Take a fresh look at your lifestyle.

पुणे शहरालगत तयार होतेय नवी स्मार्ट सिटी! रिंगरोडसह अनेक महामार्गांची कनेक्टिव्हिटी, फ्लॅट – जागा घेण्याची खरेदारांसाठी मोठी संधी..

शहरातील गर्दीपासून दूर, पण चांगल्या पायाभूत सुविधा हव्या असल्यास घर खरेदी करणाऱ्यांसाठी पुण्यातील रिअल इस्टेट डेस्टिनेशन म्हणून भूगावला महत्त्वाचे स्थान आहे. पुणे शहराच्या पश्चिमेला वसलेले व कोकणाकडे जाणाऱ्या महामार्गावर असलेले भूगाव झपाट्याने विकसित होत आहे. हा पुण्यातील एक नव्याने तयार झालेला बजेट परिसर आहे; जो सध्या रिअल इस्टेटचे ठिकाण म्हणून लोकप्रिय होत आहे.

शेती आणि त्याला जोडव्यवसाय करणारे हे छोटेसे गाव आज वेगाने बदलत आहे. पायाभूत सुविधा, रिंगरोड, प्रमुख राज्यमार्ग, शैक्षणिक संस्था, मुख्य शहराशी जोडणारा रस्ता, मानस लेक, प्रशस्त हॉटेल्स, रेस्टॉरंट यांसारख्या अनेक कारणांमुळे अनेकांचे लक्ष भूगावने वेधले आहे.

तसेच भूगावमधून पुणे – दिघी हा महामार्ग जात असून, येथून रायगड जिल्ह्यातील मुंबई – गोवा महामार्गाला माणगाव येथे जोडला जाणार आहे. याचा फायदा भूगावसारख्या अनेक गावांना होणार आहे. निसर्गसंपन्न असलेले भूगाव हे बालेवाडी, बावधन, कर्वेनगर, वारजे, औंध, बाणेर, हिंजेवाडी, डेक्कन जिमखाना आदी पुण्याच्या प्रमुख विकसित परिसरांशी जोडले गेले आहे.

तसेच नव्याने होत असलेल्या रिंगरोडद्वारे पुणे शहराबाहेरील अनेक भाग एकमेकांशी जोडले जाणार आहेत. पुणे – नाशिक , पुणे – मुंबई , पुणे – सातारा , पुणे – सोलापूर आणि पुणे – अहमदनगर हमरस्ते या रिंगरोडने जोडले जाणार आहेत.

हा रिंगरोड भूगावमधून जात आहे. यामुळे भूगावमधील रहिवाशांना पुण्याच्या अनेक भागात सहज प्रवास करता येणार आहे. भविष्यातील होणारे प्रकल्प लक्षात घेता, शहरापासू जवळ असलेल्या भूगाव येथे अनेक बांधकाम व्यावसायिक त्यांच्या कार्याचा विस्तार करण्यासाठी या क्षेत्रावर लक्ष केंद्रित करत आहेत.

भूगाव येथे मालमत्तेचे दर कोथरूड आणि इतर भागांपेक्षा कमी आहेत. भूगाव येथे प्रति चौरस फूट मालमत्तेचा दर 5 हजार रुपये ते 6500 रुपये आहे . कोथरूड हा जवळचा एक विकसित परिसर आहे आणि येथील मालमत्तेचा दर हा 11 हजार 500 इतका प्रति चौरस फूट इतका आहे. भूगाव हे हिंजवडी येथील आयटी हबपासून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर आहे.

येथे मायक्रोसॉफ्ट, बार्कले इन्फोसिस, टाटा टेक्नॉलॉजीज् इत्यादी सर्व प्रमुख आयटी कंपन्या आहेत. भूगावपासून फक्त 13 किलोमीटर अंतरावर बाणेर प्रसिद्ध व्यावसायिक केंद्र आहे यात अनेक मोठ्या कंपन्या, बँका मॉल्सदेखील आहेत.

भूगाव हे मुंबई – पुणे – साताऱ्याच्या अगदी जवळ आहे. त्यामुळे शहरात आणि मुंबई – सातारा या रस्त्यावर सहज जाता येते. नव्याने झालेल्या एनडीए चौक (चांदणी चौक ) येथील पूल येथील वाहतूककोंडी फोडण्यासाठी महत्त्वाचा ठरला आहे. कोथरूड, वारजे, बावधन तसेच मुंबई व साताऱ्याकडून विनाअडथळा भूगावकडे जाता येत आहे.

प्रमुख शिक्षण संस्था , हॉस्पिटल्स जवळच. .

भूगावमध्ये व जवळच सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीचा लवळे कॅम्पस व भारती विद्यापीठ इंजिनीअरिंग कॉलेज आहे. तसेच श्री श्री रविशंकर विद्यालय, संस्कृती विद्यालय, इंडस इंटरनॅशनल, रायन इंटरनॅशनल, फ्यूल, श्री चैतन्य, सिंहगड, न्यू इंग्लिश स्कूल आदी शिक्षण संस्था आहेत. जवळच एमआयटी कॉलेज , सिंहगड कॉलेज या प्रमुख शैक्षणिक संस्था आहेत सह्याद्री हॉस्पिटल, मंगेशकर हॉस्पिटल, चेलाराम हॉस्पिटल जवळच्या अंतरावर आहे.

भूगावमधील प्रॉपर्टीचे रेट..

1 बीएचके :- 20 ते 45 लाख रुपये
2 बीएचके :- 35 लाख ते 1.15 कोटी
3 बीएचके :- 60 लाख ते 3.50 कोटी