Take a fresh look at your lifestyle.

Malshej Ghat : माळशेज घाटात होणार देशातला पहिला ग्लास स्काय वॉक प्रोजेक्ट..

मुरबाड तालुक्यातील माळशेज घाटात प्रस्तावित काचेचा पूल प्रकल्पाला (ग्लास गॅलरी) शासनाच्या वित्त आणि पर्यटन विभागाने नुकतीच तत्त्वतः मान्यता दिली आहे. नागपूर येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. ‘खासगी – सार्वजनिक भागीदारी’ अथवा ‘बांधा वापरा आणि हस्तांतरित करा’ या तत्त्वाने हा प्रकल्प उभारावा, असेही बैठकीत ठरले असल्याची माहिती आ. किसन कथोरे यांनी दिली आहे.

माळशेज घाटातील पर्यटन विकासासाठी काचेचा पूल उभारण्याची संकल्पना आ. कथोरे यांनी मांडली असून, ते सातत्याने याबाबत पाठपुरावा करत आहेत. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान आयोजित विशेष बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रस्तावित ग्लास गॅलरी प्रकल्पाच्या सुरक्षिततेचे सर्व निकष पडताळून पाहण्याचे तसेच त्याची अचूक किंमत काढण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना बैठकीत दिले असल्याची माहिती आ. काथोरे यांनी दिली.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे माळशेज घाटाच्या माथ्यावरील पठारावर विश्रामगृह आहे. त्यालगतच्या जागेतच काचेचा पूल प्रकल्प उभारण्यात येईल. भारतात अशा प्रकारचा हा पहिला त्याबदल्यात वनविभागाला पर्यायी जागा देण्याचा प्रस्ताव प्रकल्प असेल. वनविभागाच्या जागेत हा प्रकल्प होणार असून वनविभागाकडे यासंदर्भात कार्यवाही सुरू असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

या प्रकल्पासाठी लागणाऱ्या अन्य परवानग्या मिळवण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने यापूर्वीच कार्यवाही सुरू केली आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या रस्त्यालगत असणाऱ्या सुविधांच्या निकपात हा प्रकल्प बसत असल्याची माहिती देण्यात आली.

या बैठकीला कृषीमंत्री धनंजय मुंडे, मदत, पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील आ. किसन कथोरे, ठाण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी मनीषा जायभाये धुळे, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी, राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यकारी अभियंता ज्योती शिंदे, अधीक्षक अभियंता नाग आदी उपस्थित होते. (स्काय वॉक)

कल्याण – नगर रस्त्याचे रुंदीकरण.

काचेचा पूल प्रकल्पाचे काम सुरू होण्यापूर्वी कल्याण – नगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 61 चे रुंदीकरण आणि कॉक्रीटीकरणाचे काम पूर्ण करण्यात यावे. त्यामुळे पर्यटकांना या प्रकल्पस्थळी येणे सोयीचे ठरेल, असेही बैठकीत ठरले.

काचेचा पूल प्रकल्पामुळे माळशेज घाटात देश- विदेशातील पर्यटक येतील. त्या माध्यमातून मुरबाडमधील स्थानिक आदिवासींना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळेल. पर्यटनाच्या माध्यमातून विकासाला चालना देणारा हा प्रकल्प ठरेल.

– किसन कथोरे, आमदार, मुरबाड