Take a fresh look at your lifestyle.

शासनाची मिशन सुरक्षा योजना । फक्त 299 च्या प्रीमियमवर मिळवा 10 लाखांचा विमा ; 2 मुलांच्या शिक्षणासाठी मिळवा 1-1 लाख रुपये !

शेतीशिवार टीम : 22 जुलै 2022 :- पोस्ट विभागाच्या इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने (India Post Payments Bank) महागड्या प्रीमियमवर विमा काढू शकत नसलेल्या सर्वसामान्य लोकांसाठी विशेष गट अपघात संरक्षण विमा म्हणजे ‘सुरक्षा का पहला कदम’ ही योजना आणली आहे. ज्यामध्ये लाभार्थ्याचा वर्षभरात फक्त 299 आणि 399 रुपयांच्या प्रीमियमसह 10 लाख रुपयांचा विमा उतरवला जाणार आहे.  

एक वर्ष संपल्यानंतर पुढील वर्षी या विम्याचे नूतनीकरण करावे लागेल. यासाठी लाभार्थीचे खाते इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत असणे बंधनकारक असणार आहे. ही योजना इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक आणि टाटा एआयजी (Tata AIG) यांच्यातील करारानुसार, या योजनेतून 18 ते 65 वयोगटातील लोकांना हे सामूहिक अपघात विमा संरक्षण मिळणार आहे.

या अंतर्गत अपघाती मृत्यू, कायमचे किंवा आंशिक पूर्ण अपंगत्व, अंगविच्छेदन किंवा अर्धांगवायू झाल्यास दोन्ही प्रकारच्या विमा संरक्षणास 10 लाख रुपयांचे संरक्षण मिळणार आहे.

यासोबतच या योजनेचा लाभार्थी अपघातामुळे रुग्णालयात दाखल होईपर्यंत क्लेम ही मिळवू शकणार आहे. ज्यामध्ये आयपीडी (IPD) उपचारासाठी 60 हजार रुपयांपर्यंतचा खर्च आणि ओपीडीमध्ये (OPD) 30 हजार रुपयांपर्यंतचा क्लेमही उपलब्ध होणार आहे.

पोस्ट ऑफिसमध्ये विमा काढण्यासाठी 15 ऑगस्टपर्यंत आहे मुदत…

पोस्ट मास्टर जनरल वेस्टर्न रिजन सचिन किशोर यांनी दिलेल्या माहितीनुसार, 399 रुपयांच्या प्रीमियम इन्शुरन्समध्ये या सर्व सुविधांसोबतच दोन मुलांच्या शिक्षणासाठी 1-1 लाख रुपयांपर्यंतचा खर्च, जर विद्यार्थ्याने दहा दिवस हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्यास दररोज 1 हजारांचा खर्च मिळेल. कुटुंबासाठी 25,000 रुपयांपर्यंत वाहतूक खर्च आणि मृत्यू झाल्यास अंत्यसंस्कारासाठी 5000 रुपयांपर्यंत लाभ मिळेल.

थोडक्यात फायदे पहा :-

अपघाती मृत्यु झाल्यास नातेवाईकांना 10 लाख रु. अर्थसहाय्य मिळेल.

कायमचे अपंगत्व आल्यास ही 10 लाख रु. अर्थसहाय्य मिळेल.

अपघात झाल्यास दवाखान्यातील खर्चासाठी 60 हज़ार रुपये मिळतील.

मुलाच्या शिक्षनासाठी खर्च : 1 लाख रुपयापर्यंत खर्च केला जाईल प्रति मूल प्रत्येकी 1 लाख (जास्तीत जास्त 2 मुलांना)

अड्मिट असेपर्यंत दररोज़ :- 1,000 रुपये (10 दिवस)

OPD खर्च – 30000

पॅरालीसीस झाल्यास :- 10 लाख रुपये अर्थसहाय्य !

कूटुंबाला दवाखान्यातील प्रवास खर्चासाठी 25000 हजार रुपये अर्थसहाय्य

कूटुंबातील लाभार्थ्याला अंत्यसंस्कारासाठी 5 हजार रुपये अर्थसहाय्य

या योजनेत या लोकांना अर्ज करता येणार नाही…

साहसी खेळामध्ये सहभाग आदी, लष्कर, नौदल, हवाई आणि पोलीस दलातील व्यक्ती, आरोग्यासंदर्भात कोणतीही पूर्व विद्यमान स्थिती असलेली व्यक्ती. आजार अपंग मुळे अपघात उपचार करणारे डॉक्टर स्वत : विमाधारक किंवा या पॉलिसीमध्ये समाविष्ट असलेल्या कुटुंबाचा जवळच असेल, आत्महत्या, इत्र, अल्कोहोल किंवा इतर मादक पदार्थाच्या सेवनाने झालेला अपघात…

बाळंतपणामुळे किंवा गर्भधारणेमुळे होणारे कोणतेही नुकसान, खाण कामगार, बांधकाम कामगार, ड्रायव्हिंग व्यवसायाशी संबंधित व्यक्ती, विषारी, स्फोटक, इतर गुणधर्म असलेल्या व्यवसायातील कर्मचारी, वैद्यकीयदृष्ट्या आवश्यक नसतांना रुग्णालयात घेतलेला उपचार.

योजनेचा कालावधी वर्षाचा असून वर्ष संपल्यानंतर या योजनेचा कालावधी हा एक जवळच्या कोणत्याही पोस्ट कार्यालयात विमा नूतनीकरण करावा लागनार आहे.

तुम्हालाही या मिशन सुरक्षा योजने अंतर्गत विमा सुविधेसाठी फायदा घ्यायचा असेल तर तुम्ही जवळच्या पोस्ट ऑफिसला भेट देऊन या योजनेचा भाग बनू शकतात. ‘हे’ मिशन सुरक्षा अभियान : 15 ऑगस्टपर्यंत पोस्ट ऑफिस विभागामार्फत चालवलं जाणार आहे. तरी लवकरात – लवकर पोस्ट ऑफिसच्या या योजनेचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती…