

या महामार्गाच्या माध्यमातून भारत आणि आशियाई देशांमधील व्यापार वाढीस चालना मिळणार आहे.याशिवाय भारत आणि आशियादरम्यान बांधण्यात येत असलेल्या मुक्त व्यापार कॉरिडॉरलाही बळकटी दिली जाईल. यामुळे व्यापार, ट्रेड, शिक्षण आणि पर्यटन क्षेत्रांनाही मदत होईल आणि आशियाशी भारताचा व्यापार अधिक मजबूत होईल. पर्यटनाच्या दृष्टिकोनातून, दिल्ली किंवा मुंबईहूनही थायलंडला रस्त्याने जाता येणार असून पर्यटकांना वाटेत अनेक सुंदर नजारे पाहायला मिळतील.

असा असणार रोड मॅप..

कोलकाता – बँकॉक महामार्गाची एकूण लांबी 1360 किलोमीटर आहे. त्याचा बहुतांश भाग भारतात येतो. त्यात थायलंडमध्ये सर्वात कमी वाटा आहे. थायलंड आणि भारतात या महामार्गाचे बांधकाम जवळपास पूर्ण झाले आहे. या प्रकल्पाचे म्यानमारमध्ये काम प्रगतीपथावर आहे.

भारत आणि म्यानमार दरम्यानचा हा महामार्ग दोन विभागात बांधला जात आहे. यामध्ये 120.74 किमी कालेवा – यागी आणि 149.70 किमी तमू – किगॉन -कलेवा (TKK) विभागांचा समावेश आहे. तामू – कायगोन – काळेवा विभागातील अप्रोच रस्त्यांसह 69 पुलांच्या बांधकामाचाही समावेश आहे. TKK विभाग नोव्हेंबर 2017 मध्ये आणि कालेव – यज्ञी विभाग मे 2018 मध्ये पूर्ण झाला. आता या दोन्ही विभागांवर महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे.

हा त्रि – राष्ट्रीय हायवे कोलकात्यापासून सुरू होतो आणि उत्तरेला सिलीगुडीपर्यंत जातो. पुढे कूचबिहारमार्गे ते बंगालमधून श्रीरामपूर सीमेवरून आसाममध्ये प्रवेश करेल. दिमापूरहून नागालँडमध्ये प्रवेश करेल. मणिपूरमधील इंफाळजवळील मोरेह नावाच्या ठिकाणी हा महामार्ग म्यानमारमध्ये प्रवेश करेल. म्यानमारच्या मंडाले, नेपीडाव, बागो, यंगून आणि म्यावाड्डी शहरांमधून माई सॉट मार्गे थायलंडमध्ये प्रवेश करेल..

आणखी 3 देशांना जोडण्याची योजना..

भारताची तयारी केवळ म्यानमार आणि थायलंडला रस्त्याने जोडण्याची नाही, तर भविष्यात आणखी 3 देश या योजनेद्वारे जोडले जाणार आहे. कंबोडिया, लाओस आणि व्हिएतनामसाठी रस्ते मार्ग विकसित करणे हे भारताचे उद्दिष्ट आहे. याअंतर्गत एकूण 3,200 किलोमीटरचे अंतर कापले जाणार आहे. व्हिएतनाम हा पूर्व आणि पश्चिमेचा आर्थिक कॉरिडॉर मानला जात आहे. हा कॉरिडॉर तयार झाल्यास भारताच्या जीडीपीला वार्षिक 70 अब्ज डॉलर्सचा फायदा होऊ शकतो.

नवीन मोटर नियम केले जाणार..

म्यानमार आणि थायलंड दरम्यानचा रस्ता तयार झाल्यानंतर नवे मोटर नियम केले जातील, असे संकेत भारताने दिले आहेत. यामध्ये प्रत्येक भारतीयाला तिन्ही देशांमध्ये वाहन घेऊन जाण्याची आणि चालवण्याची परवानगी असेल. यासाठी विशेष ड्रायव्हिंग लायसन्सही जारी केले जाऊ शकते. तसेच, सीमापार कराराद्वारे भारतीय नागरिकांना या दोन देशांमध्ये प्रवास करण्याचे स्वातंत्र्य दिले जाईल..