Take a fresh look at your lifestyle.

शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड ! कांदा खाणार सफरचंदाचा भाव; या बाजार समितींत कांदा प्रतिक्विंटल ₹ 5,500 पार..

यंदाच्या वर्षी पाऊस कमी झाल्याने दिवाळीपर्यंत कांदयाच्या दरामध्ये आणखी वाढ होणार असल्याचे सांगण्यात येत होतं. त्यानुसार, कांदयाचे दर वधारत असून सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दाखल होत असलेल्या नवीन कांद्याला प्रतिक्विंटल सरासरी दोन हजार रुपयापर्यंत तर उन्हाळी कांद्याला प्रतिक्विंटल पाच हजार दोनशे रुपये दर मिळत आहे.

सोलापूर जिल्ह्यासह विजयपूर, कलबुर्गी, उस्मानाबाद, लातूर या परिसरातून कांदयाची आवक होते. बाजार समितीत दररोज दीडशे ते पावणेदोनशे गाड्यांद्वारे कांदयाची आवक होत आहे . मंगळवारी 140 ट्रकमधून 11 हजार 700 क्विंटल कांद्याची आवक झाली.

दर प्रतिक्विंटलसाठी 100 रुपये ते 4500 रुपयांपर्यंत होते. बुधवारी 19 हजार 600 क्विंटल कांद्याची आवक झाली. दर 100 रुपये ते 4 हजार 500 रुपयांपर्यंत होते. गुरुवारी 19 हजार 901 क्विंटल कांद्याची आवक झाली.

दर 4 हजार 200 रुपयांपर्यंत होते. शुक्रवारी 17 हजार 14 क्विंटल कांद्याची आवक झाली. दर 100 रुपये ते 5 हजार 100 रुपयांपर्यंत होते. तर शनिवारी 880 क्विंटल कांद्याची अवाक झाली. पांढऱ्या कांद्याला तब्बल 5 हजार 500 चा दर मिळाला.

शेतकऱ्यांच्या कांद्याला मिळत होता अवघा दीड रुपया किलोचा भाव, व्यापाऱ्यांकडील कांदा खातोय सफरचंदाचा भाव..

शेतकऱ्यांकडील कांदा विक्रीसाठी बाजारात गेल्यानंतर त्याला कवडीचा भाव मिळतो, तोच कांदा अथवा कोणताही शेतमाल व्यापाऱ्यांकडे गेल्यावर मात्र त्याला सोन्याचा भाव मिळतो, हेच सिध्द होत आहे. सध्या शेतकऱ्यांकडे कांदा विक्रीसाठी शिल्लक नाही, आता केवळ व्यापाऱ्यांकडे कांदा शिल्लक आहे किरकोळ बाजारात अवघ्या आठच दिवसात 20 रुपयांवरून कांद्याचे भाव वाढून थेट 50 ते 60 रुपयांवर गेले आहेत.

विशेष म्हणजे सध्या सफरचंदालाही 80 रुपयांपर्यंत खालचा भाव सुरू आहे. कांद्याने सफरचंदाचा भाव खाल्ल्याचे दिसून येते. कांदा उत्पादनात नाशिक जिल्हा आघाडीवर आहे. त्याखालोखाल सर्वच जिल्ह्यातील विशेष करून मराठवाड्यातील अनेक शेतकरी जुगार म्हणून दरवर्षी आपल्या शेतात एकर ते दीड एकर कांद्याचे उत्पादन घेतात.

या कांद्याला कधी चांगला भाव मिळतो तर कधी खर्चही निघत नाही. यावर्षी कांद्याचे उत्पादन जास्त झाल्याने व केंद्र सरकारने परदेशातील कांद्याची निर्यात बंद केल्याने कांद्याला अवघा दीड ते 3 रुपये किलोचा भाव मिळाला होता. यामुळे अनेक शेतकऱ्यांना तर वाहन भाड्यालाही पैसे आले नाहीत. अनेकांना तर स्वतःच्या जवळचे पैसे आडत व्यापाऱ्यांचे भाडे म्हणून द्यावे लागले. शेतकऱ्यांची थट्टाच कांद्याने केल्याचे दिसून आले. यावर्षी शेतकऱ्यांच्या टोमॅटोला चांगले दर मिळत होते.

200 रुपये किलोचा भाव सुरू असताना अचानक केंद्र सरकारने नेपाळहून टोमॅटो आयात केल्याने भारतातील टोमॅटोचे भाव खाली आले. अवघ्या दहा रुपये किलोचा भाव टोमॅटोला येऊ लागल्याने अनेक शेतकऱ्यांचा हिरमोड झाला. शेतकऱ्यांकडे असताना कोणताही शेत माल कवडीमोल ठरतो. त्याचे मूल्येच होत नाही परंतु, सध्या शेतकरी कांदा विक्री करून रिकामे झाले आहेत . त्यांच्याकडे माल शिल्लक नाही . आता केवळ व्यापाऱ्यांकडे कांदा शिल्लक आहे .

यामुळे मागील आठ दिवसांपूर्वी अवघा 20 रुपये किलोने मिळणारा कांदा आता 40 ते 60 रुपये किलो दराने विकला जात आहे शेतकऱ्यांचे संपले की, व्यापाऱ्यांकडे गेलेल्या शेतमालाला सोन्याचा भाव मिळतो, हे सिध्द होत आहे. लातूरच्या बाजारात सध्या सफरचंदाची आवक मोठ्या प्रमाणावर झाल्याचे दिसून येते. नवरात्रीचे उपवास सुरू असल्यामुळे फळांना वाढती मागणी आहे. यामुळे 80 रुपयांपासून 150 रुपयांपर्यंत किलोला सफरचंदाला भाव सुरु आहे. अशातच कांदाही 60 रुपये किलोच्या भावाने विक्री होत आहे कांद्याने सफरचंदाचाच भाव खाल्ल्याचे बाजारात दिसून येते.

पहा आजचे कांदा बाजारभाव..