Take a fresh look at your lifestyle.

Mumbai-Pune Expressway : 106 पॉइंट, 430 AI कॅमेरे, आत्तापर्यंत 800 ड्रायव्हरचे लायसन्स केले रद्द.. पहा NHAI चा नवा प्लॅन..

पुणे – मुंबई द्रुतगती मार्गावर अपघात नियंत्रणात आणण्यासाठी इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम (ITMS) बसवण्यात येत आहे. संपूर्ण मार्गावर 106 पॉइंट्स चिन्हित गेले आहेत, जिथे सुमारे 430 हायटेक कॅमेरे बसवले जात आहेत. हे कॅमेरे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) वर आधारित असतील. या प्रकल्पाशी संबंधित एका अधिकाऱ्याने सांगितले की, या कॅमेऱ्यांना झूम करून कारमध्ये बसलेल्या सर्व लोकांना ओळखता येईल. (Mumbai-Pune Expressway)

सर्व्हरवर गुन्हेगारांचा डेटा असल्यास कॅमेऱ्यांमधून मिळालेल्या फुटेजच्या मदतीने त्यांचाही शोध घेता येणार आहे. याशिवाय वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे, चालक झोपून जाणे, सीट बेल्ट न लावणे आणि वेग मर्यादेपेक्षा वेगाने वाहन चालवणे यासारख्या रस्ते सुरक्षेशी संबंधित गुन्ह्यांनाही आळा बसणार आहे.

सर्वात डिमांड असलेला एक्सप्रेस – वे :-

मुंबई – पुणे एक्सप्रेस – वे हा भारतातील सर्वात व्यस्त मार्गांपैकी एक आहे. या मार्गाचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने येथे रस्ते अपघातही वाढत आहेत. अपघात रोखण्यासाठी एक्सप्रेस – वे चे आधुनिकीकरण करणे गरजेचे झाले आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ITMS बसवण्याचे काम करत आहे.

एका अधिकाऱ्याने सांगितले की, एक्स्प्रेस वेच्या दोन्ही बाजूला ऑप्टिकल फायबर केबल टाकल्या जात आहेत, ज्यात सर्व कॅमेरे जोडले जातील. याशिवाय प्रत्येक चार किलोमीटर अंतराने वेग तपासणारी यंत्रणा बसवण्यात येणार आहे. वेग नियंत्रणासाठी विशेष यंत्रणा वापरण्यात येत आहे. लोणावळ्याजवळ ITMS नियंत्रण कक्ष बांधण्यात येत आहे. येथूनच कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध ई – चलान जारी केले जाणार आहे.

ओव्हर स्पीडिंग जीवघेणे..

वाहतूक विभाग आणि आरटीओच्या आकडेवारीनुसार एक्स्प्रेस वेवर 95 टक्के अपघात हे अतिवेगाने होत आहेत. या मार्गावरील वाहनांची मर्यादा ताशी 100 किमी ठेवण्यात आली असली तरी अनेक वेळा ताशी 150 किमी वेगाने वाहने चालवल्याची प्रकरणे वाहतूक विभागाकडे आली आहेत. विशेषत: वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी दर तासाला चार निगराणी वाहने संपूर्ण मार्गावर पहारा देतील. वाहन चालवताना सामान्य निष्काळजीपणा व्यतिरिक्त, रिफ्लेक्टर टेप नसणे, टेल लाइटमध्ये बिघाड, फॅन्सी नंबर इत्यादी प्रकरणांमध्ये या वाहनांवर देखील कारवाई केली जाणार आहे.

आकडेवारी काय सांगते ?

महामार्ग पोलिसांनी गेल्या वर्षी राज्यभरात एकूण 33,383 रस्ते अपघाताची नोंद केली, त्यापैकी 24,554 अतिवेगाशी संबंधित आहेत. त्यापैकी 11,493 मृत्यू झाले आहेत. 2021 पासून सतत ओव्हर स्पीडिंगमुळे अपघात वाढत आहेत. आरटीओने सांगितले की, एप्रिल 2022 ते मार्च 2023 पर्यंत नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सुमारे 12,000 खासगी बसेसवर कारवाई करण्यात आली आहे. यादरम्यान वाहनचालकांचे परवाने रद्द करणे, चालकांचे परवाने रद्द करण्याची कारवाईही करण्यात आली आहे..

800 चालकांचे परवाने रद्द..

गेल्या वर्षभरात 835 वाहनचालकांचे परवाने आरटीओने रद्द केले आहेत. याशिवाय 484 परवाने रद्द करण्यात आले आहेत. एका वर्षात सुमारे 64,000 प्रवाशांची चौकशी करण्यात आली, त्यापैकी 12,000 प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. अनेकवेळा परमिट न घेता किंवा परमिटच्या अटींचे उल्लंघन करून खासगी चालकांकडून बसेस चालवल्या जात असल्याचे आरटीओच्या तपासणीत आढळून आले आहे.

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये नाशिकजवळ एक रस्ता अपघात झाला होता, त्यात 11 जणांचा मृत्यू झाला होता. अपघात झालेल्या खासगी बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्याचे तपासात निष्पन्न झाले..