Take a fresh look at your lifestyle.

पुणे – अहमदनगर हायवेवरील वाघोली बनतंय निवासी झोन ! फ्लॅटचे दरही फक्त 15 लाखांपासून पुढे, खरेदी करण्यासाठी करा क्लिक..

वाघोलीमध्ये गेल्या काही वर्षात नामांकित बांधकाम व्यावसायिकांचे मोठे – मोठे प्रकल्प उभे राहिले आहेत. आयटी पार्कमुळे अनेक कंपन्या या परिसरात आल्याने मोठ्याप्रमाणात रोजगार उपलब्ध झाला आहे. त्याचबरोबर लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळ आगदी पाच किलोमीटर, तर पुणे रेल्वे स्टेशन दहा किलोमीटर अंतरावर असल्याने नागरिकांना प्रवासाच्या दृष्टीने फायद्याचे असल्याने वाघोली आता निवासी झोन बनत आहे. विशेषत: गेल्या 15-20 वर्षांत हे सर्व बदल झाल्याने पुणे – अहमदनगर महामार्गावरील वाघोली सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

वाघोलीची सध्याच्या घडीला अडीच – तीन लाखांच्या आसपास लोकसंख्या आहे. वाघोलीची विशेषतः वाघेश्वर मंदिरामुळे एक वेगळी ओळख असून, हे पुरातन मंदिर आहे. श्रावण महिना असो की, इतर कोणतेही सणवार असो, त्यामुळे भाविकांची येथे नेहमीच गर्दी असते. वाघोलीतील केसनंद रस्ता, बकोरी रस्ता, भावडी रस्ता आणि आव्हाळवाडी रस्ता या चार भागांत गेल्या दहा वर्षांत सर्वात वेगाने विकास झाल्याचे पाहायला मिळत आहे.

व्यावसायिक प्रकल्प आणि निवासी प्रकल्प मोठ्या संख्येने उभे राहिले आहेत. तसेच चांगल्या क्वालिटीची हॉटेल रेस्टॉरंट आणि नामांकित रुग्णालय देखील येथे असल्याने नागरिकांना उत्तम प्रकारच्या सोयीसुविधा मिळत आहे.

शिरूर तालुक्यातील रांजणगाव औद्योगिक वसाहत (एमआयडीसी), भीमा कोरेगाव – सणसवाडी एमआयडीसी येथील विविध नामांकित कंपन्यांमध्ये काम करणारे आगदी साध्या कामगारासह मोठ्या हुद्यावर काम करणाऱ्या व्यवस्थापक (मॅनेजर) अशा सर्वांचीच राहण्यासाठी वाघोलीला मोठी पसंती मिळताना दिसत आहे.

त्यामुळे गेल्या दहा वर्षांत वाघोलीत एक – दोन गुंठ्यासह मोठ मोठे गृहप्रकल्प उभे राहिले आहेत. त्याच्या जोडीला भारतीय जैन संघटनेचे (बीजीएस कॉलेजसह इतर नामांकित अभियांत्रिकी (इंजिनीअर महाविद्यालये आणि दर्जेदार शिक्षण देणाऱ्या शाळांची देखील संख्या वाढली आहे. त्यामुळे देखील नागरिकांचा वाघोलीकडे गेल्या काही वर्षांत ओढा वाढला आहे.

पुणे- नगर रस्त्यावर कटकेवाडी, बकोरी रस्ता, भावडी रस्ता आणि केसनंद रस्त्यावर नामांकित कंपन्यांचे वेअर हाऊस असल्याने स्थानिकांना रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होत आहे तर या वेअर हाऊसमध्ये वाहतूक (ट्रान्सपोर्ट) सुविधा लागत असल्याने छोठ्या – मोठ्या वाहतूकदारांना देखील मोठा व्यावसायिक फायदा होत आहे .

या सर्व कारणांमुळे दहा वर्षांत वाघोलीचा मोठा कायापालट झाला आहे. ग्रामपंचायत असलेल्या वाघोलीचा गेल्या वर्षीच पुणे महापालिकेमध्ये समावेश झाला आहे. त्यामुळे अंतर्गत रस्ते, ड्रेनेज लाइन व्यवस्था आणि पिण्याच्या पाण्याची नजिकच्या काळात सुविधा पुणे महापालिकेकडून मिळाव्यात, अशी स्थानिकांची मागणी केली आहे.

वाघोलीत रेडीरेकनरचा दर काय ?

वाघोलीच्या काही भागामध्ये रेडीरेकनरचा दर हा वेगवेगळा आहे. बीजेएस कॉलेज रस्ता, बकोरी रस्ता आणि केसनंद रस्ता, तसेच गावठाण भागात रेडीरेकनरचा दर वेगवेगळा आहे . साधारणपणे 2500 ते 5500 रुपयांचा दर आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना या भागात परवडणारी घरे उपलब्ध होत असल्याने नागरिकांची पसंती मिळत आहे.

वाघोलीची वैशिष्ट्ये ?

वाघोली गावातून पुणे – औरंगाबाद हा राष्ट्रीय महामार्ग जातो. वाघेश्वर मंदिरामुळे एक वेगळी ओळख असून, हे पुरातन मंदिर आहे.

वाघोली – लोहगाव रस्ता, वाघोली केसनंद – वाडेबोल्हाई – राहू राज्य महामार्ग, वाघोली – आव्हाळवाडी – मांजरी – हडपसर रस्ता, वाघोली – खराडी – चंदननगर – येरवडा पुणे स्टेशन रस्ता, वाघोली – भावडी – तुळापूर रस्ता, वाघोली – बकोरी – लोणीकंद – पेरणे रस्ता आदी महत्त्वाच्या रस्त्यांचे जाळे आहे.

लोहगाव आंतरराष्ट्रीय सेवा पुरवणारे विमानतळ पाच किलोमीटरवर आहे.

वाघोलीत ग्रामीण रुग्णालय आहे. मात्र, लोकसंख्येच्या तुलनेत ते अपुरे पडत आहे. पुणे महापालिकेने अत्याधुनिक आरोग्य सेवा पुरवण्याची मागणी होत आहे.

वाघोलीमध्ये नामांकित शैक्षणिक संस्थांचे कॉलेज कॅम्पस असून, राज्यभरासह देश – परदेशातील विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत.

वाघोलीत फ्लॅटचा दर काय ?

1 बीएचके – 15 ते 25 लाख
2 बीएचके – 22 ते 40 लाख
3 बीएचके – 35 ते 55 लाख
बंगलो रो – हाऊसेस – 30 ते 60 लाख

फ्लॅट खरेदीसाठी खालील लिंक पहा..

housing.com

99acres.com

magicbricks.com

वाघोलीचा गेल्या वर्षी पुणे महापालिकेमध्ये समावेश झाला आहे. मात्र, पुणे महापालिका कर (टॅक्स) गोळा करण्याशिवाय इतर काहीही सुविधा देत नाही. वाघोलीमध्ये बांधकाम जोरात सुरू आहेत. दिवसेंदिवस लोकसंख्येत वाढ होत आहे. परंतु सध्या पिण्याच्या पाण्याची सुविधा नसल्याने मोठ – मोठया सोसायट्यांना टँकरने पाणी मागवावे लागत आहे. त्यात या सोसासट्यांना आर्थिक फटका बसत आहे. तसेच अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली असून, ड्रेनेज लाइनची व्यवस्था नसल्याने गटाराचे पाणी या रस्त्यावरून वाहत आहे. त्यामुळे येथे राहणाऱ्या नागरिकाच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. पुणे महापालिकेने केवळ कर गोळा न करता रस्ते, पाणी आणि ड्रेनेज लाइनची कामे तातडीने करावीत. – रामभाऊ दाभाडे, व्यावसायिक ,

खराडी आयटी पार्क हा वाघोलीला लागून आहे. या आयटी पार्कमुळे वाघोली गावात नामांकित बांधकाम व्यावसायिकानी मोठ – मोठे निवासी प्रकल्प उभारले आहेत. वाघोलीत अनेक प्रकल्प येत आहेत. परंतु, पुणे महापालिका त्याप्रमाणात सुविधा देत नाही महापालिका केवळ कर गोळा करण्यावर भर देत आहे. त्यानी पायाभूत सुविधा दिल्या तरच या गावाचा सर्वांगीण विकास होईल. अन्यथा भकास झाल्याचे अनेक गावात आपण पाहिले आहे. महापालिकेने याबाबींचा विचार करून ड्रेनेजलाईन आणि अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती करत पिण्याच्या पाण्याची सुविधा करावी, – संदीप सातव