Take a fresh look at your lifestyle.

MHADA Konkan lottery 2023 : घरे ५ हजार ३११, आठवडाभरात अर्ज आले फक्त १०२६, पहा कोकण मंडळात कुठे किती अर्ज ?

म्हाडाच्या कोकण मंडळाच्या माध्यमातून ५ हजार ३११ घरांसाठी नोव्हेंबर महिन्यात काढण्यात येणाऱ्या सोडतीसाठी १ हजाराहून अधिक अर्ज दाखल झाले आहेत. कोकण मंडळाच्या सोडतीसाठी यापूर्वी मे २०२३ मध्ये घरे उपलब्ध करण्यात आली होती, मात्र त्यावेळेस घरांना अत्यंत कमी प्रतिसाद मिळाला होता.

मे महिन्यात म्हाडाच्या कोकण मंडळाच्या माध्यमातून काढण्यात आलेल्या सोडतीत ४ हजार ६५४ घरांना चांगला प्रतिसाद मिळाला होता. आठवडाभरापूर्वी म्हाडा उपाध्यक्षांच्या हस्ते कोकण मंडळाच्या ५ हजार ३११ घरांसाठी सोडतीचा शुभारंभ करण्यात आला होता.

यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत १०१० सदनिकांचा समावेश आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अर्ज करणाऱ्या नागरिकांनी पीएमएवाय योजनेअंतर्गत नोंदणी करणे आवश्यक आहे. तथापि नोंदणी केलेली नसल्यास सोडतीतील यशस्वी अर्जदारांनी नोंदणी करणे बंधनकारक राहील. (MHADA Konkan lottery 2023)

कोकण मंडळातर्फे नियुक्त करण्यात आलेल्या संस्थेमार्फत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नोंदणी करण्याची सोय मंडळातर्फे उपलब्ध करून देण्यात आली आहे. नियमांनुसार शुल्काचा भरणा करून यशस्वी अर्जदार नोंदणी करून घेऊ शकतात. एकात्मिक गृहनिर्माण योजनेअंतर्गत १०३७ सदनिका, सर्वसमावेशक योजनेअंतर्गत ९१९ सदनिका, टीव्ही जर्नालिस्ट असोसिएशन यांच्यासाठी ६७ सदनिका

तर कोंकण मंडळाच्या प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेअंतर्गत विखुरलेल्या २२७८ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत .

मात्र आठवडा उलटून गेल्यानंतरही अनामत रक्कमेसह केवळ १०२६ अर्ज अधिक अर्ज दाखल झाले आहे. येत्या काळात अधिक प्रतिसाद मिळेल अशी अशा व्यक्त करण्यात आली आहे.

कोणत्या घरांना किती अर्ज..

योजना – एकूण घरे – अर्ज विक्री – अर्जस्वीकृती (अनामत रक्कमेसह दाखल अर्ज)

पीएमएवाय – १०१० – २१४ -८५

१५ टक्के एकात्मिक योजना – १०३७ – ४४० – १६७

२० टक्के – ९१९ – २००८ – ७२५

म्हाडा प्रकल्प – ६७ – ३ – १

प्रथम प्राधान्य – २२७८ – १२६ – ४८

एकूण – ५३११ – २७९१ – १०२६