Take a fresh look at your lifestyle.

💥महाराष्ट्र सोलर पंप अनुदान योजना : 2022💥

शेतीशिवार टीम, 13 मार्च 2022 : सध्या सोशल मीडियावर व म्हणजे सगळ्यात जास्त व्हाट्सअप वर 100% अनुदानावर सोलर पंप दिले जात आहे ही पोस्ट व्हायरल होत आहे. परंतु ही योजना खरी आहे का ? जर असेल तर त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा ? लॉटरी लागल्यानंतर काय कागदपत्रे द्यावी लागतील ? लाभ काय दिला जाईल ? ही सर्व माहिती आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे खाली दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा…  

मित्रांनो सर्वात प्रथम निर्माण झालेला गैरसमज असा आहे की, एस सी (SC) आणि एसटीच्या (ST) लाभार्थ्यांना Maha DBT पोर्टल वरती बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना राबवल्या जाणाऱ्या बाबी आहे.

या बाबींमध्ये सौर चलित पंप एक बाबी त्या ठिकाणी ऍड करण्यात आलेली आहे अन् ही बाब या ठिकाणी 95% अनुदानावर ते 100% अनुदानावर ती दिली जाते असा एक गैरसमज पसरवला जातोय.

एकंदरीत आपण जर पाहिलं की या ठिकाणी ही बाब या देण्यात आणि असून त्या बाबी करता अनुदानही दिलं जात आहे पण ही योजना फक्त एस टी (ST) प्रवर्गासाठी दिली जात आहे.

यासाठी ऑनलाईन अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने Maha DBT पोर्टलवरचं करायचा आहे. या योजनेसंदर्भात 26 ऑगस्ट 2021 रोजी एक शासन निर्णय घेण्यात आला आहे. या शासन निर्णयाच्या अधीन राहून ही योजना महाराष्ट्रामध्ये राबवली जात आहे. परंतु बऱ्याच शेतकऱ्यांना या योजने बद्दल काही माहिती नसते तर आज आपण या शासन निर्णय बद्दल जाणून घेऊयात…

Bore well / dug well with solar pump ( 5 hp ) for irrigation of land given under FRA 2006 या योजनेच्या मार्गदर्शक सुचनांना मंजूरी देणेबाबत…

केंद्र शासनाकडून दरवर्षी विशेष केंद्रीय सहाय्य अंतर्गत अनुदान, भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 275 (1) अंतर्गत व अदिम जमाती विकास कार्यक्रम या योजनाअंतर्गत राज्य शासनास अनुदान प्रदान होत असते. यानुषंगाने प्राप्त झालेल्या प्रस्तावांची सविस्तर छाननी करून निवडक प्रस्ताव केंद्र शासनाकडे सादर करण्यात येतात.

ही योजना आदिवासी विकास विभागामार्फत आदिवासी समाजाच्या विकासासाठी विविध कल्याणकरी योजना राबविण्यात येत आहे. आदिवासी जमातीतील शेतक -यांना सिंचनाच्या सुविधा पुरवुन शाश्वत कृषी उत्पन्न वाढीचा लाभ देणे व त्याच्यामार्फ़त त्यांच्या जिवनमानाचा दर्जा उंचावणे हे विभागाचे ध्येय आहे

वनहक्क कायदा 2006 अंतर्गत वनपट्टे मिळालेल्या अनुसूचीत जमातीच्या लाभार्थ्यांच्या शेतीच्या उत्पन्नात वाढ होण्याच्या दृष्टीने तसेच शेतीला पाणी पुरवठा करण्याकरीता विहीर / बोअरवेल करुन सोलार पंप बसविणे ह्या दृष्टीकोनातुन Bore well / dug well with solar pump ( 5 hp ) for irrigation of land given under FRA 2006 ही योजना केंद्र शासनास सादर करण्यात आली आहे.

या योजनेचा लाभ देण्यासाठी इच्छुक वनपट्टेधारक शेतक-यांसाठी पात्रतेचे निकष सदर समितीकडुन ठरविण्यात येणार आहे.

योजनेचा उद्देश

वनहक्क कायदा अंतर्गत वनपट्टे मिळालेल्या अनुसूचीत जमातीच्या लाभार्थ्यांना शेतीच्या उत्पन्नात वाढ होण्याच्या दृष्टीने शेतीला पाणी पुरवठा करण्याकरीता विहीर / बोअरवेल करुन सोलार पंप बसविणे.

2021-2022 साठी एकूण मंजूर निधी :- 18 कोटी 

आवश्यक कागदपत्रे :-

रहिवासी दाखला ,
जातीचा दाखला ,
वनहक्क कायद्याद्वारे वनपट्टा प्राप्त झाल्याचे प्रमाणपत्र ,
यापूर्वी सदर योजनेचा लाभ आदिवासी विकास अथवा अन्य विभागामार्फत घेतला नसल्याबाबत प्रमाणपत्र
विहीर / बोअरवेल प्रस्तावित असलेल्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता असल्याचे भुजल सर्व्हेक्षण यंत्रणेचे प्रमाणपत्र
किमान जमीन
जमिनीची कागदपत्रे
विहिर बांधली असेल तर त्याचे पुरावे.
सोलर पंपाचे कोटेशन

खर्चाचे अंदाजपत्रक :-

बोरवेल / डगवेल :- 2,50,000 लाख
सोलार पंप पॅनल (5 HP) :- 2,33,590 लाख
एकूण :- 4,83,590 लाख 

शासन निर्णय

अर्ज कसा करावा ?

महाराष्ट्र सौर पंप योजना 2022 अंतर्गत अर्ज करू इच्छिणारे राज्यातील इच्छुक लाभार्थी, नंतर खालील दिलेल्या मार्ग फॉलो करा.

1.सर्वप्रथम अर्जदाराला योजनेच्या ऑफिसियल वेबसाइट  जावे लागेल. ऑफिसियल वेबसाइट ला भेट दिल्यानंतर,होम पेज उघडेल.

2.या होम पेजवर तुम्हाला (Beneficiary Services) लाभार्थी सेवांचा ऑप्शन दिसेल. ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला New Consumer या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

3.पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एप्लीकेशन फॉर्म उघडेल. या एप्लीकेशन फॉर्ममध्ये, इत्यादी डिटेल्स भरावे लागतील. यानंतर तुम्हाला तुमची सर्व कागदपत्रे अपलोड करावी लागतील.

4. सर्व माहिती भरल्यानंतर, तुम्हाला सबमिट अर्जाच्या बटणावर क्लिक करावे लागेल. अशा प्रकारे तुमचा अर्ज भरणा पूर्ण होईल.

आपल्या शेतकरी, उद्योजक बांधवांसाठी :-   

शेतकरी बांधवानो आपण शेतीशिवार च्या माध्यमातून ज्या काही लेटेस्ट योजनांचे अपडेट जाणून घेत आहोत या सर्व योजना खऱ्या आहेत. प्रत्येक योजनेच्या मुळापर्यंत तुम्हाला पोहचता आलं तरच तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता. त्यामुळे जर तुम्हाला मोबाईल वरून फॉर्म भरण्यास काही अडचण येत असेल तर आपली शेतीशिवारच्या योजनेच्या बातमीची लिंक आणि तुमचे कागदपत्रे घेऊन जवळच्या जनसेवा केंद्र ( सेतू ) ला भेट द्या, त्या ठिकाणी तुम्ही तुमचा फॉर्म ऑनलाईन सबमिट करू शकता…

धन्यवाद… 🙏