Take a fresh look at your lifestyle.

Mumbai Metro Line 3 : लवकरच आरे से BKC पर्यंत धावणार मेट्रो, 33 Km अंतरात हे आहेत 27 स्टेशन्स, पहा Metro चा संपूर्ण Route Map..

अजून फक्त 7 महिन्यांची प्रतीक्षा आहे, त्यानंतर आरे ते BKC पर्यंत मेट्रो-3 चे काम पूर्ण होईल आणि या मार्गावर मेट्रो धावण्यास सुरुवात होईल. 90 टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित 10 टक्के काम कोणत्याही परिस्थितीत डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण होईल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांनी चर्चगेट ते विधान भवनापर्यंत बांधण्यात येणाऱ्या मेट्रो – 3 मेट्रो स्टेशन्सची पाहणी केली. मुंबई मेट्रो लाईन – 3 (कुलाबा – वांद्रे – सीप्झ) ही मुंबईसाठी प्रस्तावित असलेली पहिली आणि एकमेव पूर्णपणे भूमिगत मेट्रो मार्ग आहे.

शहराची वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी तसेच पर्यायी वाहतूक सुविधेसाठी त्याचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे वाहतुकीचा ताण बऱ्याच अंशी कमी होऊन यासोबतच वायू आणि ध्वनी प्रदूषणही मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अशा आहे.

मेट्रो – 3 मार्ग मेट्रो-1, 2, 6 आणि 9 तसेच मोनोरेलला जोडला जाईल. याशिवाय उपनगरीय रेल्वे मार्ग मुंबईच्या विमानतळांशिवाय चर्चगेट आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जोडण्यात येणार आहे.

Mumbai Metro Aqua Line 3 – Route Map पाहण्यासाठी..

इथे क्लिक करा

मेट्रो-3 चा दुसरा टप्पा जून 2024 पूर्वी पूर्ण होईल, असे मुख्यमंत्र्यांना सांगण्यात आले. त्याचे दोन्ही टप्पे सुरू होताच रस्त्यांवरील सुमारे 6 लाख वाहनांचा भार कमी होणार आहे.

कुलाबा – वांद्रे – सिप्झ मेट्रो – 3 प्रकल्प : एका दृष्टीक्षेपात..

एकूण प्रकल्प पूर्ण – 81.5%

प्रकल्प बांधकाम पूर्ण – 92.8 %

स्थानकांचे बांधकाम – 89.8%

सिस्टम पूर्ण – 50.9%

रेल्वे मार्गाचे बांधकाम – 61.1%

डेपोचे 63% बांधकाम पूर्ण झाले असून 31 गाड्या देखभालीसाठी तयार आहेत.

विशेष गोष्टी..

कुलाबा ते SIPZ ही एकूण लांबी 33.5 किमी आहे.

या मार्गावर एकूण 27 स्थानके असून त्यापैकी 26 भूमिगत आहेत.

मेट्रो – 3 काळबादेवी, गिरगाव, वरळीलाही जोडेल..

2024 पर्यंत मेट्रो – 3 वर 8 – 8 डब्यांच्या 31 ट्रेन धावतील.

लोकल ट्रेनमधील 15 टक्के प्रवाशांना या मार्गावरून हलवण्यात येणार आहे.

पहिल्या टप्प्याची स्थिती ( आरे ते बीकेसी )

आरे ते बीकेसी पर्यंत पूर्ण झालेलं काम – 87.2%

प्रकल्प बांधकाम – 97.8%

स्टेशनचे बांधकाम पूर्ण – 93%

सिस्टम काम पूर्ण – 65.1%

रेल्वे ट्रॅकचे बांधकाम – 86.3%

ऑक्टोबर 2023 पर्यंत चाचणी सुरू होणार..

विशेष गोष्टी..

पहिल्या टप्प्यात 10 स्थानके असून त्यापैकी 9 भूमिगत आहेत.

पहिल्या टप्प्याचे एकूण अंतर 12.44 किमी आहे.

दोन गाड्यांमधील वेळ 6.5 मिनिटे आहे.

पहिल्या टप्प्यात 9 ट्रेन धावणार आहेत

दुसऱ्या टप्प्याची स्थिती (बीकेसी ते कफ परेड)

एकूण पूर्ण झालेलं बांधकाम – 76.9%

प्रकल्प बांधकाम – 95.3%

स्टेशनचे बांधकाम – 88.3%

सिस्टीम वर्क – 42.4%

रेल्वे ट्रॅकचे बांधकाम – 46.6%

हा मार्ग जून 2024 च्या आसपास सुरू होण्याचा अंदाज आहे.

विशेष गोष्टी..

एकूण स्टेशन 17

अंतर 21.35 किमी

दोन गाड्यांमधील वेळेत 3.2 मिनिटांचा फरक आहे.

दुसऱ्या टप्प्यातील गाड्यांची संख्या 22 आहे

मेट्रो लाईन – 3 स्टेशनची नावे :

कफ परेड, विधान भवन, चर्चगेट, हुतात्मा चौक, सीएसएमटी, काळबादेवी, गिरगाव, ग्रँट रोड, मुंबई सेंट्रल, महालक्ष्मी, विज्ञान संग्रहालय, आचार्य अत्रे चौक, वरळी, सिद्धिविनायक, दादर, शितलादेवी, धारावी, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, विद्यानगरी, सांताक्रूझ, CSIA टर्मिनल 1 (देशांतर्गत विमानतळ), सहार रोड, CSIA टर्मिनल 2 (आंतरराष्ट्रीय विमानतळ), मरोळ नाका, MIDC, SEEPZ आणि आरे कॉलनी (ओन्ली – ग्रेड स्टेशनवर)