Take a fresh look at your lifestyle.

शासनाची विश्वकर्मा योजना हिट! 15 दिवसांत 9 लाख अर्ज, फक्त 5% व्याजदराने तात्काळ मिळतंय 3 लाख कर्ज, पहा अर्ज प्रोसेस..

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील कारागीर, सुतार, सोनार, लोहार, गवंडी इत्यादींसाठी ‘पंतप्रधान विश्वकर्मा कौशल सन्मान योजना’ सुरू केली आहे. या योजनेत येणाऱ्या लोकांना सरकार 3 लाख रुपयांचे कर्ज देणार असून हे कर्ज केवळ 5 टक्के व्याजदराने मिळणार आहे. या योजनेत दगडी कोरीव शिल्पकार, न्हावी आणि धोबी (इस्त्रीवाला) संबंधित 18 क्षेत्रांचा समावेश करण्यात आला आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल. हे ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही करता येते. जर तुम्हाला ऑनलाइन अर्ज करायचा असेल तर तो 17 सप्टेंबर 2023 पासून सुरू झाला असून आत्तापर्यंत 8 लाखांहून कामगारांनी या योजनेसाठी अर्ज केला आहे.

ऑनलाइन नोंदणीसाठी तुम्ही https://pmvishwakarma.gov.in या साइटला भेट देऊ शकता. जाणून घ्या या योजनेसाठी पात्रता ? कागदपत्रे ? अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे ? याबाबत आपण जाणून घेणार आहोत, त्यामुळे हे आर्टिकल संपूर्ण वाचून समजून घ्या..

पीएम विश्वकर्मा योजना म्हणजे काय ?

विश्वकर्मा कौशल सन्मान योजना किंवा विश्वकर्मा श्रम सन्मान योजना ही भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांपैकी एक आहे. या योजनेसाठी शासनाने 13,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पीएम विश्वकर्मा योजनेंतर्गत समाविष्ट कारागीर, शिल्पकार इत्यादींना पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र आणि ओळखपत्र प्रदान केले जाईल. यासाठी नोंदणी मोफत आहे.

या योजनेत नोंदणी करणाऱ्या लोकांना केवळ प्रशिक्षणच दिले जाणार नाही, तर ते कमी व्याजदरात कर्जही घेऊ शकतील. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर 15,000 रुपये टूल्स खरेदीसाठी दिले जातील. याशिवाय पहिले 1 लाख रुपये 5% व्याजाने दिले जातील, त्यानंतर गरज पडल्यास 2 लाख रुपयांचे कर्ज दुसऱ्या हप्त्यात दिलं जातं.

कोणासाठी आहे, पीएम विश्वकर्मा योजना ?

1.सुतार
2.सोनार
3.कुंभार
4.चांभार
5.लोहार
6.न्हावी
7.धोबी
8.शिंपी
9.गवंडीकाम
10.बोट बनविणारा
11.चिलखत बनविणारा
12.हातोडा आणि हत्यारे- औजारे साहित्यांचा संच बनविणारा,
13.कुलुपे बनविणारा
14.शिल्पकार (मूर्तिकार, दगड कोरणारा)
15.टोपली-चटई- झाडू बनविणारा
16.बाहुली आणि खेळणी बनविणारा
17.माळा बनविणारा
18.मासे पकडण्याचे जाळे बनविणारा आदी..

पीएम विश्वकर्मा योजना कसा आहे व्याज दर (2023)

या योजनेंतर्गत लोकांना सवलतीच्या व्याजदरात कर्ज दिले जाईल. यासाठी 5% व्याजदर निश्चित करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात लोकांना 1 लाख रुपयांचे कर्ज दिले जाईल, तर दुसऱ्या टप्प्यात 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेता येऊ शकतं..

पीएम विश्वकर्मा योजना 2023 चे फायदे..

विश्वकर्मा श्रम सन्मान योजनेचा मुख्य उद्देश कारागिरांना कौशल्य आणि आर्थिक मदत प्रदान करणे आहे.

यामध्ये तहसील किंवा जिल्हा मुख्यालयात असलेल्या लघू व मध्यम उद्योग विभागात प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.

योजनेंतर्गत प्रशिक्षण घेणाऱ्या कारागिरांना आर्थिक मदत देण्याची तरतूद आहे.

या योजनेंतर्गत लोकांना 500 रुपये प्रतिदिन भत्ता देण्याची तरतूद आहे. तसेच 5 दिवस कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे.

टूलकिट प्रोत्साहन म्हणून 15,000 रुपये अनुदान देण्याची सुविधा आहे.

PM विश्वकर्मा योजना : आवश्यक कागदपत्रे ?

आधार कार्ड
ओळखपत्र
पत्त्याचा पुरावा
मोबाईल नंबर
जात प्रमाणपत्र
बँक खाते पासबुक
पासपोर्ट आकाराचा फोटो
मोबाईल नंबर
ई – मेल आयडी

पीएम विश्वकर्मा योजना 2023 साठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन कसे करावे ?

स्टेप – 1 : सर्वप्रथम पंतप्रधान विश्वकर्मा योजनेच्या अधिकृत वेबसाइट https://pmvishwakarma.gov.in वर जा. तुमचा मोबाईल नंबर आणि आधार कार्ड वापरून येथे रजिस्ट्रेशन करा.

स्टेप – 2 : नंतर OTP प्रमाणीकरणाद्वारे तुमचा मोबाईल नंबर आणि आधार कार्ड सत्यापित करा.

स्टेप – 3 : पडताळणी प्रक्रियेनंतर, नोंदणी फॉर्म भरावा लागेल. ज्यामध्ये नाव, पत्ता आणि व्यवसायाशी संबंधित माहिती इत्यादी टाकावी लागेल. यानंतर नोंदणी फॉर्म सबमिट करा..

स्टेप – 4 : त्यानंतर तुम्ही डिजिटल आयडी आणि विश्वकर्मा योजना प्रमाणपत्र डाउनलोड करू शकता.

स्टेप – 5 : यानंतर, क्रेडेन्शियल वापरून पीएम विश्वकर्मा योजना पोर्टलवर लॉग इन करा. तुमची इच्छा असल्यास, तुम्ही पोर्टलवर वेगवेगळ्या योजना घटकांसाठी अर्ज करू शकता. मग तुम्हाला योजनेच्या तपशीलानुसार कागदपत्रे येथे अपलोड करावी लागतील.

स्टेप – 6 : यानंतर अर्जाचा फॉर्म विचारार्थ सादर करावा लागेल.

स्टेप – 7 : आता अधिकारी तुमच्या प्राप्त झालेल्या अर्जाची पडताळणी करतील. पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, तुम्हाला कर्ज मिळू शकेल.

लक्षात ठेवा : जे कारागीर योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक असाल त्यांनी जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरला (CSC) भेट देऊन नोंदणी करू शकतात आणि PM विश्वकर्मा योजनेसाठी अर्ज करू शकतात. .