Take a fresh look at your lifestyle.

पुणेकरांसाठी महत्वाची बातमी ! 7/12 उतारे झाले बंद, आता ‘ही’ कागदपत्रे दाखवल्यास मिळणार प्रॉपर्टी कार्ड

रोव्हर, ईटीएस यंत्र आणि ड्रोनच्या मदतीने पुणे शहरातील खराडीमधील ७०० हेक्टरवर असलेल्या मिळकतींच्या मोजणीचे काम पूर्ण झाल्याने महत्त्वपूर्ण टप्पा पार पडला आहे. त्यामुळे प्रत्येक घरी जाऊन मालकी हक्काची कागदपत्रे तपासली जाणार आहेत. त्यानंतर मिळकतदारांना कायदेशीर मालकी हक्काचा पुरावा असलेली मिळकत पत्रिका (प्रॉपर्टी कार्ड) देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. (property card maharashtra)

राज्यातील ज्या शहरांमध्ये नगरभूमापन (सिटी सर्व्हे) झाले आहे. मात्र, अशा शहरात मिळकतींचा सातबारा उतारा आणि मिळकत पत्रिका दोन्हीही सुरू आहेत. किंवा नगरभूमापन झाले असूनही सातबारा उतारा सुरू आहे. त्यामुळे या शहरातील जागांच्या खरेदी – विक्री व्यवहाराच्या वेळी सोयीनुसार सातबारा उताऱ्यांचा वापर केला जातो. त्यातून अनेक प्रश्न निर्माण होतात. फसवणुकीचे प्रकार देखील वाढत आहेत.

त्यामुळे भूमी अभिलेख विभागाने नगर भूमापन झालेल्या भागातील सातबारा उतारे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी या विभागाने राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्राच्या (एनआयसी) सहकार्याने संगणक प्रणाली विकसित केली आहे.

या प्रणालीच्या वापर करून प्रायोगिक तत्त्वावर वडगाव शेरीमध्ये जीएआयएस मॅपिंगच्या माध्यमातून नुकताच एक प्रकल्प राबविण्यात आला. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर खराडी गावची मोजणी करण्याचा निर्णय महापालिकेच्या मान्यतेने भूमी अभिलेख विभागाने घेतला होता.

यंदा रोव्हर, ईंटीस यंत्र आणि ड्रोन शा तिन्ही तंत्रज्ञानाचा वापर एकत्रित करण्याचा निर्णय विभागाने घेतला. त्यानुसार दोन महिन्यात खराडीच्या ७०० हेक्टरवरील मिळकतींचे मोजणीचे काम पूर्ण झाले आहे. खराडीचा काही भाग लोहगाव विमानतळाच्या परिसरालगत असल्यामुळे ड्रोनची परवानगी न मिळाल्याने सुमारे १०० हेक्टरवरील मिळकतींच्या मोजणीचे काम रखडले होते. त्याला मान्यता मिळाल्याने ते देखील काम नुकतेच मार्गी लागले. त्यामुळे मोजणीचा टप्पा पूर्ण झाला आहे, अशी माहिती भूमी अभिलेख विभागाकडून देण्यात आली.

मिळकत पत्रिकेचा होणार फायदा..

मिळकत पत्रिका ही महसूल विषयक महत्त्वाचा मालकी हक्काचा पुरावा असल्याने सदनिकाधारकांचे हितसंबंध जोपासले जाणार आहेत. मिळकत पत्रिकेवर इमारतीखालील सर्व क्षेत्र तसेच प्रत्येक सदनिकाधारकाचे वैयक्तिक मालकीच्या क्षेत्राची स्वतंत्र नोंद असणार आहे. त्यामुळे सदनिकाधारकाचा जागेवरील हक्क अबाधित राहणार आहे. तसेच सदनिकेची खरेदी विक्री करताना उद्भवणारे वाद मिटणार आहेत.

ही 7 कागदपत्रे आवश्यक..

जमिनीचा 7/12 उतारा
जमिनीचा खरेदीखत
जमीन मोजणी चा नकाशा
महसूल विभागाची पावती
प्रॉपर्टी कार्ड
खाते उतारा किंवा 8/अ उतारा
जमिनीसंबंधीचे पूर्वीचे खटले