Take a fresh look at your lifestyle.

पुणे जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांना मोठा दिलासा..! 73 कोटी 60 लाखांचा निधी वर्ग, पहा तालुकानिहाय गावांसह पात्र शेतकऱ्यांची PDF यादी..

पुणे जिल्ह्यात गतवर्षी सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये नैसर्गिक आपत्ती व अतिवृष्टीमुळे शेतीपिके व फळपिकांचे नुकसान झाले होते. त्यामध्ये 33% किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान झालेल्या 85 हजार 445 शेतकऱ्यांना 73 कोटी 60 लाख 38 हजार रुपये नुकसान भरपाई ऑनलाइन पद्धतीने करण्याची कार्यवाही सुरू असून सुमारे 80% काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे यांनी दिली आहे.

जून ते ऑगस्ट 2022 या कालावधीत नैसर्गिक आपत्ती व अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शेतीपिकाच्या नुकसानीसाठी 3 कोटी 14 लाख 21 हजार रुपये आणि शेतजमीन खरडून झालेल्या नुकसानीपोटी 13 लाख 64 हजार रुपये इतकी रक्कम अदा केली आहे.

पुणे जिल्ह्यात मार्च 2023 मधील अतिवृष्टीमुळे एकूण 84 गावातील 1 हजार 434 शेतकऱ्यांची शेती बाधित झाली आहे एकूण 408.94 हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून शेतीपिके व फळपिकांच्या नुकसानीपोटी 70 लाख 70 हजार रुपये अनुदान मागणी केली आहे, असेही कळविले आहे.

सप्टेंबर ते ऑक्टोबर 2022 मध्ये नैसर्गिक आपत्ती व अतिवृष्टीमुळे बाधित गावे, शेतकरी, बाधित क्षेत्र व नुकसान भरपाई पुढीलप्रमाणे :-

भोर : बाधित गावे 78 , शेतकरी 523 , बाधित क्षेत्र 165.66 हेक्टर, नुकसान भरपाई – 23 लाख 10 हजार.

वेल्हा : बाधित गावे 2 , शेतकरी 11 , क्षेत्र 1.21 हेक्टर, नुकसान भरपाई- 39 हजार रुपये.

मावळ : बाधित गावे 7 , शेतकरी 114, क्षेत्र 24 हेक्टर, नुकसान भरपाई – 3 लाख 26 हजार रुपये.

हवेली : बाधित गावे 104, शेतकरी 7 हजार 490, क्षेत्र 3146.19 हेक्टर, नुकसान भरपाई – 8 कोटी 33 लाख 2 हजार रुपये.

खेड : बाधित गावे 34, शेतकरी 1 हजार 947, क्षेत्र 1081.42 हेक्टर, नुकसान भरपाई – 2 कोटी 2 लाख 23 हजार रुपये.

आंबेगाव : बाधित गावे 89 शेतकरी 9 हजार 779, क्षेत्र 2646.85 हेक्टर, नुकसान भरपाई – ४ कोटी 96 लाख 69 हजार रुपये.

जून्नर : बाधित गाव 176 , शेतकरी 22 हजार 591, क्षेत्र 14 हजार 556.35 हेक्टर, नुकसान भरपाई – 24 कोटी 51 लाख 46 हजार रुपये.

शिरूर : बाधित गावे 67 , शेतकरी 4 हजार 734, क्षेत्र 1 हजार 969.54 हेक्टर. नुकसान भरपाई 4 कोटी 56 लाख 66 हजार रुपये.

पुरंदर : बाधित गावे 146 , शेतकरी 27 हजार 841 , क्षेत्र 9 हजार 332.40 हेक्टर, नुकसान भरपाई – 21 कोटी 26 लाख 57 हजार रुपये.

दौंड : बाधित गावे 30 , शेतकरी 2008 , क्षेत्र 818.57 हेक्टर, नुकसान भरपाई – 2 कोटी 14 लाख 80 हजार रुपये.

बारामती : बाधित गावे 101 , शेतकरी 8 हजार 417 , क्षेत्र 3880.28.हेक्टर , नुकसान भरपाई 5 कोटी 52 लाख 20 हजार रुपये अशी एकूण 73 कोटी 60 लाख 38 हजार रुपये नुकसान भरपाईची रक्कम आहे.

pune Atirushti Nuksan Bharpai : 2022 List जिल्ह्याच्या संकेतस्थळावर लवकरच उपलब्ध होणार आहे, लिंक :- pune.gov.in

nanded June -August 2022

धाराशिव ( उस्मानाबाद जिल्हा ) 
Download pdf