Take a fresh look at your lifestyle.

Pik Vima 2023 : शेतकऱ्यांची दिवाळी गोड! ₹ 27,000 खात्यात जमा होण्यास सुरुवात, पालकमंत्री विखेंचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश..

प्रधानमंत्री पीक विमा खरीप योजनेत शासनाच्या अधिसूचनेनुसार पीक विमा नुकसान भरपाई रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे निर्देश पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी एचडीएफसी ॲग्रो पीक विमा कंपनीला दिले आहेत. कंपनीकडून कार्यवाही करण्यात आली आहे.

सोयाबीन पिकासाठी हंगामातील प्रतिकूल परिस्थिती अंतर्गत सर्व 52 महसूल मंडळातील 2 लक्ष 11 हजार 968 शेतकऱ्यांना 2 लक्ष 16 हजार 232 हेक्टर क्षेत्रासाठी अंदाजे 122 कोटी रू. नुकसानभरपाई दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विमा कंपनीकडून जमा होणार आहे.

जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. विखे पाटील यांनी अकोला दौऱ्यात रविवारी शासकीय विश्रामगृह येथे विविध विषयांचा आढावा घेतला आमदार रणधीर सावरकर, आमदार वसंत खंडेलवाल, जिल्हाधिकारी अजित कुंभार, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी शंकर किरवे आदी उपस्थित होते.

अकोला जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये पावसाचा खंड व सरासरीच्या कमी पाऊस झाला असल्याने तालुकास्तरीय संयुक्त समितीमार्फत करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार सोयाबीन पिकाच्या उत्पादनामध्ये घट दिसून आली त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी पंतप्रधान पिक विमा योजनेंतर्गत हंगामातील प्रतिकुल 25 टक्के विमा नुकसान भरपाई शेतकऱ्यांना अदा करण्याबाबत अधिसूचना सप्टेंबर 2023 राजा लागू केली.

एचडीएफसी ॲग्रो या पीक विमा कंपनीकडून काही आक्षेप घेण्यात आले होते. त्या आक्षेपाची पूर्तता जिल्हास्तरीय संयुक्त समितीमार्फत लगेच करण्यात आली. त्या अनुषंगाने सद्यस्थितीमध्ये पिक विमा कंपनीमार्फत जिल्ह्यातील सर्व 52 महसूल मंडळांतील सर्व सोयाबीन पीक विमाधारक शेतकऱ्यांना 25 टक्के पीक विमा नुकसान भरपाई देण्यास सुरुवात झाली असल्याचे कंपनीने कळवले आहे. ही भरपाई रक्कम दिवाळीपूर्वी शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा व्हावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

शासन शेतकरी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून विविध कृषी योजनांची अधिक परिणामकारक अंमलबजावणी करण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली. जिल्ह्यातील 2 लक्ष 11 हजार 968 शेतकऱ्यांनी 2 लक्ष 16 हजार 232 हे. क्षेत्रावर पीक विमा काढलेला असून जवळपास 95 टक्के सोयाबीन क्षेत्राचा विमा काढण्यात आला आहे.

नुकसान भरपाई योजना ऑनलाइन अर्ज..

सर्व प्रथम अधिकृत वेबसाइट वर जा आणि मुख्यपृष्ठ उघडेल

यानंतर अर्जाच्या लिंकवर क्लिक करा आणि नोंदणी पृष्ठ उघडेल.

सर्व विचारलेले तपशील भरा आणि कागदपत्रे सबमिट आणि अपलोड करा आणि ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण करा.

त्यानंतर तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर एसएमएसद्वारे पुष्टीकरण मिळेल.

PIK विमा योजनेच्या लाभार्थ्यांची यादी कशी पाहाल ? ..

कृषी विभागाच्या (महाराष्ट्र सरकार) अधिकृत पोर्टल ला भेट द्या.

त्यानंतर स्क्रीनवर PM PIK vima Yojana List लिंक फ्लॅश होईल, तुम्हाला Statistics पर्यायावर क्लिक करावे लागेल आणि PM PIK विमा योजना लाभार्थी स्थिती, आणि Yadi निवडा.

यानंतर यादी उघडेल, तुमची स्थिती तपासा.

संपूर्ण तपशील आणि स्थिती केवळ अधिकृत पोर्टलवर उपलब्ध आहे krishi.maharashtra.gov.in वर संपर्कात रहा..