Take a fresh look at your lifestyle.

Sarkari Naukri Pune 2022 : पुणे महानगरपालिकेत सरकारी नोकरीची सुर्वणसंधी ; या पदांच्या तब्बल 448 जागा, पहा डिटेल्स

शेतीशिवार टीम : 20 जुलै 2022 :- महाराष्ट्रात सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक चांगली संधी आली आहे. पुणे महानगरपालिकेने (Pune Municipal Corporation) 448 पदांसाठी अर्ज मागवले आहेत. आजपासून 20 जुलै 2022 पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार PMC च्या अधिकृत वेबसाइट pmc.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 ऑगस्ट 2022 आहे. 

वॅकन्सी डिटेल्स :-

या भरती प्रक्रियेद्वारे विविध पदांसाठी 448 पदे भरण्यात येणार आहेत. ज्या पदांवर भरती करण्यात आली आहे त्यात सहाय्यक विधी अधिकारी (Assistant Legal Officer), लिपिक टंकलेखक (Clerk Typist), कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) आणि सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक (Assistant Encroachment Inspector) यांसह इतर अनेक पदांचा समावेश आहे. इच्छुक उमेदवार फक्त ऑनलाइन अर्ज करू शकतात. याशिवाय कोणत्याही प्रकारे केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत…

शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा :-

पुणे महापालिकेच्या या भरतींमध्ये शैक्षणिक पात्रताही वेगवेगळ्या पदांनुसार वेगळी ठरविण्यात आली आहे. अधिक डिटेल्ससाठी, आपण अधिकृत वेबसाइटवर जारी केलेलं नोटिफिकेशन पाहू शकता.

सहाय्यक विधी अधिकारी (Assistant Legal Officer) या पदांसाठी लॉमध्ये डिग्री पर्यंत शिक्षण घेतलंल असावं.

लिपिक टंकलेखक (Clerk Typist) या पदांसाठी MSC, टायपिंग हिंदी आणि मराठी तसंच MSCIT पर्यंत शिक्षण घेतलंल असावं.

कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) या पदांसाठी Civil ब्रान्चमध्ये इंजिनिअरिंग पर्यंतचं शिक्षण घेतलंल असावं.

सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक (Assistant Encroachment Inspector) या पदांसाठी Mechanical ब्रान्चमध्ये इंजिनिअरिंग पर्यंतचं शिक्षण घेतलंल असावं.

अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे वय किमान 18 वर्षे आणि कमाल 38 वर्षे असावे.

अर्ज फी, निवड प्रक्रिया :- 

या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 1,000 रुपये शुल्क भरावे लागेल. नियमानुसार राखीव प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना यामध्ये सूट देण्यात आली आहे. फॉर्म भरण्यासाठी त्यांना 800 रुपये द्यावे लागतील. अर्ज प्रक्रिया संपल्यानंतर लेखी परीक्षा घेतली जाईल. पात्र उमेदवारांना वैयक्तिक मुलाखत आणि टायपिंग टेस्टसाठी बोलावलं जाईल. त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी होईल आणि यशस्वी उमेदवाराची निवड केली जाईल.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://ibpsonline.ibps.in/pmcvpjun22/ या लिंकवर क्लिक करा.