Take a fresh look at your lifestyle.

शेतकऱ्यांना मोठा दिलासा । 842.17 कोटी निधी वितरित ; 25% पिकविम्याचा मार्ग मोकळा ; ‘या’ तारखेपासून शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा..

शेतीशिवार टीम : 26 ऑगस्ट 2022 :- खरीप हंगाम 2022 मध्ये अतिवृष्टी, पूर परिस्थिती, इत्यादी नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झालेल्या पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना 25% पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून त्या संदर्भातील अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय घेण्यात आला आहे.

या शासन निर्णयामुळे पिक विमा योजना खरीप हंगाम : 2022 करता पहिल्या हप्त्यापोटी राज्य शासनाचा 842.17 कोटी एवढा निधी पिक विमा कंपन्यांना वर्ग करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे.

खरीप हंगाम : 2022 मध्ये पिक विमा योजना राबवत असताना 1 जुलै 2022 रोजी घेण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार, याचबरोबर केंद्र शासनाच्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार, पिक विमा कंपनीला गेल्या वर्षीच्या पीक विमा हप्त्याच्या 80% च्या 50% म्हणजे एकंदरीत पीक विमा योजना राबवण्यासाठी उपलब्ध केलेल्या निधीच्या 40% निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे.

खरीप हंगाम : 2022 मध्ये विविध भागांमध्ये राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे नुकसान झालं आहे. या सर्वांच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या 7 लाखांपेक्षा शेतकऱ्यांनी पीकविमा भरला असून त्यांनी नुकसान भरपाई साठी दावा देखील दाखल करण्यात आला आहे.

दावा दाखल केलेल्या शेतकऱ्यांना पात्र ठरवून त्यांना 25 टक्‍क्‍यांपर्यंत नुकसान भरपाई अदा करण्यासाठी पिक विमा कंपन्यांना निधीची गरज होती. तसेच ज्या जिल्ह्यांमध्ये अति जास्त नैसर्गिक आपत्ती ओढावली आहे, त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सुद्धा 50% पेक्षा जास्त नुकसान दाखवलं जाऊन त्यासाठी अधिसूचना काढण्यात येणार आहे.

या अधिसूचना काढल्यानंतर सुद्धा पिक विमा कंपन्याना 25% रक्कम ही अग्रीम हप्ता म्हणून वितरित करावी लागते. यासाठी आवश्यकता असते ती म्हणजे निधीची…या सर्वांच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेऊन 842.17 कोटी एवढा निधी वितरित करण्यासाठी शासन निर्णयाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात 5 सप्टेंबरपासून निधीचे वाटप सुरु होणार असून शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.

काय आहे शासन निर्णय ? कोणत्या विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना मिळणार विमा हप्ता ? किती तारखेपर्यंत होणार वाटप ? याबाबत माहिती जाणून घेण्यासाठी हा शासन निर्णय पहा

शासन निर्णय पाहणीसाठी :- इथे क्लिक करा