Take a fresh look at your lifestyle.

वर्धा – नांदेड रेल्वेच्या बांधकामाला गती ! 284Km अंतरातला आता ‘हा’ टप्पाही होणार पूर्ण, पहा स्टेशन्स अन् Route Map..

नांदेड ते वर्धा रेल्वे मार्गासाठी यावर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये 850 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे आता पुसद ते नांदेड दरम्यान सपाटीकरणाच्या कामाला सुरुवात झाली असून लवकरच मजबुतीकरण पूर्ण केले जाणार आहे.

गत 20 वर्षापासून चर्चेत असलेला वर्धा ते नांदेड हा मराठवाडा – विदर्भाला जोडणारा महत्त्वाचा रेल्वेमार्ग रखडला होता. हदगावच्या भूमिकन्या केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे 2006 साली तत्कालीन रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांनी या रेल्वेमार्गाला मंजुरी दिली होती.

हदगाव तालुक्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणारा, गत 14 वर्षापासून प्रलंबित असलेला व राजकीयदृष्ट्या दुर्लक्षित असलेल्या वर्धा – यवतमाळ – नांदेड या रेल्वेमार्गासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात 850 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यामुळे वर्धा – नांदेड नवीन रेल्वेमार्ग लवकरात लवकर मार्गी लागेल, अशी चिन्हे सध्या तरी दिसत आहेत.

केंद्र सरकारने 2023-24 या वर्षातील अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पासाठी आणि रेल्वेच्या इतर कामांसाठी 13 हजार 536 कोटींचा निधी दिला आहे. हा निधी महाराष्ट्राला मिळालेला आतापर्यंतचा सर्वांत मोठा निधी आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील विदर्भ – मराठवाड्याला जोडणारा बहुप्रतिक्षीत वर्धा – नांदेड रेल्वेमार्ग पूर्णत्वाकडे जाण्यासाठी नांदेड व हिंगोली जिल्ह्यातील शेकडो गावांचा शेतीचा येथील छोट्या मोठ्या उद्योगांचा विकास होण्यास हातभार लागणार आहे.

विदर्भ आणि मराठवाड्यासाठी मैलाचा दगड ठरणाऱ्या सदर रेल्वेमार्गाचे काम 40 टक्के राज्य शासन व 60 टक्के केंद्र शासनाच्या वाट्याने हा प्रकल्प पूर्ण होत आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात आल्याने या मार्गाच्या कामाला पुन्हा गती येईल अशी शक्यता आहे. परंतु हा मार्ग पूर्ण होण्यास 2026 वर्ष उजाडणार असे दिसून येत आहे.

नांदेड ते वर्धा रेल्वेमार्गाच्या कामाला गती.. 

या बाबतीत मराठवाड्यातील नांदेड व हिंगोलीच्या राजकीय नेत्यांनी जर या प्रकल्पमध्ये अधिक लक्ष दिल्यास रेल्वेमार्गाच्या कामाला गती येणार आहे. वर्धा ते नांदेड या रेल्वेमार्गाचे अंतर 284 किमी इतके आहे. तर वर्धा ते नांदेडपर्यंत हा मार्ग पूर्ण झाल्यास विद्यार्थी, नोकरदार, सामान्य नागरिक यांच्यासाठी सोयीचे होणार असून, वाहतुकीच्या दृष्टीकोनातून सुलभता येणार आहे.

 कळंब ते वर्धा पर्यंत रेल्वे प्रवास सुरु..

 पहा टाइम टेबल

हा प्रकल्प नवीन उद्योगांच्या उभारणीसाठी मैलाचा दगड ठरणार आहे. वर्धा – नांदेड रेल्वेमार्गासाठी 850 कोटी मंजूर केले असून वर्धा लोकसभा क्षेत्रातील पाच रेल्वेस्थानकांची कामे सुरू झाली आहेत. मात्र यवतमाळ व नांदेड जिल्ह्यातील रेल्वे मार्गाच्या सपाटीकरण व मजबुतीकरणाचे काम सुरू झाले असून बऱ्याच प्रमाणात प्रगतीपथावर आहे.