वसई – विरार, मुंबई, ठाणे वाहनधारकांसाठी खुशखबर..! आता तासाभराचा प्रवास फक्त 15 मिनिटांत, अखेर वसई – वर्सोवा ब्रिज प्रवाशांसाठी खुला..
प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर मुंबई – अहमदाबाद महामार्गावरील घोडबंदरजवळील वर्सोवा पुलाच्या दोन्ही लेनवरील प्रवास काल मंगळवारी सुरु करण्यात आला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट करून मुंबई ते वसई – विरार हा द्विपदरी पूल सुरू करण्याची घोषणा केली. त्यानंतर वाहनांची ये – जा सुरू झाली. सध्या मुंबईच्या दिशेने येणाऱ्या दोन लेन सुरू करण्यात आलेल्या नाहीत. येत्या मे महिन्यात मुंबई – ठाण्याकडे येणाऱ्या दोन्ही लेन सुरू होतील, असे प्रकल्प महाप्रशासक मुकुंद अत्राडे यांनी सांगितले.
यामुळे झाला कमाल कामाला विलंब
या पुलाचे भूमिपूजन जानेवारी 2018 मध्ये झाले होते तर 2020 मध्ये पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते, परंतु पर्यावरण विभागाकडून मंजुरी मिळण्यास विलंब झाल्याने काम वेळेत पूर्ण होऊ शकले नाही. याशिवाय कोरोनामुळे हा प्रकल्पही प्रभावित झाला.
ट्राफिकपासून मिळणार सुटका..
पूल सुरू झाल्यानंतर वसई – विरार, मुंबई, ठाणे येथून प्रवास करणाऱ्या नागरिकांना याचा सर्वाधिक फायदा होणार आहे. या मार्गावरून दररोज लाखो वाहने ये-जा करतात. गर्दीच्या वेळेस ट्राफिक असायचं की लोक याला ‘नरक यात्रा’ म्हणत. जुने पूल अनुक्रमे 1976 आणि 2002 मध्ये बांधण्यात आले होते, मात्र गेल्या 10 वर्षांपासून दोन्ही पूल जीर्ण अवस्थेत असून त्यांची दुरुस्ती सुरू होती, त्यामुळे वाहतूक कोंडी होत होती. 15 मिनिटांचा प्रवास करायला 1 तास लागायचा. परंतु आता हा प्रवास फक्त 15 मिनिटांत पार होणार असून आता मुंबई, ठाणे, पालघर, गुजरात, सुरत या वाहनधारकांचा प्रवास सुखकर होणार आहे.
वेळ आणि इंधनातही होणार बचत..
नवीन पूल कार्यान्वित झाल्यामुळे वेळेचीच नव्हे तर इंधनाचीही बचत होणार आहे. आज वसईला जाण्यासाठी नवीन पुलाचा वापर केल्याचे दिनेश पांडे या प्रवाशाने सांगितलं असून नवीन पुलामुळे वसईला अर्धा तास अगोदरच पोहोचता आलं तर त्यांच्या गाडीचा इंधनाचा वापरही कमी झाला.
वर्सोवा ब्रिज स्टॅटिस्टिक्स :-
वर्सोवा पुलाची किंमत सुमारे 247 कोटी रुपये आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 8 (मुंबई – अहमदाबाद) वर बांधण्यात येत असलेल्या पुलाची लांबी 2.25 किमी आहे.
सध्या 917 मीटर लांबीचा पूल कार्यान्वित झाला आहे.