Take a fresh look at your lifestyle.

7th Pay Commission : केंद्र सरकारचं कर्मचाऱ्यांना गुढीपाडव्याचं मोठं गिफ्ट, DA मध्ये 3% वाढ जाहीर !

शेतीशिवार टीम : 30 मार्च 2022 : 7th Pay Commission : केंद्र सरकारने नवीन आर्थिक वर्ष येण्यापूर्वी लाखो कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) वाढ केली आहे. यावेळी DA मध्ये (DA Hike) 3% वाढ करण्यात आली आहे.

1 जानेवारीपासून कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ…

खरं तर, केंद्र सरकारने डीएमध्ये 3% वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संदर्भातील अंतिम निर्णय घेण्यात आला. सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांना 01 जानेवारी 2022 पासून वाढीव महागाई भत्त्याचा (DA) लाभ मिळणार आहे. सरकारने आता कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 34% महागाई भत्ता देण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी 31% एवढी तरतूद करण्यात आली होती.

केंद्रीय कर्मचाऱ्यांना पुढील महिन्याच्या पगारात डीएचा वाढीव लाभ (DA) मिळणार आहे. यासोबतच एप्रिल महिन्यातील कर्मचाऱ्यांना त्यांच्या मागील 3 महिन्यांची सर्व थकबाकीही देण्यात येणार आहे. 3% महागाई भत्त्यात वाढ केल्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांना 73,440 रुपयांपासून 2,32,152 रुपयांपर्यंतच्या थकबाकीचा लाभ मिळणार आहे. एका अंदाजानुसार, महागाई भत्त्यात वाढ झाल्याने सरकारच्या तिजोरीवर वार्षिक 10,000 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे.

सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना महागाईच्या (Inflation) प्रभावापासून वाचवण्यासाठी हा घटक त्यांच्या पगार / पेन्शनमध्ये जोडण्यात आला आहे.

सध्या इतका मिळतोय महागाई भत्ता….

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना सध्या 31% डीए (DA) मिळतो. 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार सरकारने डीएमध्ये (DA) तीन टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणारा महागाई भत्ता आता 34% होणार आहे.

7व्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार, सरकार वर्षातून दोनदा (जानेवारी आणि जुलैमध्ये) DA मध्ये सुधारणा करते. यापूर्वी, गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए (DA) 28 टक्क्यांवरून 31% केला होता.

48 लाख कर्मचाऱ्यांना होणार थेट फायदा…

रिपोर्टनुसार, जर सरकारने पगारवाढीची ही घोषणा केली, तर त्याचा फायदा भारतातील सुमारे 48 लाख केंद्र सरकारी कर्मचारी आणि 65 लाख निवृत्ती वेतनधारकांना होईल. गेल्या वर्षी केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 28 टक्क्यांवरून 31 टक्क्यांपर्यंत वाढवला होता. कोविड-19 महामारी असूनही या कर्मचाऱ्यांना डीए (DA) वेतनवाढ देण्यात आली. मात्र, यासंदर्भात सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

पगारानुसार गणित समजून घ्या….

जर एखाद्या केंद्रीय कर्मचाऱ्याचे मूळ वेतन 18,500 रुपये असेल, तर त्याला 34% दराने 6290 रुपये महागाई भत्ता मिळेल. आतापर्यंत 31% दराने 5735 रुपये भत्ता दिला जात आहे. त्यानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या एकूण पगारात 555 रुपयांची वाढ झाली आहे…