Take a fresh look at your lifestyle.

शेतकऱ्यांनो, सोयाबीन टोकण यंत्रासाठी मिळवा 50% अनुदान ; या जिल्ह्यांचे अर्ज झाले सुरु, पहा कागदपत्रे अन् अर्ज प्रोसेस..

राज्यातील जिल्हापरिषदांच्या सेस फंडातून माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना राबवण्यात येतात. अशाच सेस फंडातून 50 टक्के अनुदानावर सोयाबीन टोकण यंत्रासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. (Soybean Token Yantra Anudan)

तरी इच्छुक शेतकऱ्यांनी स्वतःचा 7/12 , 8 -अ , आधार कार्ड, बँक पासबुकाच्या पहिल्या पानाचे झेरॉक्स, लाभार्थी अनुसूचित जाती,जमातीचे असल्यास जातीचे प्रमाण पत्र, अपंग लाभार्थीसाठी अपंगत्वाच्या दाखल्याच्या झेरॉक्स प्रतिसह आपल्या पंचायत समिती कडे अर्ज करावेत.

सेस फंडातून सगळ्याच जिल्हा परिषदांमार्फत या योजना राबवल्या जातात. सध्या लातूर जिल्हा परिषदेतून सोयाबीन टोकण यंत्रासाठी अर्ज मागवण्यात आले आहे. यासाठी लातूर, उदगीर, अहमदपूर, औसा, निलंगा, रेणापूर, चाकूर, देवणी, शिरूर अनंतपाळ, आणि जळकोट तालुक्यातील इच्छुक उमेदवार अर्ज करू शकतात.

टीप : (शेतकरी मित्रांनो या सोयाबीन टोकण यंत्रासाठी mahadbtmahait.gov.in या पोर्टलवरही अर्ज सुरु झाले आहेत. कृपया इच्छुकांनी ऑनलाईन अर्ज करावेत)

जिल्हा परिषद लातूर सेस फंडातून सोयाबीन टोकण यंत्र 50 टक्के अनुदानावर डी.बी.टी तत्वावर देण्यात येणार आहे. सदर योजनेमध्ये अनुसूचित जाती, जमाती व महिला यांना प्राधान्य राहील.

लाभार्थ्याची निवड केल्यानंतर शेतकऱ्यांनी एक महिन्याच्या आत खुल्या बाजारातून अधिकृत विक्रेत्याकडुन आपल्या पसंतीच्या औजाराची खरेदी करावी लागेल.

सदर खरेदी करावयाचे औजारे अधिकृत सक्षम तपासणी संस्थानी परिक्षण करुन ते बी. आय. एस. अथवा अन्य संस्थानी निश्चित केलेल्या प्रमाणकानुसार / तांत्रीक निकषानुसर असावे लागेल.

सदर औजारासाठी जास्तीचे अर्ज प्राप्त झाल्यास लक्षांकानुसार सोडत पध्दतीने लाभार्थ्याची निवड संबंधीत पंचायत समिती स्तरावर करण्यात येईल. मंजुर औजाराचे अनुदान संबंधीत शेतकऱ्यांच्या आधार लींक असलेल्या बँक खात्यावर डी. बी.टी प्रणाली द्वारे अदा करण्यात येणार आहे.