Take a fresh look at your lifestyle.

Mumbai Metro14 : आता बदलापूर – कांजूरमार्गही मेट्रोने जोडणार.. 45Km अंतरासाठी 15,000 कोटींचा खर्च, पहा स्टेशन्स अन् रूटमॅप..

बदलापूर महापे कांजूरमार्ग या 45 किमी लांबीच्या मेट्रो 14 च्या प्रत्यक्ष कामकाजासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मेट्रो 14 मार्गिकेमुळे महानगर परीक्षेत्रातून कामानिमित्त मुंबईत धावणाऱ्या सर्वसामान्यांसाठी दिलासा मिळणार आहे. (Mumbai Metro14 line)

एमएमआरडीएने आठवड्यापूर्वीच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई अर्थात आयआयटी यांची किरमिजी रंग समर्पित मेट्रो 14 मार्गिकेच्या प्रकल्प अहवालाच्या मसुदा सर्वेक्षणासाठी निवड केली आहे. बदलापूर – महापे – कांजूरमार्ग या मेट्रो 14 मार्गिकेचे बदलापूर, अंबरनाथ, निळजे, शिळफाटा महापे , घणसोली या परिसरातून ठाणे खाडी पूल ओलांडून कांजूरमार्ग अशी मार्गरचना असणार आहे. हा मार्ग बदलापूर आणि कांजूरमार्गाला जोडला जाणार असून या प्रकल्पासाठी 14 हजार 898 कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

या 45 किमी मेट्रो मार्गिकेदरम्यान 15 स्थानके असून, 13 उन्नत व दोन्ही टोकांकडून प्रत्येकी 1 भूमिगत स्थानक असणार आहे. नियुक्त करण्यात आलेल्या आयआयटी मुंबई यांनी प्रकल्पाची व्यवहार्यता तपासण्यासाठी संरेखन पर्याय, प्रवासी संख्या अंदाज, प्रकल्प खर्च, भाडे रचना, भूसंपादन, आर्थिक आंतरराष्ट्रीय दर तसेच आर्थिक परताव्याचा दर व पर्याय अशा विविध बाजूंचा अभ्यास करणे अपेक्षित आहे.

नगरपालिकेने काही वर्षांपूर्वी सल्लागार म्हणून सादर केलेल्या मेट्रो 14 च्या तपशीलवार अहवालानुसार 37.9 किमी लांबीचा मेट्रो मार्ग सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्त्वावर उभारण्याची शिफारस केली होती. मात्र, सध्या हा प्रकल्प सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्त्वावर करायचा की, बांधा – वापरा – हस्तांतरित करा या तत्त्वावर उभारायचा याबाबत आर्थिक सुसाध्यता अहवालानंतरच निर्णय घेण्यात येणार असल्याचे एमएमएआरडीए अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

बदलापूर ते कांजूरमार्ग मेट्रो 14 वडाळा – घाटकोपर – कासारवडवली मेट्रो 4 , स्वामी समर्थ नगर जोगेश्वरी – कांजूरमार्ग मेट्रो 6 , कांजूरमार्ग रेल्वे स्थानक अशी 3 ठिकाणी आंतरबदल करून जोडण्यात येणार आहे. मुंबई महानगर परिक्षेत्र आणि पूर्व उपनगर जोडले जाणार असून, रस्ते व रेल्वे वाहतुकीवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे.

एमएमआरडीएने अंतर्गत अभ्यासानुसार 2041 मध्ये रहदारीची अपेक्षा आणि बदलापूरमध्ये 20 हेक्टरपेक्षा जास्त भूखंड कारडेपोसाठी प्रस्तावित करण्यात आला आहे. 2026 मध्ये 6.30 लाख, तर 2031 मध्ये 6.50 लाख आणि 2041 मध्ये 7.50 लाख प्रवासी संख्या असणार आहे.

लाइन-14 – क्रिमझन रेषा : विक्रोळी – कांजूरमार्ग – बदलापूर (45 किमी, 40 स्टेशन)

मुंबई मेट्रोचा संपूर्ण रूट मॅप पाहण्यासाठी

इथे क्लिक करा