Take a fresh look at your lifestyle.

जमिनीचा 7/12 आपल्या नावे केव्हा होतो ? वर्ग-2 जमीन विक्रीची काय आहे प्रक्रिया ? जमीन NA कशी करतात ? जाणून घ्या सर्वकाही..

खरेदीखत जमीन विक्री केल्यानंतर होते. खरेदीखत झाल्यानंतर काही दिवसातच दुय्यम निबंधक कार्यालयातून अविवरण पत्रक तहसीलदार कार्यालयात पाठविले जातात. त्यानंतर संबधित तलाठी कार्यालयात हे विवरण पत्रक पाठविले जातात. त्यानंतर तलाठी सातबारावरील सर्वांना नोटीसा काढतात. नोटीस सही करून अल्यानंतर सातबारावरील जुनी नावे कमी होऊन नवीन मालकाची नावे नोंदाविली जातात..

वर्ग 2 च्या जमिनीच्या विक्रीसाठी काय आहे प्रक्रिया..

सातबारावर जमिनिचा प्रकार यामध्ये वर्ग 1 असा उल्लेख असेल तर प्रांत अधिकारी यांची परवानगीची आवश्यकता नसते, परंतु वर्ग 2 असे असल्यास परवानगीची आवश्यकता असते. कारण अशा जमिनी भोगवटदाराला केवळ कसण्याचा अधिकार असतो विकण्याचा नसतो.

सदर भोगवटदार हा या जमिनिचा कुळ म्हणून असतो, हि जमीन कुळ कायद्याने मिळालेली असते. थोडक्यात या जमिनी म्हणजे सरकारी मालमत्ता असतात. अशा जमिनीच्या विक्रीच्या परवानगीसाठी प्रांत ऑफिंस मध्ये खालील कागदपत्रांची पुर्तता करावी लागते..

1. जमिनीचा नवा 7/12
२. जमिनीवरील सर्व फेरफार उतारे
३. 8 – अ
४. जमीनीचा नकाशा
५. अर्ज

अर्जासोबत सर्व कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती जोडून प्रांत ऑफिस मध्ये दाखल करावेत.

सर्व कागदपत्रांची छाननी करून एका महिन्यात प्रांत ऑफिसरच्या परवानगीची प्रत मिळते. मिळालेल्या परवानगीमध्ये फक्त सहा महिन्याच कलावधी असतो. सहा महिन्यात जमीन विक्री करावी लागते अथवा सहा महिन्यांनी हि परवानगी संपते..

बिनशेती म्हणजे Non-agricultural (NA) जमीन कशी करतात ?

कोणत्याहि जमिनी मध्ये घर बांधावयाचे झाल्यास ती जमीन प्रथम बिनशेती करावी लागते. शेत जमीन किवा इतर कोणत्याही प्रकारच्या जमिनीमध्ये घर बांधता येत नाही.

जर शेत घर बांधावयाचे असल्यास स्वतः शेतकरी असावे लागते. त्याचप्रमाणे आपल्या शेत जमिनी असाव्या लागतात आणि ती शेती करावी लागते. आणि तसे पुरावे असावे लागतात..

जमीन बिनशेती करायची असल्यास आवश्यक कागदपत्रे..

1 जमिनीचा सातबारा
2 जमिनिचा नकाशा
3 टाउन प्लानिंगची परवानगी
4 अर्ज

सदर अर्जासोबत सर्व कागदपत्रे जोडून संबधित प्रांत अधिकारी किंवा तहसीलदार यांच्या कार्यालयात सदर करावे लागतात. जमिनीच्या नकाशामध्ये लागून रस्ते असल्यास अडचण येंत नाही पण तसे नसेल तर घरापर्यंत जण्याकरीता रस्ता दाखवावा लगतो. म्हणजेच सदर जमनीपर्यंत जाण्यासाठी रस्त्यासाठी जमीन विकत घ्यावी लागते.