Take a fresh look at your lifestyle.

PPF RD, सुकन्या समृद्धि योजनेत (SSY) आता करा ऑनलाईन पैसे जमा…

शेतीशिवार टीम, 6 जानेवारी 2022 : तुम्ही आरडी (R.D), सुकन्या समृद्धी योजना (SSY) यांसारख्या छोट्या योजनांमध्ये गुंतवणूक करत असाल आणि हप्ता जमा करण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये जाण्याची इच्छा नसेल तर तुमच्यासाठी ही बातमी चांगलीच आहे म्हणून समजा, आता तुम्ही हे पैसे ऑनलाइनही ट्रान्सफर करू शकता…

पण यासाठी गुंतवणूकदाराचे इंडिया पोस्ट पेमेंट बँक (IPPB) मध्ये बचत खाते (Savings account) असणे आवश्यक आहे. सुकन्या समृद्धी योजने (Sukanya Samrudhi Yojana सारख्या योजना ऑनलाइन पैसे कसे जमा करू शकतात ते आपण जाणून घेउयात…

पोस्ट ऑफिस लोकांना सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF), सुकन्या समृद्धी योजना (SSY), आरडी (RD) यांसारख्या 9 प्रकारच्या बचत योजनांमध्ये (Savings plans) गुंतवणूक करण्याचा ऑप्शन देत आहे. यामुळेच मोठ्या संख्येने लोक या योजनांमध्ये गुंतवणूक करतात…

कोरोना महामारी लक्षात घेऊन, सरकार असा प्रयत्न आहे की, लोकांना जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये एकदा खातं उघडलं की, त्यानंतर गुंतवणूकदार तुम्ही ऑनलाइन पैसे जमा करू शकतात.

जर तुमचे बचत खाते (Savings account) इंडियन पोस्ट पेमेंट बँकेत उघडलं असेल, तर तुम्ही आयपीपीबीच्या (IPPB) मोबाइल अॅपद्वारे आरडी (RD), सुकन्या समृद्धी (SSY) योजनेत पैसे ट्रान्सफर करू शकता. सध्या सरकारनेही लहान बचत योजनांच्या (Small savings plans) व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही…

सुकन्या समृद्धी योजनेसारख्या सेव्हिंग प्लॅनमध्ये पैसे जमा करण्यासाठी स्टेप बाय स्टेप प्रोसेस…

1 – IPPB अकाउंटमध्ये पैसे करा जमा

2- DOP प्रॉडक्ट वर जा

3- तुमची योजना (Plan) निवडा.

4- तुम्हाला सुकन्या समृद्धी योजनेत (SSY) पैसे जमा करायचे असतील तर सुकन्या समृद्धी (SSY) योजना निवडा.

5- सुकन्या समृद्धी योजनेचा अकाउंट नंबर आणि नंतर DOP कस्टमर ID प्रविष्ट करा.

6- तुमची हप्त्याची रक्कम निवडा.

7- पेमेंट प्रोसेस पूर्ण झाल्यावर तुम्हाला एक नोटिफिकेशन मिळेल.