Take a fresh look at your lifestyle.

Nashik Metro : मेट्रोसाठी 32Km अंतरासाठी 1600 कोटींचा निधी, केंद्रीय मंत्री गडकरींची माहिती, ‘हे’ असणार 30 स्टेशन्स, पहा, संपूर्ण Route Map..

केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी नाशिककरांसाठी महत्वाच्या प्रकल्पाची घोषणा केली आहे. नाशिकमध्ये लवकरच मेट्रो प्रकल्प सुरू करण्यात येणार असून, त्याचे काम दोन टप्प्यांत होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या प्रकल्पासाठी १६०० कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी दिली असून, या मेट्रोमध्ये चार लेन डबल डेकरच्या असतील, त्यामुळे नाशिकरोड ते द्वारकाचे ट्रैफिक कमी होईल, असा विश्वासही गडकरी यांनी व्यक्त केला.

नाशिक जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या 226 कि.मी लांबीच्या 1830 कोटींच्या प्रकल्पांचा लोकार्पण आणि कोनशिला अनावरणाच्या समारंभावेळी मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाला. या प्रसंगी ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, नाशिकमधून जाणाऱ्या सुरत – चेन्नई हायवेमुळे मोठी क्रांती होणार आहे. या प्रकल्पाची 80 हजार कोटी रुपये किंमत आहे. यापैकी 10 हजार कोटी रुपयांचे काम नाशिक जिल्ह्यात होणार असून सुरावरून फक्त 10 तासांत चेन्नईमध्ये पोहोचू शकणार आहे, असेही गडकरी यांनी यावेळी सांगितले

सुरत चेन्नई महामार्गाचे राज्यातलं अंतर किती ?

हा महामार्ग महाराष्ट्रातून 422 किलोमीटर अंतराचा असून 182 किलोमीटर नाशिक जिल्ह्यातून मार्ग जाणार आहे. या महामार्गात 4200 हेक्टर जमिनीचे भूसंपादन होणार आहे . यानिमित्ताने नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भरपूर पैसे मिळतील. ग्रामीण भागात रोजगार निर्मिती होईल. पुणे आणि मुंबई येथील ट्रॅफिक कमी होईल. उत्तर भारतातील लोक थेट नाशिकमधून दक्षिणेत जाऊ शकणार आहे,

मुंबई ते नाशिक सिक्स लेन सिमेंट काँक्रिटीकरण होणार :-

मी महाराष्ट्रात मंत्री असताना मुंबई – नाशिक हायवे बांधण्याचा निर्णय घेतला होता. मुंबई ते नाशिक संपूर्ण रस्त्याचे सिक्स लेन काँक्रिटीकरण होईल. वडपे हे महत्त्वाचे जंक्शन होईल. मुंबई ते दिल्ली एक लाख कोटी रुपयांचा हायवे बांधून पूर्ण झालेला आहे. 7 ते 8 तासांत दिल्लीला जाता येईल, या चांगल्या रस्त्यामुळे विकासाला गती मिळेल.

नाशिक जिल्हा एक्सपोर्ट इम्पोर्टमध्ये राज्यात नंबर एकचा जिल्हा बनेल. खरे तर भुजबळ यांनी त्याचवेळी नाशिक – पुणे रस्ता सहा लेन केला असता तर अशी वेळ आली नसती. भुजबळ यांनी रस्ता बांधला त्याचवेळी प्रॉब्लेम होता. अर्थात मी त्यांना दोष देत नाही, मला राजकारण करायचेही नाही, असेही गडकरींनी यावेळी सांगितले.

कसा असणार नाशिकचा मेट्रो प्रोजेक्ट..

नाशिक मेट्रो निओसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) RITES Ltd. ने तयार केला असून त्याला राज्य सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतर तो केंद्र सरकारच्या मान्यतेसाठी पाठवण्यात आला आहे. मेट्रोची एकूण लांबी 24 किमी फीडर मार्गांसह 2 लाईनसह 32 किमी असणार आहे.

नाशिक शहरासाठी एक महत्त्वाचा विकास करताना, वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत सार्वजनिक गुंतवणूक मंडळाने मूल्यांकनानंतर नाशिकसाठी मेट्रो निओ प्रकल्पाची शिफारस केली आहे. यापूर्वी, या प्रकल्पाला केंद्रीय अर्थसंकल्पात मोठी चालना मिळाली होती जिथे केंद्राने या प्रकल्पासाठी INR 2092 कोटींचा खर्च जाहीर केला होता.

मेट्रो निओ ही एक मास रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम आहे ज्याचा उद्देश नाशिकच्या लोकांना सुरक्षित, आरामदायी, विश्वासार्ह आणि ऊर्जा-कार्यक्षम वाहतूक प्रदान करणे आहे. महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (महा मेट्रो) द्वारे राबविण्यात येणारा हा महाराष्ट्रातील पहिला प्रकल्प आहे.

Nashik Metro संपूर्ण रोडमॅप पाहण्यासाठी खाली दिलेला लिंकवर क्लिक करा


Nashik Metro Route Map