Take a fresh look at your lifestyle.

Pune Metro : पुणे ते PCMC प्रवास फक्त 22 मिनिटांत..! विद्यार्थ्यांना भाड्यामध्ये 30% सवलत, टाइम टेबल, तिकीट दर चार्ट पहा..

पुणे मेट्रोची ‘पीसीएमसी ते फुगेवाडी ‘व’ वनाझ ते गरवारे महाविद्यालय या मार्गिकेवर मागील वर्षी उद्घाटन झाले होते. आज मंगळवारी (दि. 1 ऑगस्ट) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या दोन्ही मार्गिकांचा विस्तार केला जात आहे. या विस्तारित मार्गांमध्ये ‘फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट’ आणि ‘रूबी हॉल ते गरवारे महाविद्यालय’ या मार्गांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. (Pune Metro) 

या नवीन मार्गाच्या लोकार्पणामुळे ‘पीसीएमसी ते सिव्हिल कोर्ट’ आणि ‘बनाझ ते रुबी हॉल’ या मार्गांवर प्रवास करणे शक्य होणार आहे. मेट्रोचे न्यूनतम भाडे 10 रुपये असून, अधिकतम भाडे 35 रुपये असणार आहे.

पीसीएमसी ते वनाझ असा प्रवास करण्यासाठी 22 मिनिटे लागणार आहेत आणि त्यासाठी 35 रुपये भाडे लागेल. तसेच, ‘पीसीएमसी ते रुबी हॉल’ यासाठी 30 रुपये भाडे असेल. ‘वनाझ ते रुबी हॉल’ यासाठी 35 रुपये भाडे असेल. विद्यार्थ्यांसाठी भाड्यामध्ये 30 टक्के सवलत असणार आहे. शनिवार- रविवार सर्व नागरिकांसाठी 30 टक्के सवलत असणार आहे. तसेच, मेट्रो कार्डधारकांसाठी सरसकट 10 टक्के सवलत असणार आहे . मेट्रो कार्डही लवकरच विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे..

मेट्रोचे तिकीट काढण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध..

रोख, क्रेडिट – डेबिट कार्ड, डिजिटल वॉलेट, मेट्रो अपद्वारे तिकीट खरेदी करता येईल. तिकीट खिडकी, तिकीट वेंडिंग मशीन, व्हॉट्सअप इत्यादी पद्धतीने तिकीट प्राप्त केले जाऊ शकते. पीएमपीएमएलद्वारा फीडर बससेवेचा लाभ उपलब्ध करून देण्यात आला आहे, त्याचा प्रवाशांनी लाभ घ्यावा. 3 कोचची ट्रेन असून त्यातील एक डबा महिलांसाठी राखीव आहे. दिव्यांगांसाठी मेट्रो कोचमध्ये विशिष्ट जागा राखीव ठेवण्यात आली आहे . मेट्रो स्थानक व मेट्रो कोचमध्ये इमर्जन्सी हेल्प बटण ठेवले आहे.

 

..असा प्रवास करणे होणार शक्य..

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट आणि ‘गरवारे ते रुबी हॉल’ या मार्गांचे उद्घाटन झाल्यानंतर मंगळवारी संध्याकाळी 5.00 वाजल्यापासून ‘पीसीएमसी ते सिव्हिल कोर्ट ‘व’ वनाज ते रूबी हॉल अशी थेट मेट्रो सेवा प्रवाशांसाठी सुरू होईल. सिव्हिल कोर्ट इंटरचेंजचे स्थानकाचा वापर करून ‘पीसीएमसी ते वनाज’, ‘पीसीएमसी ते रुबी हॉल’ असा प्रवास करणे शक्य होईल..

दोन ऑगस्टपासून पीएमपीची फीडर सेवा सुरू होणार

महाराष्ट्र मेट्रोरेल कार्पोरेशन लि. पुणे यांचे मार्गिका वनाज ते रुबी हॉल मेट्रो स्टेशन पिंपरी – चिंचवड महानगरपालिका ते शिवाजीनगर सिव्हील कोर्ट मेट्रो स्टेशनपर्यंत मेट्रो आज मंगळवारपासून सुरू करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने पुणे महानगर परिवहन महामंडळामार्फत प्रवाशांच्या सोईकरिता दोन ऑगस्टपासून मेट्रो फीडर बससेवा सुरू करण्यात येत आहे. पीएमपीएमएलकडून सुरू केलेल्या फिडर बससेवांचा तपशील खालीलप्रमाणे..

134 अ.क्र. मार्ग क्र. मेट्रो शटल मेट्रो शटल 32 मेट्रो शटलपासून पिंपरी मनपा स्टेशन पिंपरी मनपा स्टेशन नाशिक फाटा 35 (भोसरी) मेट्रो दापोड़ी शटल काळवाडी स्टेट फाटा घरकुल संत भोसरी बस प्रकार नवी सांगवी पिंपरी – चिंचवड महानगरपालिका ते शिवाजीनगर सिव्हील कोर्ट मेट्रो स्टेशन फिडर रूटपर्यंत शेड्युल संख्या 1 स्टेट नगर स्टेट वर्तुळ व्हाया शगुन चौक, डिलक्स, काळेवाडी, काळेवाडी फाटा, घरकुल, संभाजीनगर, थरमॅक्स चौक, केएसबी चौक, मोरवाडी, पिंपरी मनपा स्टेशन, इंद्रायणीनगर, गवळीमाथा, नेहरूनगर, वायसीएम हॉस्पिटल. दापोडी मेट्रो स्टेशन, सीएमई गेट, शिवाजी पुतळा, वसंतदादा पुतळा, पीडब्ल्यूडी मैदान, नवी सांगवी, काटे पुरम चौक, पिंपळे गुरव, रामकृष्ण मंगल कार्यालय, चर्च, सीएनजी पंप फुगेवाडी, दापोडी मेट्रो स्टेशन. 111 वारंवारिता 60 मी. 60 मी. 1 तास 10 मी. 60 मी.