Kanda Anudan 2023 : अनुदानासाठी बाजार समित्यांमध्ये विक्रमी आवक, प्रतिक्विंटल मिळतंय 350 रुपये अनुदान, पहा PDF फॉर्म अन् अर्ज प्रोसेस..
सरकारने कांद्याचे बाजार भावतील घसरण आणि उपाय योजना यासाठी कांद्याला प्रतिक्विंटल 350 रुपये जाहीर केले. याबाबतचे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अनुदान जाहीर केले असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सरकारने 1 फेब्रुवारी 2023 ते 31 मार्च 2023 या कालावधीत कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना 350 रुपये प्रतिक्विंटल अनुदान जाहीर केले आहे.
ज्या शेतकऱ्यांनी कांदा एक फेब्रुवारी ते 31 मार्च कालावधीत कृषी उत्पन्न बाजार समिती यांकडे विक्री केली असेल त्यांच्यासाठी ही योजना आहे उत्पादन खर्च एवढाही भाव मिळत नसल्याने शेतकऱ्याची आर्थिक कोंडी होताना दिसते आहे. कांद्याचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर राज्य शासनाने प्रत्येक क्विंटल 350 रुपये अनुदान जाहीर केले. त्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला.
कांदा हे नाशवंत पीक असल्यामुळे व शेतकऱ्यांकडे साठवणुकीचे सुविधा उपलब्ध नसल्यामुळे बाजारात कांदा आणल्याशिवाय शेतकऱ्याला पर्याय नाही त्यामुळे दर कमी असूनही जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार आळेफाटा येथे कांद्याची आज विक्रमी आवक झाली.
पात्रता, कागदपत्रे शासन GR पाहण्यासाठी..
प्रति दहा किलोस 20 ते 100 रुपयांचा भाव..
शुक्रवारी 54 हजार कांदा पिशव्यांच्या वर आवक झाली असून कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे बराचसा कांदा उघड्यावर ठेवावा लागला आहे.
काल झालेल्या आळेफाटा उपबाजार लिलावात प्रतवारीनुसार 10 किलोसाठी बाजारभाव गोळा 100 ते 110 रुपये, कांदा नं. एक 70 ते 90, रुपये कांदा नं. दोन 50 ते 70 रुपये, कांदा नं. 3 सर्वाधिक आवक असून त्यास 20 ते 50 रुपये प्रति दहा किलोस भाव मिळाला, अशी माहिती आळेफाटा उपबाजार व्यवस्थापक प्रशांत महाबरे यांनी दिली.
कांदा अनुदान PDF फॉर्म मोफत डाउनलोड करा.