Take a fresh look at your lifestyle.

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! ‘या’ दिवशी खात्यात जमा होणार 2000 रु. हप्ता ; केंद्रीय कृषि मंत्र्यांनी दिली माहिती, पहा तुमचं Beneficiary Status…

शेतीशिवार टीम : 1 ऑक्टोबर 2022 :– पीएम किसान (PM Kisan) योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना किसान सन्मान निधीचा (Samman Nidhi Yojana) लाभ दिला जातो. पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपये दिले जातात. ही रक्कम दर चार महिन्यांच्या अंतराने प्रत्येकी 2,000 रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांना दिली जाते.

या योजनेचे आतापर्यंत 11 हप्ते शेतकऱ्यांना प्राप्त झाले आहेत. आता या योजनेच्या 12व्या हप्त्याची शेतकरी आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता या शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपणार असून या योजनेचा 12वा हप्ता 17 ऑक्टोबरला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

मीडिया रिपोर्ट्सच्या आधारे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतकरी डेटाबेसमध्ये चुकीचा डेटा आणि अपूर्ण केवायसी (E-KYC) मुळे हप्ता जारी करण्यास विलंब झाला आहे. आता डेटाबेस दुरुस्त करून शेतकऱ्यांच्या खात्यावर हप्ता पाठवण्याची तयारी झाली आहे.

12 वा हप्ता 17 ऑक्टोबर 2022 रोजी पंतप्रधान मोदींनी नवी दिल्ली येथे होणाऱ्या कृषी स्टार्टअप कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. कार्यक्रमाच्या आयोजनाची तयारी जोरात सुरू आहे आणि यावेळीच पंतप्रधान मोदी थेट सत्रात शेतकऱ्यांना संबोधित करणार आहेत. यामुळेच या दिवशी पीएम-किसान योजनेचा 12 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात पूर्णपणे जमा होणार असून याबाबत केंद्रीय कृषि मंत्री नरेन्द्र सिंह तोमर यांनी माहिती दिली आहे.

या शेतकऱ्यांना मिळणार नाही 12 वा हप्ता :-

पीएम किसान सन्मान निधीचा 12 वा हप्ता केवळ ई-केवायसी (E-KYC) प्रक्रिया पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांनाच जारी केला जाणार आहे. याउलट ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी (E-KYC) केलेली नाही, त्यांना 12व्या हप्त्याचा लाभ मिळणार नाही. याशिवाय हे शेतकरी योजनेच्या आगामी हप्त्यांपासूनही वंचित राहू शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी ई-केवायसी (E-KYC) प्रक्रिया लवकर पूर्ण करावी जेणेकरून त्यांना कोणत्याही व्यत्ययाशिवाय पीएम किसान सन्मान निधीचा लाभ मिळू शकेल…

शेतकरी अजूनही करू शकतात E-KYC

eKYC च्या शेवटच्या तारखेबाबत सरकारने अद्याप कोणतेही नवीन अपडेट दिलेलं नाही. शेवटच्या अपडेटनुसार, E-KYC सी ची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2022 होती. त्यानंतर कोणतेही अपडेट आलेलं नाही. त्यामुळे शेतकरी अजूनही E-KYC ची प्रक्रिया पूर्ण करू शकतात. E-KYC करणे खूप सोपे आहे. तुम्ही ते कॉम्प्युटरद्वारे स्वतः करू शकता किंवा CSC केंद्राला भेट देऊन ही प्रक्रिया पूर्ण करू शकता.

शेतकऱ्यांच्या सोयीसाठी पीएम किसान सन्मान निधीच्या (PM Kisan Samman Nidhi) वेबसाइटवर यासाठी स्वतंत्र पोर्टल देण्यात आलं आहे. याचा वापर करून शेतकरी ई-केवायसीची (E-KYC) प्रक्रियाही पूर्ण करू शकतात.

लाभार्थी यादीत तुमचे नाव कसे तपासाला ?

तुम्ही याप्रमाणे तपासू शकता :-

स्टेप : 1 –
तुमचे स्टेटस तपासण्यासाठी, प्रथम तुम्हाला PM Kisan च्या अधिकृत पोर्टलला भेट द्यावी लागेल :- https://pmkisan.gov.in/

स्टेप : 2 –
यानंतर, येथे दिसणार्‍या Beneficiary Status या ऑप्शनवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचे बँक खाते किंवा आधार क्रमांक यापैकी एक निवडावा लागेल.

स्टेप : 3 –
तुम्ही फक्त निवडलेल्या क्रमांकांपैकी एक (आधार क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक) येथे एंटर्ड करा. यानंतर तुम्हाला ‘Get Data’ वर क्लिक करावे लागेल, त्यानंतर तुमच्या समोर स्टेटस अपडेट येईल…