Take a fresh look at your lifestyle.

Mumbai : आता दहिसर ते मीरा-भाईंदर फक्त 10 मिनिटात, 5.3 Km साठी 2000 कोटींचा खर्च, L&T बनवणार लिंक रोड, पहा रूटमॅप..

दहिसर ते मीरा – भाईंदर लिंक रोड बांधण्याची जबाबदारी एल अँड टी कंपनीकडे आली आहे. दहिसर ते भाईंदर दरम्यान 5.3 कि.मी. लांबीच्या लिंक रोडच्या बांधकामासाठी बीएमसी 1,981 कोटी रुपये खर्च करणार आहे. हा लिंक रोड तयार झाल्यानंतर दहिसर ते मीरा – भाईंदर हे अंतर अवघ्या 10 मिनिटांत कापता येणार आहे.

बीएमसीचे उपायुक्त उल्हास महाले म्हणाले की, 25 जुलै रोजी निविदा अंतिम करण्यात आली आहे. तीन कंपन्या जे. कुमार, L&T Afcons यांनी निविदा भरली होती. L&T वगळता, दोन्ही कंपन्यांनी निश्चित दराने निविदा भरल्या होत्या, तर L&T ने -0.86 टक्के निविदा भरल्या होत्या. त्यामुळेच या कंपनीला दहिसर – भाईंदर लिंक रोड बांधण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. वर्क ऑर्डर दिल्यानंतर कंपनीला 42 महिन्यांत प्रकल्प पूर्ण करावा लागणार आहे.

प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुढील तीन वर्षांसाठी देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी कंपनीची असेल, असे बीएमसीचे अतिरिक्त आयुक्त पी. ​​वेलारासू यांनी सांगितले. या प्रकल्पांतर्गत दहिसर खाडीवर सुमारे 100 मीटर लांबीचा पोलादी पूल बांधण्यात येणार आहे. एकूण 5.3 किलोमीटर उन्नत रस्त्यासाठी एकूण 330 खांब केले जाणार आहेत.

संपूर्ण रस्ता सिमेंट काँक्रीटचा होणार आहे. या लिंक रोडचा वापर दररोज 75 हजार वाहने करतील अशी बीएमसीची अपेक्षा आहे. याठिकाणी आधुनिक तंत्रज्ञानासह सात मजली वाहनतळ तयार करण्यात येणार असून, त्यामध्ये 550 वाहने उभी करता येतील. यासोबतच बस टर्मिनल आणि ट्रान्सपोर्ट हब देखील असेल, जे मेट्रोला जोडले जाईल.

कंपनीचे नाव 7 वर्षांत केलं निश्चित..

दहिसर – भाईंदर दरम्यानच्या या प्रस्तावित लिंक रोडची संकल्पना 2016 मध्ये समोर आली. मात्र 7 वर्षांनंतर आता ते बनवणाऱ्या कंपनीचे नाव निश्चित करण्यात आले आहे.

लिंक रोडचे वैशिष्ट्य..

BMC ने दहिसर ते भाईंदर या 5.3 किमी लांबीच्या कोस्टल रोडचे नियोजन केले आहे, जो कंदरपाडा मेट्रो स्टेशन लिंक रोड दहिसर (प.) पासून सुरू होईल आणि सुभाषचंद्र बोस ग्राउंड भाईंदर (पश्चिम) पर्यंत जाईल..