Take a fresh look at your lifestyle.

Pune Metro : शिवाजीनगर – हिंजवडी – माण मेट्रोच्या कामाला मिळणार गती ; उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले ‘हे’ निर्देश..

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मार्गावरील वाहतूककोंडीवर तत्काळ उपाययोजना कराव्यात. त्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकात प्रस्तावित मेट्रोसह एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाच्या कामाला गती देतानाच शिवाजीनगर – हिंजवडी – माण मेट्रोच्या कामाचा वेग वाढवावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. (Pune Metro line 3 map)

विधानभवन येथे आयोजित आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री पवार बालत होत . बैठकीला वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार, पीएमआरडीए आयुक्त राहुल महिवाल, पिंपरी – चिंचवड मनपा आयुक्त शेखर सिंह, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी डॉ. राजश देशमुख, पीएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त दीपक सिंगला, शहर वाहतूक शाखेच पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, पुणे मनपा अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, टाटा प्रोजेक्ट्स कंपनीचे अधिकारी आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या शिवाजीनगर हिंजवडी – माण मेट्रोच्या कामाला गती देण्यासाठी प्रकल्पाला आवश्यक शासकीय जागा खासगी जागांबाबत सर्व यंत्रणांनी समन्वयाने आणि गतीने काम करावे.

नागरिकांना वाहतूककोंडीचा त्रास होऊ नये, यासाठी महानगरपालिका तसेच पोलिसांनी समन्वयाने वाहतुकीचे नियोजन करावे. गणेश खिंड रॅम्पसाठी आवश्यक 45 मीटर रुंदीच्या रस्त्याच्या जागेचा ताबा (आर ओडब्ल्यू) सर्व कार्यवाही करून 15 सप्टेंबरपर्यंत देण्यात यावा.

यासाठी पुणे महापालिकेने आवश्यक कार्यवाही करावी. औंध, बाणेर, पाषाण, गणेश खिंड रॅम्प येथील बॅरिकेडिंग करणे. आवश्यक तेथे वाहतक वळविणे आदी कामे नागरिकांच्या सुविधा लक्षात घेऊन कराव्यात, असेही निर्देश त्यांनी दिले.

Pune Metro संपूर्ण मेट्रो मॅप पाहण्यासाठी :- इथे क्लिक करा

प्रकल्पासाठी आवश्यक शासकीय जागा ताब्यात घेण्यासाठी उशीर लागता कामा नये असे निर्देश देतानाच उपमुख्यमंत्री पवार यांनी संबंधित जागांशी निगडित प्रमुख अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवरून थेट संपर्क साधत सूचना केल्या.

तसेच खासगी जागांबाबतही जागामालकांशी दूरध्वनीवरून चर्चा केली. भविष्यातील 50 वर्षांचा विचार करून प्रकल्पाच्या आराखड्यात तडजोड होता कामा नये, असेही उपमुख्यमंत्री म्हणाले, या वेळी या प्रकल्पांतर्गत सुरू असलेले पाइलिंग, कास्टिंग आदी. कामाचा तसच समस्याचा आढावा उपमुख्यमंत्री पवार यांनी घेतला.