Take a fresh look at your lifestyle.

PM Kisan Samman Yojana : खात्यात कधी जमा होणार 10वा हप्ता ? आतापर्यंतची सर्वात मोठी अपडेट…

PM Kisan Samman Nidhi LIVE : कुठं शेतात गव्हाची पेरणी, तर कुठं ऊस काढणी सुरु, तर कुठं काहींजण सिंचनात व्यस्त… आणि याच चिंतेत 12 कोटींहून अधिक शेतकरी पीएम किसान सन्मान निधीच्या 10व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. असं दिसतंय की, डिसेंबर-मार्चचा हप्ता कुठं लाटाकलाय ? खरं तर राज्यांनी RFT वर स्वाक्षरी केली आहे, पण FTO अद्याप तयार झालेलं नाहीये…

FTO जनरेट झाल्याशिवाय, पुढील हप्ता लवकर येणं जरासं कठीण आहे. कारण जर FTO चा मॅसेज जनरेट झाला असेल आणि लाभार्थी स्थितीत पेमेंट कन्फर्मेशन प्रलंबित असेल तर तुमचा हप्ता तुमच्या बँक खात्यात लवकरच हस्तांतरित केला जाईल.

FTO चे पूर्ण रूप म्हणजे फंड ट्रान्सफर ऑर्डर. याचा अर्थ “राज्य सरकारने आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक आणि बँकेच्या IFSC कोडसह लाभार्थीच्या तपशीलांची पडताळणी केली आहे का ? आणि तुमची हप्त्याची रक्कम तयार आहे आणि सरकार ती तुमच्या बँक खात्यावर पाठवेल. अशी ऑर्डर देण्यात आली आहे.

तर कधी येणार 10वा हप्ता ?

गेल्या वर्षी 25 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पाठवले होते. त्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत (PM Kisan Sanman Nidhi Yojana) 18 हजार कोटी रुपये जारी केले. म्हणून 25 डिसेंबरपर्यंत खात्यात 10वा हप्ता येण्याची दाट शक्यता आहे.

पीएम किसान योजनेचा हप्ता म्हणून देशातील नऊ कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात 18 हजार कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले. यानंतर 31 मार्च 2021 पर्यंत या हप्त्याअंतर्गत 10,23,49,443 लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे पोहोचले आहेत.

पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत केंद्र सरकार दरवर्षी 2000-2000 च्या तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात 6000 रुपये थेट हस्तांतरित करते.

आतापर्यंत सरकारने 9 हप्ते जारी केले असून 12 कोटींहून अधिक नोंदणीकृत शेतकरी या योजनेच्या प्रतीक्षेत आहेत. यावेळी पीएम किसान सन्मान निधी योजनेत मोठा बदल करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना E-KYC अनिर्वाय केलं आहे.