Take a fresh look at your lifestyle.

Pune : पुणे महापालिकेतील ही 2 गावे होणार नगरपरिषद, जिल्हा प्रशासनाकडून हिरवा कंदील; अहवाल राज्य सरकारकडे..

फुरसुंगी आणि उरुळी देवाची या महापालिकेतील गावांमध्ये समाविष्ट झाल्यानंतर अनेक विकासकामे हाती घेण्यात आली असून, ही गावे महापालिकेतच समाविष्ट व्हावी या बाजूने दोन हजार नागरिकांनी सहमती दर्शवली आहे. तर, स्वतंत्र नगर परिषद झाल्यास राज्य सरकारकडून स्वतंत्र निधी मिळू शकतो, चांगले प्रशासन देता येऊ शकते या उद्देशाने दोन हजार 300 पेक्षा जास्त नागरिकांनी सहमती दर्शवली आहे.

त्यामुळे फुरसुंगी आणि उरुळी देवाची येथील स्थानिकांनी महानगरपालिकेला नकार दिल्याने दोन्ही गावांसाठी स्वतंत्र नगर परिषद स्थापन करण्यास जिल्हा प्रशासनाने मान्यता दिली आहे.तसेच याबाबत लोकसंख्येनुसार ‘ब’ वर्ग नगरपालिका करता येऊ शकते, असेदेखील अहवालात नमूद केले असून हा अहवाल राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे.

फुरसुंगी आणि उरुळी देवाची ही दोन गावे 2017 मध्ये पुणे महापालिकेत समाविष्ट करण्यात आली आहेत. महापालिकेने आकारलेला कर जास्त असल्याने आणि कोणत्याही सुविधा मिळत नसल्याचा दावा करत या गावांनी महापालिकेतून वगळण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे 6 डिसेंबर 2022 मध्ये झालेल्या बैठकीत केली होती.

त्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी फुरसुंगी, उरुळी देवाची ही गावे महापालिका हद्दीतून वगळण्याचे आणि या दोन गावांची स्वतंत्र नगरपालिका करण्याचे जाहीर केले होते. प्रशासनाकडे नागरिकांनी हरकती त्यानुसार जिल्हा सूचना नोंदविण्याचे आवाहन केले होते.

फुरसुंगी गावात 66 हजार 2 तर उरुळी गावातील 9 हजार 403 अशा एकूण 75 हजार 405 स्थानिकांपैकी केवळ साडेसहा हजार (30 टक्के) हरकती – सूचना जिल्हा प्रशासनाकडे घेतल्या होत्या. गैरहजर राज्य सरकारच्या या निर्णयावर सुनावणीदरम्यान 4 हजार 679 पैकी साडेचार हजार नागरिक राहिले. मात्र, त्यांनी आपले लेखी म्हणणे सादर केले होते.

राज्य शासनाच्या आदेशानुसार फुरसुंगी आणि उरुळी देवाची या दोन्ही गावांतील प्राप्त सूचना – हरकतींवर सुनावणी प्रक्रिया झाली असून, दोन हजार 300 पेक्षा अधिक नागरिकांनी महानगरपालिकेला नाकारत स्वतंत्र नगर परिषद स्थापन करण्याबाबत सकारात्मकता दर्शवली आहे.

त्यानुसार दोन्ही गावांच्या लोकसंख्येनुसार 75 हजारांपर्यंत ‘ब’ वर्ग नगरपालिकेत समावेश होऊ शकतो, असा अहवाल राज्य शासनाकडे पाठविला आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली आहे.