Take a fresh look at your lifestyle.

PM Kisan : खुशखबर ! ‘या’ दिवशी खात्यात जमा होणार 2000 रु. हप्ता ; तत्पूर्वी ‘हे’ महत्वाचं काम करण्यास उरलेत फक्त 2 दिवस !

शेतीशिवार टीम : 05 सप्टेंबर 2022 : पीएम किसान सम्मान निधि योजना, (PM-Kisan Samman Nidhi Scheme) शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये मानधन देणारी महत्त्वपूर्ण योजना. याच योजनेच्या 12 व्या हप्त्यासंदर्भात एक अतिशय महत्त्वाचं अपडेट आहे.

किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना ईकेवायसी (eKYC) करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ज्या शेतकऱ्यांची ईकेवायसी (eKYC) होईल, अशा पात्र शेतकर्‍यांना पुढील हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे.

यासाठी 31 ऑगस्ट 2022 शेवटची तारीख देखील देण्यात आली होती. परंतु देशातील 30 ते 40% लाभार्थी शेतकरी अजूनही ई-केवायसी करण्यापासून बाकी आहेत. आणि या शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये, शेतकरी या योजनेतून अपात्र होऊ नये, यासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ देऊन शेतकऱ्यांना 7 सप्टेंबर 2022 पर्यंत eKYC करण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे.

महाराष्ट्रातील तब्बल 40 लाखांपेक्षा जास्त शेतकरी ई-केवायसी करण्याचे बाकी आहेत, आणि हेच बाकी असलेल्या शेतकऱ्यांनी 7 सप्टेंबर 2022 पर्यंत eKYC पूर्ण केली तर या योजनेअंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांना 12 सप्टेंबर 2022 पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरण करायला सुरुवात केली जाणार आहे.

अद्याप देखील तुम्ही eKYC केली नसेल तर फक्त 2 चं दिवस शिल्लक राहिले असून यासाठी आपल्या आधार संलग्न मोबाईल नंबरवर आलेल्या OTP च्या माध्यमातून किंवा जवळच्या CSC सेंटरला भेटून आपली eKYC पूर्ण करून घेऊ शकता…

याचबरोबर राज्यात बऱ्याच शेतकऱ्यांचं Waiting for approval by state, Waiting for approval by District, तसेच Waiting for approval by Block यामध्ये जे approval झालेले पात्र लाभार्थी आणि eKYC पूर्ण झालेल्या लाभार्थ्यांना 12 सप्टेंबर 2022 तारखेला हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे.

अशी करा केवायसी (e-KYC) :-

www.pmkisan.gov.in या website ला जाऊन farmer corner या विंडोमध्ये क्लिक करावे. किंवा pmkisan मोबाइल अँपमध्ये OTP द्वारे मोफत ई -केवायसी (e-KYC) करता येईल. नजीकच्या महा ई-सेवा केंद्राशी संपर्क साधून ई-केवायसी तत्काळ करून घ्यावी.

यासाठी कृषी विभागातील कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी तसेच तलाठी आणि महसूल विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांशी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकाऱ्यांनी केले आले आहे.

OTP Based Ekyc करण्यासाठी https://exlink.pmkisan.gov.in/aadharekyc.aspx या लिंकवर ई- केवायसी करता येईल, असेही प्रशासनाचे आवाहन आहे.