Take a fresh look at your lifestyle.

New Wage Law : तुमच्यासाठी चांगली बातमी… इन हॅन्ड सॅलरी घटणार नाही तर वाढणार, समजून घ्या, सॅलरी स्ट्रक्चर मध्ये कसं होणार कॅल्क्युलेशन…

New Wage code latest updates : नवीन कामगार कायदे प्रत्यक्षात कधी येणार ? हा प्रश्न लोकांना कधीपासून पडला आहे ? विशेषत: लोकांना हे जाणून घ्यायचं आहे क, New Wage code अंमलबजावणीनंतर त्यांच्या सॅलरी वर काय परिणाम होईल आणि सॅलरी स्ट्रक्चर कसं बदलेल. मात्र, अद्याप औपचारिक घोषणा होणे बाकी आहे. पण, येत्या काही महिन्यांत त्याची अंमलबजावणी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुद्दा असा आहे की, जेव्हा जेव्हा त्याची अंमलबजावणी होईल तेव्हा सर्वात मोठा बदल सॅलरी स्ट्रक्चर मध्ये दिसून येईल. आत्तापर्यंत तुम्ही ऐकलं असेलच की, नवीन कामगार कायदा (New Wage code) आल्याने तुमचा हातातील पगार कमी होणार आहे. कारण, मूळ वेतन 50% असणार आहे.

यामुळे सेवानिवृत्ती निधीमध्ये (Retirement Found) अधिक पैसे खर्च होतील तर भत्त्यामध्ये (Allowances) होणारी वाढ कमी होईल. आता इथे ट्विस्ट असा आहे की, न्यू सॅलरी स्ट्रक्चर आल्यानंतरही तुमचा हातातील पगार कमी होणार नाही तर उलट वाढणार आहे तर तो कसा ते समजून घेऊया…

बेसिक सॅलरी होणार 50% :-

प्रथम हे समजून घ्या की, सरकारने 29 कामगार कायदे (Labour law) जोडून 4 नवीन कामगार संहिता (new Labour codes) तयार केल्या आहेत. नवीन कायद्यातील तरतुदींनुसार, कंपन्या त्यांच्या कर्मचार्‍यांना देतील त्या पगारातील एकूण पगाराच्या (CTC) 50% मूळ वेतन असणार आहे. म्हणजे मूळ वेतन जे पूर्वी 30-35% असायचे, त्यात थेट 15% वाढ होईल आणि प्रतिपूर्ती-भत्ता (Reimbursement-Allowance) 50% राहील…

सध्याच्या सॅलरी स्ट्रक्चर मध्ये नेमकं काय आहे ?

समजा तुमचा मासिक पगार 1.5 लाख रुपये म्हणजे 18 लाख रुपये वार्षिक पॅकेज आहे. सध्याच्या वेतन रचनेत, मूळ वेतन CTC च्या 32% आहे. या अर्थाने, 1.50 लाखांच्या मासिक CTC मध्ये, मूळ वेतन 48,000 रुपये असेल. मग 50% म्हणजे रु. 24,000 HRA नंतर NPS मध्ये 10% बेसिक (रु. 48,000) म्हणजे रु. 4,800 जातील. जर मूळ वेतनाच्या 12% भविष्य निर्वाह निधी (PF) मध्ये गेल्यास 5,760 रुपये दरमहा EPF मध्ये जातील.

अशाप्रकारे तुमचे 1.50 लाख रुपयांचे मासिक CTC 82,560 रुपये झालं आहे. म्हणजे उर्वरित 67,440 रुपये इतर वस्तूंद्वारे दिलं जात आहेत. यामध्ये विशेष भत्ता, इंधन आणि वाहतूक, फोन, वर्तमानपत्र आणि पुस्तके, तसेच वार्षिक बोनसमधील मासिक हिस्सा, ग्रॅच्युइटी या घटकांचा समावेश आहे.

सध्याच्या सॅलरी स्ट्रक्चरमध्ये कशाचा किती वाटा…

 पगार   महिना   वार्षिक 
बेसिक सॅलरी  48,000 रुपये 5,76,000 रुपये
HRA 24,000 रुपये 2,88,000 रुपये
स्पेशल अलाउंस 37,636 रुपये 4,51,632 रुपये
PF कंट्रीब्यूशन 5,760 रुपये 69,120 रुपये
NPS कंट्रीब्यूशन 4,800 रुपये 57,600 रुपये
फ्यूल अँड ट्रांसपोर्ट 16,000 रुपये 1,92,000 रुपये
फोन 2,000 रुपये 24,000 रुपये
वर्तमानपत्रे -पुस्तके 1,500 रुपये 18,000 रुपये
बोनस (वार्षिक) 8,000 रुपये 96,000 रुपये
 ग्रॅज्युएटी 2,304 रुपये 27,648 रुपये
एकूण सॅलरी  1,50,000 रुपये 18,00,000 रुपये

 

किती लावला जातो टॅक्स ? किती मिळते इन हॅन्ड सॅलरी अन् किती आहे रिटायरमेंट सेव्हिंग्स ?

तुमच्या एकूण CTC पैकी रु. 1.10 लाखावर टॅक्स आकारला जाईल. म्हणजे CTC चा 6.14% टॅक्स
टेक होम सॅलरी – रु 1.14 लाख, CTC च्या 76.1%
सेवानिवृत्ती बचत – 1.96 लाख रुपये, CTC एकूण 10.9 %

New Wage code लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या सॅलरी स्ट्रक्चरमध्ये होणार हे बदल, खालील तक्ता पहा…

  पगार   महिना  वार्षिक 
बेसिक सॅलरी 75,000 रुपये 9,00,000 रुपये
HRA 37,500 रुपये 4,50,000 रुपये
स्पेशल अलाउंस  –  –
PF कंट्रीब्यूशन 9,000 रुपये 1,08,000 रुपये
NPS कंट्रीब्यूशन 7,500 रुपये 90,000 रुपये
फ्यूल अँड ट्रांसपोर्ट 10,000 रुपये 1,20,000 रुपये
फोन 1,000 रुपये 12,000 रुपये
वर्तमानपत्रे -पुस्तके 1,000 रुपये 12,000 रुपये
बोनस (वार्षिक) 5,400 रुपये 64,800 रुपये
 ग्रॅज्युएटी 3,600 रुपये 43,200 रुपये
 एकूण सॅलरी 1,50,000 रुपये 18,00,000 रुपये

 

किती लावला जाईल टॅक्स ? किती मिळेल इन हॅन्ड सॅलरी अन् किती आहे रिटायरमेंट सेव्हिंग्स ?

तुमच्या एकूण CTC पैकी रु. 1.19 लाखावर टॅक्स आकारला जाईल. म्हणजे CTC चा 6.6% टॅक्स..
टेक होम सॅलरी – रु 1.06 लाख, CTC च्या 70.4%
रिटायरमेंट सेव्हिंग्स – रु. 3.06 लाख रुपये, एकूण CTC च्या 17%
न्यू स्ट्रक्चरमध्ये, तुमची ऍन्युअल रिटायरमेंट सेव्हिंग्स रु. 3.06 (CTC च्या 17%) असेल जी पूर्वी रु. 1.96 लाख (CTC चे 10.9%) होती. याचा अर्थ, New Wage code नुसार तुमची वार्षिक सेवानिवृत्ती बचत 1.10 लाख रुपयांनी वाढेल…

HRA मध्ये कमी मिळेल टॅक्स सूट…

नवीन नियमानुसार, समजा वार्षिक मूळ वेतन 9 लाख रुपये असेल तर HRA 4,50,000 रुपये होईल. परंतु, तुम्हाला फक्त 2,42,400 रुपयांच्या सूट वरच टॅक्स सूट मिळेल. म्हणजे 2,07,600 रुपयांवर टॅक्स भरावा लागेल. यापूर्वी, तुम्हाला HRA च्या हेडखाली मिळणाऱ्या 45,600 रुपयांवर टॅक्स भरावा लागत होता. New Wage code त HRA वरील करात मोठी वाढ होणार आहे. तुम्ही वार्षिक CTC वरील टॅक्सची तुलना केल्यास, आता तुम्हाला 1.10 लाख (एकूण CTC च्या 6.1%) टॅक्स भरावा लागेल, जो न्यू स्ट्रक्चरमध्ये रु. 1.19 लाख (एकूण CTC च्या 6.6%) असेल…

अशी वाढू शकता, टेक होम (In-Hand salary) सॅलरी :-

न्यू स्ट्रक्चरमध्ये तुमचा टेक होम पगार कमी होईल. पण, तुम्हाला यासाठी काही ऑप्शन शोधायचा असेल, तर तुमच्याकडे एक मार्ग आहे. तुम्ही NPS सोडू शकता, कारण त्यात पैसे टाकायचे की नाही हे तुमच्या इच्छेवर अवलंबून आहे. EPF च्या बाबतीत मात्र असं नाही, EPF मध्ये तुम्हाला तुमच्या मूळ वेतनाच्या 12 % रक्कम भरावी लागते. जर तुम्ही NPS सोडली असेल तर…

तर मग तुमचे सॅलरी स्ट्रक्चर असं असू शकतं…

 पगार   महिना  वार्षिक 
बेसिक सॅलरी 75,000 रुपये 9,00,000 रुपये
HRA 37,500 रुपये 4,50,000 रुपये
स्पेशल अलाउंस 2,400 रुपये 28,800 रुपये
PF कंट्रीब्यूशन 9,000 रुपये 1,08,000 रुपये
NPS कंट्रीब्यूशन
फ्यूल एंड ट्रांसपोर्ट 16,000 रुपये 1,92,000 रुपये
फोन 2,000 रुपये 24,000 रुपये
वर्तमानपत्रे -पुस्तके 1,500 रुपये 18,000 रुपये
बोनस (वार्षिक) 3,000 रुपये 36,000 रुपये
 ग्रॅज्युएटी 3,600 रुपये 43,200 रुपये
 एकूण सॅलरी 1,50,000 18,00,000 रुपए

किती लावला जाईल टॅक्स ? किती मिळेल इन हॅन्ड सॅलरी अन् किती आहे रिटायरमेंट सेव्हिंग्स ?

तुमच्या एकूण CTC पैकी रु. 1.19 लाखावर टॅक्स आकारला जाईल. म्हणजे CTC चा 6.6% टॅक्स
टेक होम सॅलरी – रु. 1.15 लाख, CTC च्या 77%
रिटायरमेंट सेव्हिंग्स – रु. 2.16 लाख, एकूण CTC च्या 12%

न्यू स्ट्रक्चरमध्ये NPS सोडल्यावर, तुमचा एकूण टेक होम पगार रु. 1.15 (CTC च्या 77%) असेल, जो पूर्वी रु. 1.06 लाख (CTC च्या 70.4% होता. त्याच वेळी, टॅक्स तसाच राहील. पण, रिटायरमेंट सेव्हिंग्स 2.16 लाख रुपये (12) % असेल, जी पूर्वी रुपये 3.06 लाख (CTC च्या 17%) होती…

​कोणत्या स्ट्रक्चरमध्ये टेक होम सैलरी, टॅक्स आणि सेव्हिंग्स चे कॅल्क्युलेशन पहा…

आपण वरती 3 स्ट्रक्चर दाखवले आहेत, त्यांच्यानुसार, तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही तुमचा टेक होम सॅलरी आता आहे तसा ठेवू शकता, परंतु तुम्ही टॅक्स वाढ थांबवू शकत नाही. परंतु, तुमची वार्षिक रिटायरमेंट सेव्हिंग्स वाढेल….

सध्याच्या पगाराच्या स्ट्रक्चरमध्ये, टेक होम पगार 1.14 लाख रुपये आहे, परंतु न्यू स्ट्रक्चरमध्ये टेक होम पगार 1.08 लाख रुपये होईल. जर तुम्ही NPS चा ऑप्शन सोडला तर तो 1.15 लाख रुपये होईल. पहिल्या स्ट्रक्चरमध्ये रु. 1.10 लाख (CTC चे 6.14%) कर भरावा लागेल. न्यू स्ट्रक्चरमध्ये, हे रु. 1.19 लाख (CTC च्या 6.6%) पर्यंत वाढेल. तुम्ही NPS सोडले तरी त्यावर कोणताही टॅक्स परिणाम होणार नाही आणि तुम्हाला फक्त 1.19 लाख रुपये भरावे लागतील.

सध्याच्या स्ट्रक्चरमध्ये, या सॅलरी ब्रॅकेट वाल्यांची रिटायरमेंट सेव्हिंग्स रुपये 1.96 लाख (CTC च्या 10.9%) आहे, जी न्यू स्ट्रक्चरमध्ये 3.06 लाख (CTC च्या 17%) पर्यंत वाढेल. NPS सोडल्यावर, रिटायरमेंट सेव्हिंग्स रु. 1.96 लाख ऐवजी रु. 2.16 लाख (CTC चे 12%) होईल… यामुळे तुमची टेक होम सॅलरीमध्ये वाढ होईल…