Take a fresh look at your lifestyle.

Mumbai-Pune Expressway : आता प्रत्येक 4Km वर असणार AI लेस कॅमेरे, ड्रॉयव्हरचा सीट बेल्टही दिसणार, नियम तोडला तर..

महाराष्ट्र राज्य सरकारने रस्ते अपघात कमी करण्यासाठी प्रयत्नांना वेग दिला आहे. याच क्रमाने मुंबई – पुणे एक्सप्रेस हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीमचे (HTMS) काम सुरू आहे. आता लवकरच ही यंत्रणा कार्यरत होणार आहे.

या सिस्टीममुळे वाहनांचा वेग मोजणे आणि नियमांचे उल्लंघन केल्यास शिक्षा होण्यास मदत होणार आहे. संपूर्ण यंत्रणा ऍटोमॅटिक असेल. रस्ते अपघात कमी करण्यासाठी परिवहन विभागाने गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील सर्व आरटीओंना मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.

HTMS मध्ये मुंबई ते पुणे दरम्यान 93 ठिकाणी हायटेक कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. हे कॅमेरे वाहनाचा वेग मोजू शकणार आहेत. हाय रिझोल्यूशनमुळे, चालत्या वाहनात चालकाचा सीट बेल्ट देखील दिसणार आहे. एआय सिस्टीमने सज्ज असलेले हे कॅमेरे वाहनाच्या नंबर प्लेटद्वारे संपूर्ण माहिती गोळा करून नियंत्रण कक्षाला अलर्ट पाठवू शकणार आहे. संपूर्ण मार्गावर असे 370 कॅमेरे बसवण्यात येत आहेत.

दर 4 किमीवर तपासला जाणार वेग..

एक्सप्रेस हायवेवरील वाढत्या अपघातानंतर HTMS सुरू करण्याची योजना आखली असताना दर 4 किमी अंतरावर वेग तपासण्यासाठी कॅमेरे असावेत, असा निर्णय घेण्यात आला. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, 4 किमी अंतरावर बसवण्यात आलेल्या स्पीड कॅमेऱ्यांच्या मदतीने संपूर्ण मार्गावरील वाहनाचा सरासरी वेग जाणून घेता येईल. जरी ड्रायव्हरने कॅमेऱ्यांशिवाय झोनमध्ये वेग घेतला, तरीही पुढील कॅमेरा वेळेनुसार पकडणारचं..

महामार्गाच्या बाजूला पार्किंगची समस्या..

या महामार्गावर अनेक ठिकाणी लोक नैसर्गिक सौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी थांबतात, तर कधी रेस्टॉरंटमध्ये थांबतात. अशा परिस्थितीत महामार्गाच्या कडेला वाहने उभी केल्याने अडचण निर्माण होते. या महामार्गावरील निवडक ठिकाणी अधिकृतपणे पार्किंग उपलब्ध करून देण्याची मागणी आयआरबी कंपनीकडून करण्यात आली आहे. या प्रस्तावावर राज्य सरकारच्या शिक्कामोर्तबाची प्रतीक्षा आहे. मात्र, HTMS चे 40 टक्के काम पूर्ण झाले असून सप्टेंबरपर्यंत ही यंत्रणा कार्यान्वित होणे अपेक्षित आहे.

ब्लॅक स्पॉटवरही काम सुरू..

गेल्या काही वर्षांतील अपघातांच्या वाढत्या आकडेवारीनंतर राज्याच्या परिवहन विभागाकडून एक अभ्यास करण्यात आला. हा अभ्यास प्रत्येक आरटीओच्या स्तरावर करण्यात आला. अपघातांच्या वारंवारतेच्या आधारे, राज्यभरात 1004 ब्लॅक स्पॉट्स शोधण्यात आले आहेत.

आरटीओने स्थापन केलेल्या विशेष पथकांचे काम ब्लॅक स्पॉट्समध्ये सुधारणा आणि अपघात कमी करण्यावर लक्ष ठेवण्याचे असेल. या वर्षीच्या जानेवारी ते मार्चमधील अभ्यास डेटाची जानेवारी – मार्च 2022 शी तुलना करण्यात आली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अपघातांमध्ये सुमारे 16 टक्के घट झाल्याचे अभ्यासात आढळून आले आहे.